"त्यांनी सर्वदा प्रार्थना करावी व खचू नये, ह्याविषयी त्याने त्यांना एक दाखला सांगितला." (लूक १८:१)
एस्तेरची पहिली सहा महिने स्वच्छता, शुद्धीकरण, आणि आतून-बाहेरून सर्व दूषित करणारे घटक काढून टाकण्याच्या तयारीसाठी होते. सतत स्नान आणि गंधरसाच्या तेल लावण्यामुळे त्वचा निखळ, शुद्ध, आणि मऊ झाली. त्याने सुगंधाला खोलवर पसरविले. दुसऱ्या शब्दात एस्तेरकडून अक्षरशः "सुगंध दरवळत" होता. मी हा सुद्धा विश्वास ठेवतो की एस्तेरने राजवाडयात प्रवेश करण्यापूर्वी, सुंगंध जो दरवळत होता त्याने तिच्या आगमनाची घोषणा केली होती, आणि तेव्हा देखील जेव्हा ती व्यक्तीशः राजवाड्यातून माघारी गेली, तीचा सुगंध त्या ठिकाणी दरवळत राहिला होता.
मी विश्वास ठेवतो हे त्या वृद्ध मनुष्याला मारणे, डाग काढून टाकणे, आतील घाण स्वच्छ करणे, आणि जुन्या आचरणी, सवयी, विचारसरणी आणि मर्यादा यांपासून मागे वळणे म्हणून स्पष्टपणे दर्शवित होते. हे राजांच्या राजासमोर हजर राहण्याच्या तयारीचे बदल, स्वच्छता आणि शुद्धिकरणाविषयी बोलते.
जर आपल्याला देवाच्या उपस्थितीत राहावयाचे असेल, तर आपण सतत प्रार्थनामय आचरणात राहण्यास शिकले पाहिजे. १ थेस्सलनीका. ५:१६-१८ मध्ये बायबल म्हणते, "सर्वदा आनंदित असा; निरंतर प्रार्थना करा; सर्व स्थितीत उपकारस्तुति करा; कारण तुम्हांविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे." संभाषण करीत राहणे हे कोणत्याही नातेसंबंधाचा मुख्य जोड आहे आणि तुटलेल्या नातेसंबधाचा पुरावा आहे. यामुळेच येशूने आपल्याला नेहमी प्रार्थना करण्याचा सल्ला दिला आहे.
प्रार्थना करणे हे आपल्याला श्वास घेण्यासारखे असावे. देवाबरोबर संभाषण केल्यावाचून तुम्ही अनेक तास, दिवसें आणि आठवडे जाऊ नाही दिली पाहिजे. कोठेही आणि कधीही प्रार्थना करण्याद्वारे आपण त्याच्या उपस्थितीला अधिक जवळ आकर्षित केले पाहिजे.
आपल्याला एस्तेरविषयी अधिक माहिती नाही, परंतु आपण हे बोलू शकतो ती प्रार्थनेसाठी उत्कट असणारी स्त्री होती. एस्तेर ३:१२-१३ मध्ये बायबल म्हणते, "तेव्हा पहिल्या महिन्याच्या त्रयोदशीस राजाचे लेखक बोलाविण्यात आले आणि राजाचे प्रतिनिधी, प्रत्येक प्रांताचे सुभे, व सगळ्या लोकांचे सरदार यांस हामानाच्या सांगण्याप्रमाणे प्रत्येक प्रांताच्या लिपीत व प्रत्येक जातीच्या लोकांच्या भाषेत (खलिते) लिहून पाठविण्यात आले. अहश्वेरोश राजाच्या नावाने ते लिहुन त्यावर राजाची मोहर केली होती. राजाच्या सर्व प्रांताप्रांतातून जासुदांच्या हस्ते अशा आशयाची पत्रे पाठविण्यात आली की, एकाची दिवशी म्हणजे बाराव्या अदार महिन्याच्या त्रयोदशीस वृद्ध, तरुण, स्त्रिया, मुले अशा सर्व यहूदी लोकांचा विध्वंस, संहार व नायनाट करावा व त्यांची धनसंपत्ती लुटून घ्यावी."
