english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. दिवस ०३ : २१ दिवस उपास व प्रार्थनेचे
डेली मन्ना

दिवस ०३ : २१ दिवस उपास व प्रार्थनेचे

Wednesday, 14th of December 2022
29 25 1259
Categories : उपास व प्रार्थना

मी मरणार नाही

"मी मरावयाचा नाही, तर जगेन, आणि परमेश्वराच्या कृत्यांचे वर्णन करीन." (स्तोत्र. ११८:१७)

देवाची आपल्यासाठी ही इच्छा आहे की आपल्या नियतीस पूर्ण करावे आणि वृद्ध होऊन मरण पावावे. देवाच्या इच्छेमध्ये तुमच्या जीवनासाठी अकाली निधन किंवा जीवन जे आजार, यातना, दुष्टता आणि रोगाने भरलेले असावे याचा समावेश नाही.

मरण म्हणजे "वेगळे होणे किंवा संपुष्टात येणे". सैतानाची इच्छा आहे की आपल्याला देवापासून वेगळे करावे आणि आपल्यासाठी पृथ्वीवरील कार्यास संपुष्टात आणावे; आपण पूर्ण शक्तीनिशी याचा प्रतिकार करावा आणि त्याच्या शस्त्रांचा नाश करावा.

मरणाचे तीन मुख्य प्रकार आहेत:
१. आध्यात्मिक मरण:
आध्यात्मिक मरण तेव्हा घडते जेव्हा देवाचा आत्मा मनुष्याच्या आत्म्यापासून वेगळा होतो. पहिले मरण जे आदाम व हव्वेने अनुभविले ते आध्यात्मिक मरण होते; त्यांना देवाच्या आत्म्यापासून वेगळे केले गेले होते. "पण बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको; कारण ज्या दिवशी याचे फळ तूं खाशील त्या दिवशी तूं खास मरशील." (उत्पत्ति २:१७)

२. शारीरिक मरण:
शारीरिक मरण म्हणजे शारीरिक शरीरापासून आत्म्याचे वेगळे होणे होय.

आदामाने आध्यात्मिक मरणाचा अनुभव घेतल्यानंतर, शारीरिक मरणाचा अनुभव करण्यासाठी त्यास ९३० वर्षे लागली, परंतु शारीरिक मरण हे आध्यात्मिक मरणाचा परिणाम होता ज्याचा अनुभव देवाची आज्ञा मोडल्यानंतर झाला. "आदामाचे एकंदर आयुष्य नऊशेबारा वर्षांचे झाले; मग तो मरण पावला." (उत्पत्ति ५:५)

३. सार्वकालिक मरण:
सार्वकालिक मरण तेव्हा घडते जेव्हा कोणत्याही उपायाशिवाय, देवाचा आत्मा हा मनुष्याच्या आत्म्यापासून कायमचा वेगळा केला जातो.

७ म्हणून प्रभु येशू प्रगट होण्याच्या समयी ते होईल: तो आपल्या सामर्थ्यवान दूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रगट होईल. ८ तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभु येशूची सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा तो सूड उगवील. ९ ....तेव्हा त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर करण्यात येऊन युगानुयुगाचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल." (२ थेस्सलनीका १:७-९)
'युगानुयुगाचा नाश' या वाक्प्रचारकडे पाहा.

"परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, 'खून करणारे,' जारकर्मी, चेटकी, मूर्तिपूजक, व सर्व लबाड माणसे ह्यांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल; हेच ते दुसरे मरण आहे." (प्रकटीकरण २१:८) दुसरे मरण हे सार्वकालिक मरण आहे.

अकाली मरण येण्याची कारणे
अकाली मरण तेव्हा होते जेव्हा कोणीतरी वयस्कर होण्याअगोदर मरण पावतात; काही लोक ज्या सर्व गोष्टींसाठी त्यांनी परिश्रम केले आहेत त्याचा आनंद घेण्यापूर्वीच मरण पावतात. हे सर्व काही सैतानाचे कार्य प्रगट करते (जिवंत मारणे, हिरावून घेणे आणि नाश करणे, योहान १०:१० पाहा)

  • पापी जीवनशैली
२० आखानाने यहोशवाला उत्तर दिले की, मी खरोखर इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याविरुद्ध पाप केले आहे; आणि मी जे केले ते हे: २१ लुटीमध्ये एक चांगला शिनारी झगा, दोनशे शेकेल रूपे आणि सोन्याची पन्नास शेकेल वजनाची एक वीट ह्या वस्तू मला दिसल्या. तेव्हा मला लोभ सुटून मी त्या घेतल्या. पाहा, माझ्या डेऱ्यामध्ये त्या जमिनीत पुरलेल्या आहेत. रूपे खाली आहे.

