मग ते पुढे जात असता तो एका गावांत आला; तेव्हा मार्था नावाच्या एक स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले. तिला मरीया नावाची एक बहिण होती; तीही प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. (लूक १०: ३८-३९)
बेथानी मध्ये तेथे अनेक घरे होती परंतु पवित्र शास्त्र सांगते की, येशू नेहमी मार्था, मरीया आणि लाजरस च्या घरी राहत असे.
मी विश्वास ठेवतो हे ह्या कारणासाठी होते कीत्याचे तेथे आनंदाने स्वागत केले जात होते. परमेश्वर हा नेहमीच त्या ठिकाणी जाईल जेथे त्याबरोबर उत्सव हा केला जाईल, आणि त्यास केवळ सहन केले जाणार नाही.
मी नेहमी अनेक ठिकाणी गेलो आहे,जेथे कोणी ताबडतोब आणि अक्षरशः देवाची उपस्थिती अनुभविली आहे. कोणी अक्षरशः शांति आणि स्थिरचित्ततेचा उस्फुर्त अनुभव करू शकतो. यासाठी एक कारण हे ही ठिकाणे जेथे निरंतर स्तुति आणि उपासना ही केली जाते.
हे इस्राएलाच्या स्तवनात वसणाऱ्या, तूं पवित्र आहेस. (स्तोत्रसंहिता २२: ३)
याचा अर्थ हा, जेथेकोठे लोकांना त्याची स्तुती करावीशी वाटते, परमेश्वर म्हणतो, "मी तेथे असेन," परमेश्वर त्याच्या लोकांच्या स्तुति मध्ये निवास करतो. स्तुतीचे ठिकाण हे जेथे परमेश्वर अक्षरशः निवास करतो. परमेश्वर अशा ठिकाणाकडे आकर्षित होतो.
जर तुम्ही हे गुपित समजले, तुमचे घर हे आशीर्वादाचे ठिकाण होईल. कृपा करून मला ते स्पष्ट करू दया.
एके दिवशी एका व्यक्तीने मला हे म्हणत लिहिले की ते घर बदलण्याचा विचार करीत आहेत कारण ते तेथे दुष्ट शक्तींच्या आक्रमणास खूपचतोंड देत आहेत.असे दिसते, की काही दुष्ट शक्ती त्यांस तेथे त्रास देत होती. त्यांना सल्ला दिला की दुसऱ्या ठिकाणी राहावयास जावे. मागेच, त्यांनी असे दोनदा घरे बदलली आहेत.
जर तुम्ही किंवा कोणी जे तुम्हाला ठाऊक आहे जे अशा अनुभवातून जात आहेत, मला तुम्हांला सांगू दया घरे बदलणे हे तुम्हांला कायमचे उपाय देणार नाही.
तुम्हीं पाहा, इस्राएली लोक दुष्ट फारो च्या अधिपत्याखाली ४३० वर्षे मिसर मध्ये गुलामगिरीत होते. तथापि, देवाच्या दयेमुळे,एका रात्रीत तेतेथून बाहेर आले. त्यांनी त्यांचे राहण्याचे भौतिक स्थान हे बदलले होते. ते आता मिसर मधून बाहेर होते परंतु अजूनही फारो आणि त्याच्या दुष्ट सेने ने त्यांचा पाठलाग केला होता. (निर्गम१४ कृपा करून वाचा)
हेच काय ते लोकांना सामान्यपणे घडते. तुम्ही एखादया ठिकाणातून शारीरिकदृष्टया बाहेर येऊ शकता परंतु अंधाराचा आत्मा हा तुमच्यामागे येतो जेथेकोठे तुम्ही जाता. तुम्हांला कशाची गरज आहे की परमेश्वराचे सामर्थ्य हे तुमच्यावर, तुमचे कुटुंब आणि तुमच्या घरावर यावे, म्हणजे अंधारी शक्तीला बाहेर काढण्यात येईल की त्यास लाजवावे.
२ इतिहास २० मध्ये, आपण अनेक सेने बद्दल वाचतो जे एकत्र आले की राजा यहोशाफाट व त्याच्या लोकांवर आक्रमण करावे. त्यांना अशा असंख्य सेने समोर पराजय हा दिसत होता.
पुढे काय झाले हे तुमच्या आणि माझ्यासाठी एक विलक्षण धडा आहे. जेव्हा त्यांनी परमेश्वराची स्तुति करण्यास सुरुवात केली, त्याने त्यांच्या शत्रूला भयात आणले, आणि ते एकमेकांविरुद्ध लढले. त्यांनी त्या दरी ला दुसरे नाव "बराखा" असे ठेवले, याचा अर्थ स्तुतीची दरी किंवा आशीर्वादाची दरी.
आणि चौथ्या दिवश ते बराखा (आशीर्वाद) नावाच्या खोऱ्यात एकवट झाले; तेथे त्यांनी परमेश्वराचा धन्यवाद केला; त्या स्थळाचे नाव बराखा खोरे असे आजवर पडले आहे. (२ इतिहास २०: २६)
जेव्हा तुम्ही देवाची स्तुती करता तेव्हा तो तुमच्या भीतीच्या आणि निराशेच्या दरीला स्तुति आणि आशीर्वादाची दरी मध्ये बदलू शकतो.
जेव्हा तुम्ही परमेश्वराला तुमच्या घरात, तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी स्तुति देता, त्याची उपस्थिती ही उतरेल आणि अंधाऱ्या शक्तीला पळावे लागेल. का नाही दररोज एक कुटुंब असे परमेश्वराची स्तुति करावी? तुम्ही संगीत वाद्य किंवा तुमच्या स्मार्टफोन वर सुद्धा काही संगीत वाजवून तुमच्या दिवसाला सुरुवात करू शकता. असे होवो की ते संगीत तुमच्या घरातून एखादया धूपा प्रमाणे पसरवो.
जेव्हा तुम्ही असे करण्यास सुरुवात करता, तुम्ही विलक्षण बदल अनुभवाल. त्या ठिकाणी उभे राहा आणि तेथे काही वेळ परमेश्वराची स्तुति करीतआणि त्या ठिकाणी परमेश्वराचा विजय घोषित करीत घालवा. तुम्ही त्याच्या गौरवाच्या कथेसह साक्ष दयाल.
अंगीकार
सर्व वेळेला मी परमेश्वराची स्तुति करेन; त्याचीस्तुति ही नेहमीच माझ्या ओठावर असेन. म्हणून माझे शोक हे हर्ष करण्यात आणि माझे क्लेश हे येशूच्या नांवात आनंदात बदलतील.
Join our WhatsApp Channel
Most Read
● महान पुरुष व स्त्रिया का पतन पावतात -३● २१ दिवस उपवासः दिवस १८
● अडथळ्याचा धोका
● बदलण्याची वेळ
● परमेश्वराला प्रथम स्थान देणे# २
● वाईटपद्धतींनानष्ट करणे
● चमत्कार करणारा परमेश्वर जो आवश्यकतेपेक्षा अधिक आहे
टिप्पण्या