मी तुम्हांस शांति देऊन ठेवितो; मी आपली शांति तुम्हांस देतो; जसे जग देते तसे तुम्हांला देत नाही. तुमचे अंत:करण अवस्थ अथवा भयभीत होऊ नये. (योहान १४:२७)
हे शब्द बोलले गेले जेव्हा प्रभु येशू ने ह्या पृथ्वीवरून त्याच्या जाण्याविषयी त्याच्या शिष्यांना जाणीव करून दिली. ते जवळजवळ समारोप चे भाषण होते आणि ते फारच सामर्थ्यशाली होते. शांति विषयी येथे काही महत्वाचे सत्य आहेत जे ह्या एका वचनातून प्राप्त केले जाऊ शकते.
१. शांति ही दिली गेली
"मी तुम्हांस शांति देऊन ठेवितो........"
काही लोक शिकवितात की शांति ही मनाची एक स्थिती आहे जी मानवी प्रयत्न किंवा मानसिक प्रयास द्वारे प्राप्त केली जाऊ शकते. बायबल आपल्याला स्पष्टपणे शिकविते की शांति ही काहीतरी आहे जी आपल्याला स्वतः प्रभु द्वारे दिली जाते.
संपूर्ण जगभर लोक फारच पराकाष्टा करून शांति मिळविण्याचा प्रयत्न करीत आहेत. शांति ही काही अधिक काम करून प्राप्त होत नाही परंतु एक गोष्ट करून आणि ते म्हणजे त्यास शरण जाऊन. बायबल दोन बहिणी, मार्था व मरीया बद्दल बोलते. मार्था ही जे दिसत होते ते करण्यामुळे फारच त्रासली आणि थकली होती तर मरीये ने शरण जाणे व नम्रतेच्या स्थितीत येशूच्या चरणाजवळ बसण्याचे निवडिले होते. ह्या ठिकाणीच तिला शांति प्राप्त झाली होती.
गलती ५:२२ मध्ये बायबल म्हणते, "पण आत्म्याचे फळ हे प्रीति, आनंद, शांति....." शांति हे पवित्र आत्म्याचे एक दान आहे.
मी तुम्हाला प्रोत्साहन देतो की तुमच्या दिवसाची सुरुवात येशूच्या चरणाजवळ बसून प्रार्थना व वचन वाचण्यात करावी. तुम्ही जेव्हा प्रभु बरोबर संगती करता, त्याची दैवी शांति ही तुम्हाला दिली जाईल आणि जेव्हा हे तुम्ही दररोज करीत जाता तेव्हा शांती ही अधिक परिपक्वतेमध्ये वाढत जाईल.
जेथे कोठे तुम्ही जाल, तुम्ही शांतीचा सुगंध पसरवाल. तुम्हाला शांति करणारा म्हणतील, गोंधळ करणारा नाही. लोक जे उच्च पदावर आहेत ते तुमची मागणी करतील.
जरी जेव्हा तेथे तुमच्याभोवती वादळ हे असेल, तुम्ही दैवी शांति मध्ये चालाल कारण आता देवाची शांति ही तुमच्या मध्ये आहे. नेहमी लक्षात ठेवा, देवाची शांति ही सभोवतालच्या गोंधळात एक अद्भुत आराम आहे.
प्रार्थना
पित्या मी तुझा धन्यवाद करतो, येशूच्या बहुमुल्य रक्तासाठी ज्याने तुझ्या व माझ्या मध्ये शांति आणली आहे. येशू ख्रिस्त हा सदा सर्वकाळ माझा प्रभु आणि तारणारा आहे. मी तुझी शांति माझ्या जीवनात प्राप्त करतो. (आता तुमचे हात वर करा, तुमचे डोळे बंद करा आणि हळूहळू व सौम्यपणे येशू म्हणत राहा)
कृपा करून प्रयत्न करा व हे दररोज करा. तुमचे देवाबरोबर आणि मनुष्यांबरोबर चालणे हे बदलेल.
कृपा करून प्रयत्न करा व हे दररोज करा. तुमचे देवाबरोबर आणि मनुष्यांबरोबर चालणे हे बदलेल.
Join our WhatsApp Channel
Most Read
● पवित्र आत्म्यासाठी संवेदनशीलता विकसित करावी-१● दिवस १३:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● २१ दिवस उपवासः दिवस २०
● इतरांवर सकारात्मक प्रभाव कसा टाकावा
● बंदिस्त शक्ती: न वापरलेल्या वरदानांचा नाश
● अश्लील चित्रे पाहण्यापासून स्वतंत्रतेचा प्रवास
● विश्वसनीय साक्षी
टिप्पण्या