२५ यहोशवा म्हणाला, तूं आम्हांला का त्रास दिलास? परमेश्वर तुला आज त्रास देईल. मग सर्व इस्राएलांनी त्याला दगडमार केला व ती सर्व अग्नीने जाळून वर दगड टाकले. २६ त्यावर त्यांनी एक मोठी दगडांची रास केली; ती आजपर्यंत तेथे आहे; मग परमेश्वराचा भडकलेला कोप शमला. ह्यावरून त्या स्थळाला आजवर आखोर (त्रास देणारी) खिंड म्हणत आले आहेत. (यहोशवा ७:२०-२१; २५-२६)

आखान त्याच्या घोर पापामुळे अकाली मरण पावला.
देवाच्या वचनाविरुद्ध सतत अवज्ञा करणे आणि पापी जीवनशैली मरणास आकर्षित करते, मरण प्रगट होण्याअगोदर कदाचित काही वेळ जातो, परंतु ते अवश्य घडते.

  • मनुष्यांची दुष्टता
"त्यांनी आपली जीभ तरवारीसारखी पाजळली आहे; सात्विकाला एकांतात मारावे म्हणून त्यांनी तीरासारखा आपल्या कटू शब्दांचा नेम धरिला आहे." (स्तोत्र. ६४:३)

"मग काइनाचे त्याचा भाऊ हाबेल हयाच्याशी बोलणे झाले; आणि असे झाले की ते शेतात असता काइनाने आपला भाऊ हाबेल याजवर चालून जाऊन त्यास ठार केले." (उत्पत्ति ४:८)

मनुष्याचे अंत:करण हे दुष्टतेचे विचार आणि स्वार्थी हेतूंनी भरलेले आहे. मनुष्यांच्या अंत:करणातील दुष्टपणा त्यांच्या प्रियजनांना व त्यांच्या भोवतालच्या लोकांना मारण्याचे कारण होतो.

  • आध्यात्मिक हल्ले

१७ पुढे अलीशाने सांगितल्याप्रमाणे त्या स्त्रीस गर्भ राहिला आणि वसंतऋतू पुनरपि आला तेव्हा तिला पुत्र झाला.

१८ तो मुलगा वाढून मोठा झाल्यावर एके दिवशी लोक पिकाची कापणी करीत होते तेथे तो बाहेर कापणाऱ्यांकडे आपल्या बापाकडे गेला; १९ तो आपल्या बापास म्हणाला, अरेरे! माझे डोके! माझे डोके! त्याने आपल्या चाकरांस सांगितले, यास त्याच्या आईकडे उचलून ने. 

२० त्याने त्यास त्याच्या आईकडे नेले; तो दोन प्रहारपर्यंत तिच्या मांडीवर होता आणि मग मृत्यु पावला. (२ राजे ४:१७-२०)

या उताऱ्यातील मुलगा कोणत्याही शारीरिक कारणाशिवाय मरण पावला होता. त्याचे डोके व आरोग्यावर हा आध्यात्मिक हल्ला होता. जुन्या करारात, सैतानी शक्तीचे कार्य हे पाहिले जात होते पण समजले जात नव्हते. नवीन करारात, ख्रिस्ताने अंधाराच्या गुप्त कार्यांस उघड केले आणि हया दुष्ट सैतानी आत्म्यांवर आपणांस सामर्थ्य दिले (लूक १०:१९). आध्यात्मिक बाण हे दररोज उडत असतात, आणि देवाच्या सहाय्याशिवाय, लोक हे कोणत्याही समयी दुर्घटनाग्रस्त होऊ शकतात. "रात्रीच्या समयीचे भय, दिवसा सुटणारा बाण, ....ह्यांची तुला भीति वाटणार नाही. (स्तोत्र. ९१:५-६)

आध्यात्मिक हे शारीरिकतेवर नियंत्रण ठेवते, आणि भौतिक क्षेत्रात काहीही घडण्याअगोदर, आध्यात्मिक क्षेत्रात त्यास संपुष्टात आणणे व त्यावर कार्य केले पाहिजे. मरणाच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी सामर्थ्याची आवश्यकता लागते. दावीद राजा शौलाकडून मरणाच्या अनेक सापळ्यांमधून सुटला होता, परंतु हाबेल हा निर्दोष होता, तरी काइनाकडून मारला गेला (१ शमुवेल १८:११-१२; उत्पत्ति ४:८). निर्दोष लोक हे मरण पाऊ शकतात जेव्हा ते शक्तिहीन व अज्ञानी असतात.