या वचनांत, आपण पाहतो की एस्तेरच्या लोकांविरुद्ध फर्मान काढण्यात आले होते, आणि राजाने त्यांच्या विध्वंसाला मान्यता दिली होती. हा जसे काही संपूर्ण राष्ट्राचा नाश होता, परंतु या होणाऱ्या दुर्दैवी विध्वंसाला एस्तेरचे प्रत्युत्तर काय होते? एस्तेर ४:१६-१७ मध्ये बायबल म्हणते, "जा, शूशन येथले सर्व यहूदी जमवा; माझ्याकरिता उपास करा, तीन दिवस व तीन रात्री अन्नोदक सेवू नका; मीही आपल्या दासीसह तसाच उपास करीन; असल्या स्थितीत नियमाविरुद्ध मी आंत राजाकडे जाईन; मग मी मेल्ये तर मेल्ये. मर्दखयाने जाऊन एस्तेरच्या आज्ञेप्रमाणे सर्व काही केले."
ती अस्वस्थ झाली नाही; ती प्रार्थनेमध्ये देवाच्या उपस्थितीकडे वळली. तिला ठाऊक होते की केवळ राजाच तो निर्णय बदलू शकतो, परंतु राजाकडे विनंती करण्याअगोदर, ती प्रथम राजांच्या राजासमोर उपस्थित झाली. प्रार्थना आणि उपास केल्यानंतर, ती प्रार्थनेच्या सुगंधामध्ये बुडून गेली होती की पर्शियाचा राजा तिला नकार देऊ शकला नाही, आणि निर्णय हा बदलला गेला.
मला विश्वास आहे की सुरुवातीला तिच्या मनात प्रार्थनेविषयी हा विचार देखील असेन. तिने कदाचित प्रार्थना करीत बराच वेळ घालविला असेन कारण तिला ठाऊक होते की शारीरिक सुगंधाकडे त्याच्या मर्यादा आहेत, परंतु प्रार्थनेचा सुगंध गोष्टींना बदलतो. म्हणून आपल्या आंतरिक मनुष्यत्वावर त्याचा परिणाम होईपर्यंत आपण प्रार्थनेच्या श्वासामध्ये जीवन जगले पाहिजे. ही प्रक्रिया मग अशुद्धता काढण्यास सुरु करते आणि आपल्या कठीण वृत्तीला सौम्य करते.
दुसऱ्या शब्दात, प्रार्थना केवळ गोष्टीं बदलत नाही; तर ते आपल्याला सर्वांगाने बदलून टाकते, आणि राजापुढे उभे राहण्यास आपल्याला सज्ज करते. म्हणून या वर्षी, प्रतिदिवशी, प्रार्थनेसाठी एक विशेष वेळ ठेवा. प्रार्थनेस एक जीवनशैली बनवा, आणि देवाबरोबर सतत संभाषण करीत राहा.

प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, मी प्रार्थना करतो की तू मला प्रार्थनेच्या व विनंतीच्या आत्म्याने बाप्तिस्मा दे. प्रत्येक प्रार्थना दोषापासून मला स्वस्थ कर आणि माझ्या प्रार्थनेच्या जीवनास वाढीव. मी फर्मान काढतो की आतापासून माझे जीवन हे प्रार्थनेच्या सुगंधाने भरलेले असावे जे मला आतून-बाहेरून बदलून टाकील. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● देवाच्या कृपेवरून सामर्थ्य मिळविणे● वासनेवर विजय मिळवावा
● प्रभू येशू : शांतीचा स्त्रोत
● परमेश्वराला तुमचा बदला घेऊ दया
● तुमच्या घरातील वातावरण बदलणे-३
● परमेश्वर वेगळ्या प्रकारे पाहतो
● पवित्र शास्त्राच्या संपन्नतेचे रहस्य
टिप्पण्या