आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डूकली घेतो, हात उराशी धरून जरा निजतो, असे म्हणत जाशील तर दारिद्र्य तुला दरोडेखोराप्रमाणे, गरिबी तुला हत्यारबंद माणसांप्रमाणे गाठील. (नीतिसूत्रे २४: ३३-३४)
लक्षात घ्या, येथे वरील वचनात"थोडयाशा 3 वेळा" हा उल्लेख आहे.
वरवर पाहिले तर, थोडेसे हे काही अधिक असे वाटत नाही आणि तरीसुद्धा 'थोडयाशा' मध्ये गुंतले तर दिवस हे निघून जातात आणि खऱ्या कामाकरिता वेळ ही निघून गेलेलीअसते.
शेत हे काट्यांनी भरून गेले आहे आणि मनुष्य त्याच्या त्या गुंतण्याचा परिणाम भोगत आहे-गरिबी. कोणीतरी म्हटले आहे,हे थोडेसे चालढकल करण्याने मनुष्य त्याच्या आत्म्याला मलीन करतो.
लूत ला देवदूता द्वारे स्पष्टपणे सांगितले होते जे सदोम व गमोरा नष्ट करण्यासाठी आले होते की येणाऱ्या न्यायापासून वाचण्यासाठी त्याने ताबडतोब तेथून निघून जावे. त्यांचे ऐकण्याऐवजी, तो दिरंगाई करू लागला. तो विषयाला टाळत गेला. ही देवाची दया होती की दूताने त्यास, त्याच्या पत्नीला आणि मुलींना हाताने धरून बाहेर आणले. (उत्पत्ति १९: १५-१६ पाहा)
आपण अनेक वेळेला विचार करतो की जेव्हा आपण चालढकल करतो, ती सवय होऊन जाते आणि शेवटी ती तुमच्या चारित्र्याचा हिस्सा होते.
जेव्हा निर्णय करण्याची वेळ येते, ते नेहमी वाट पाहतात जोपर्यंत खूप उशीर होत नाही, ही आशा ठेवून की गोष्टी ह्या त्यांच्या मनासारख्या होतील. प्रत्यक्षात, हे कधीही घडत नाही.
काय कोणी हे जाणत नाही की निर्णय न करण्यात, ते निर्णय करीत आहेत. कार्य करण्यात त्यांची चूक ही सामान्यतः अधिक लांबच्या पल्ल्यासाठी नकारात्मक परिणाम आणतात.
बायबल चालढकल च्या धोक्याविषयी आपल्याला इशारा देते: "आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तर इस्राएल लोकांनी चीड आणली होती तशी तुम्ही आपली मने कठीण करू नका." (इब्री ३: १५)
सैतानाचा आवडता शब्द हा "उद्या" आहे. जर तो कोणाला मिळवू शकला की त्याने त्याच्या तारणासाठी उद्या पर्यंत उशीर करीत राहावा, तर तो यशस्वी झाला आहे. याउलट, शब्द'आज, हा देवाच्या अंत:करणासाठी फारच प्रिय आहे.
एक रोमन अधिकारी ज्याचे नाव फेलिक्स ज्याची कथा आपल्याला प्रेषित २४:२२-२७ मध्ये मिळते. फेलिक्स आणि त्याची पत्नी द्रुसिल्ला, यांनी तारणाची संधी गमाविली, चालढकल च्या कारणामुळे.
फेलिक्स ने प्रेषित पौलाला हे म्हणत उत्तर दिले, "संधी सापडली' म्हणजे तुला बोलावीन." (प्रेषित २४: २५)
'उद्या' हा फारच धोकादायक शब्द आहे कारण त्याने अनेकांची स्वप्ने हिरावून घेतली आहेत. त्याने विध्यार्थ्यांच्या कारकिर्दीची संधी हिरावून घेतली आहे आणि पिता आणि आई यांचे त्यांच्या लेकरांसोबत संबंध हिरावून घेतले आहेत.
याकोब सुद्धा आपल्याला हे सांगतो की जे आपण देवाच्या वचनाकडून शिकलो आहे ते जर आपण आचरणात आणले नाही, आपण केवळ आपल्या स्वतःलाच फसवीत आहोत (याकोब १:२२). वचन तत्काळ पाळण्याचा निर्णय करा.
उशीर(चालढकल) करू नका.
प्रार्थना
पित्या, येशूच्या नांवात, मी माझ्या स्वतःला तुला समर्पित करतो आणि मी माझा अधिकार येशू ख्रिस्ताच्या नावात घेतो. मी चालढकल आणि संभ्रम च्या आत्म्याला आदेश देतो की आत्ताच माझ्या जीवनातून निघून जावे.
Join our WhatsApp Channel
Most Read
● महान पुरस्कार देणारा● परमेश्वराला तुमचा बदला घेऊ दया
● विश्वासात स्थिर उभे राहावे
● महान पुरुष व स्त्रिया का पतन पावतात -३
● दिवस ११ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● विचार करण्यास वेळ घ्या
● पैसा चरित्राला वाढवितो
टिप्पण्या