आज, आपण प्रार्थना करणार आणि प्रत्येक वाईट योजना जी आपणास मारण्यासाठी रचली गेली आहे त्यास नष्ट करणार आहोत. मी तुमच्या जीवनासाठी भविष्य करीत आहे: तुम्ही मरणार नाही परंतु येशूच्या नावात तुमच्या दैवी नियतीस पूर्ण कराल. येशूच्या नावात तुमच्या जीवनातील काहीही मरणार नाही.
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना अस्त्र तोपर्यंत वारंवार म्हणत राहा जोपर्यंत ते तुमच्या अंत:करणातून येत नाही. केवळ तेव्हाच मग पुढील प्रार्थना अस्त्राकडे वळा. (त्यास वारंवार म्हणा, त्यास व्यक्तिगत करा, आणि असे प्रत्येक प्रार्थना मुद्द्यासह कमीत कमी एक मिनिटे करा.)

१. माझ्या पित्या, माझ्या निर्माणकर्त्या, हे जीवन जे तूं मला दिले आहे यासाठी मी तुझे आभार मानतो व तुला आशीर्वाद देतो. हे परमेश्वरा, मी तुझी उपासना करतो.

२. पित्या, माझ्या कुटुंबियांना व मला कृपा पुरीव की तुझ्या मार्गात चालावे व तुझ्या आज्ञा पाळाव्यात. कृपा करून येशूच्या नावात, या जिवंत लोकांच्या भूमीत आमचे आयुष्य वाढीव.

३. यहोवा, एबिनेजर, माझ्या कुटुंबियांना व मला कृपा पुरीव की माझ्या आयुष्याचे सर्व दिवस तुझे भय धरावे. येशूच्या नावात.

४. माझ्या कुटुंबियांना व मला मारण्यासाठी तयार केलेले प्रत्येक आजार व रोग, हे येशूच्या नावात नष्ट केले जावेत.

५. काहीही दुष्टता जी माझ्या शरीरात पेरली आहे, की मी अकाली मरण पावावे म्हणून रचली आहे, ती पवित्र आत्म्याच्या अग्निद्वारे नष्ट केली जावी.

६. प्रत्येक विचित्र करार व शाप जे माझ्या आयुष्यास व माझ्या कुटुंबाच्या सदस्यांच्या आयुष्यास कमी करू शकते, येशूच्या रक्ताने, येशूच्या नावात काढून टाकिले जावे.

७. रात्रीच्या समयीचे कोणतेही बाण व काळोखात फिरणारी मरी हे मला व माझ्या प्रियजनांना येशूच्या नावात कधीही न गाठो.

८. मी मरणार नाही पण जिवंत राहीन की येशूच्या नावात या जिवंत लोकांच्या भूमीत देवाचे गौरव घोषित करावे.

९. देवाचे पुनरूत्थानाचे सामर्थ्य, येशूच्या नावात, माझ्या जीवनातील कोणतेही मृत गुणधर्म पुन्हा जिवंत करील.

१०. येशूच्या नावात मी माझ्या जीवनातील कोणत्याही मृत व आशाहीन परिस्थितीवर जीवनासाठी बोलत आहे (तुमची आर्थिकता, मुलेबाळे, व्यवसाय इत्यादींवर बोला)

११. तुमच्या प्रार्थनेच्या उत्तरासाठी देवाचे आभार माना (यावेळी चांगला वेळ घालवा.)

Join our WhatsApp Channel


Most Read
● शर्यत जिंकण्यासाठी दोन पी
● देवाच्या चेतावणी कडे दुर्लक्ष करू नका
● नवीन वर्षाच्या शुभेच्छा २०२१ (दिवस २१)
● परमेश्वराची सेवा करण्याचा अर्थ काय आहे-१
● राज्यात नम्रता आणि सन्मान
● परमेश्वर पुरवठा कसा करतो # 3
● चर्चमध्ये ऐक्यता जपणे
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन