डेली मन्ना
कामाच्या ठिकाणी एक हिरो-१
Tuesday, 19th of April 2022
39
16
1573
Categories :
कामाची जागा
पण परमेश्वराने शमुवेलास म्हटले, तूं त्याच्या स्वरूपावर जाऊ नको, कारण मी त्याला नापसंत केले आहे; मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते; मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृद्य पाहतो. (१ शमुवेल १६:७)
आपण एका शीर्षकाचा अभ्यास करीत आहोत; 'एक व्यक्ति कामाच्या ठिकाणी कसा हिरो होऊ शकतो'. जेव्हा मांजर निघून जाते तेव्हा उंदरे खेळत असतात' हे कामाच्या ठिकाणी सुद्धा तितकेच खरे आहे. जेव्हा बॉस हा बाहेर निघून गेला आहे तेव्हा कर्मचारी वर्ग हे विरंगुळा करीत राहतात. असे लोक हे केवळ मनुष्यांना प्रसन्न करणारे आहेत, देवाला प्रसन्न करणारे नाहीत. ते परमेश्वरासाठी कार्य करीत नाहीत तर केवळ मनुष्यांसाठी. अशी वागणूक अप्रामाणिकपणा व ढोंगीपण स्पष्ट करीत असते. अशा अंत:करणात देवाचे भय अनुपस्थित असते. (कलस्सै ३:२२)
मग यात काही आश्चर्य आहे काय, जेव्हा असे लोक बढती मिळण्यात चुकतात तेव्हा त्यांचे हृदय दु:खाने भरून जाते व ते पूर्णपणे निराशेमध्ये बुडून जातात.
याकोबाच्या जीवनाकडे पाहा; लाबान (त्याचा बॉस) याने अक्षरशः त्याचा वापर (गैरवापर) केला परंतु याकोबाने त्याचे कार्य परमेश्वरासाठी करीत आहे असे केले. त्याने हे कार्य देवाच्या भयाने केले हे जाणून की त्याची बढती ही ना ही पूर्वेकडून ना पश्चिमेकडून ना ही दक्षिणेकडून परंतु ती सेनाधीश परमेश्वराकडून येईल. (स्तोत्र ७५:६)
हे कामाचे मोठे पण नाही ज्याची परमेश्वर पर्वा करतो, परंतु प्रीति ज्याद्वारे ते केले जाते. मला तुम्हाला पवित्र आत्म्या द्वारे हे सांगू दया, परमेश्वरासाठी करीत आहे असे परिश्रमपूर्वक कार्य करा. जर तुमच्या बॉस ने तुम्हाला बढती दिली नाही पण परमेश्वर खात्रीने ती देईल. मग तुम्ही याकोबाप्रमाणे म्हणू शकता, "परमेश्वराने माझे कष्ट व माझ्या हाताचे परिश्रम पाहिले आहे," हालेलुया!
अंगीकार
मी आपली दृष्टि पर्वतांकडे लावितो; मला साहाय्य कोठून येईल? आकाशाचा व पृथ्वीचा निर्माणकर्ता जो परमेश्वर त्याच्यापासून मला साहाय्य येते, जो माझ्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा आहे. (स्तोत्र १२१:१-२; इब्री १२:२)
Most Read
● दिवस १९ : २१ दिवस उपास व प्रार्थनेचे● स्वप्न पाहण्याचे धाडस करा
● तुमचे हृद्य तपासा
● सातत्याचे सामर्थ्य
● त्याच्याद्वारे काही मर्यादा नाही
● त्याचा शोध घ्या आणि तुमच्या युद्धाला तोंड दया
● तुमची सुटका आणि स्वास्थ्याचा उद्देश
टिप्पण्या