"परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन; माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल." (स्तोत्र. ३४:१)
उपासना आपल्याला राजाच्या सुगंधाने झाकून टाकते. वास्तवात, अभिषेकच्या तेलामध्ये भरून राहण्याचा खरा उद्देश देहाच्या कोणत्याही वासाला झाकण्याची क्लुप्ती आहे. हेच राजाला आपल्याबरोबर एकाच खोलीमध्ये राहू देते! मी हे का म्हणत आहे? देवासमोर कोणाही मनुष्याने अभिमान बाळगू नये. (१ करिंथ. १:२९)
राजाच्या उपस्थितीत येण्यासाठी उपासना ही प्रवेश मिळविण्याचे सूत्र आहे. स्तोत्र. १००:१-४ मध्ये बायबल म्हणते, "अहो पृथ्वीवरील सर्व लोकहो, परमेश्वराचा जयजयकार करा, हर्षाने परमेश्वराची सेवा करा; गीत गात त्याच्यापुढे या. परमेश्वर हाच देव आहे हे जाणा; त्यानेच आम्हांला उत्पन्न केले; आम्ही त्याचेच आहोत, आम्ही त्याची प्रजा, त्याच्या कुरणातील कळप आहोत. त्याचे उपकारस्मरण करीत त्याच्या द्वारात स्तवन करीत त्याच्या अंगणात प्रवेश करा; त्याचे उपकारस्मरण करा; त्याच्या नावाचा धन्यवाद करा."
तुम्ही हे सत्य पाहिले काय? तुम्ही राजाच्या उपस्थितीत रागात किंवा उदास मुखाने येऊ शकत नाही. ना ही तुम्ही तक्रार करीत आले पाहिजे; तो कोण आहे आणि त्याने काय केले आहे यासाठी तुम्हांला उपासनेने भरलेल्या आनंदी अंत:करणाने यावयाचे आहे.
एस्तेर ४:१-२ मध्ये बायबल म्हणते, "हे वर्तमान मर्दखयाच्या कानी पडले तेव्हा त्याने आपली वस्त्रे फाडीली; गोणताट नेसून राख फासली आणि नगराच्या मध्यभागी जाऊन मोठयाने आक्रंदन केले; तो राजमंदिराच्या दरवाजासमोरही गेला; गोणताट नेसून राजमंदिराच्या दरवाजाच्या आत येण्याची कोणास परवानगी नसे." हे वचन दाखविते की राजासमोर दु:खी व खिन्न होऊन येणे हा अपमान होता. म्हणजे, जरी मर्दखयाने वाईट बातमी ऐकली होती, तरी राजाच्या उपस्थितीपासून त्याने स्वतःला दूरच ठेवले.
नहेम्या २:१-२ मध्ये देखील, बायबल म्हणते, "अर्तहशश्त राजाच्या कारकीर्दीच्या विसाव्या वर्षी नीसान महिन्यात राजापुढे द्राक्षारस ठेविलेला होता तो मी उचलून राजस दिला यापूर्वी मी कधीही त्याजसमोर खिन्न दिसलो नव्हतो. राजा मला म्हणाला, तूं आजारी नसून तुझे तोंड का उतरले आहे? तुझ्या मनाला काहीतरी खेद होत असला पाहिजे; तेव्हा मी फार भ्यालो."
नहेम्या राजाच्या जवळ होता कारण त्याचे काम हे राजाला द्राक्षारस देण्याअगोदर तो चाखून पाहण्याचा होता. परंतु या दिवशी, तो दु:खी होता, आणि राजा ते उतरलेले तोंड पाहण्याकडे दुर्लक्ष करणार नव्हता कारण त्याच्या उपस्थितीत ही रूढ नव्हती. बायबल म्हणते, नहेम्या घाबरला होता जर राजा वाईट भावनेमध्ये असता, तर
त्याचा वध करण्यास तो आज्ञा देऊ शकला असता.
म्हणून, जसे एस्तेर ही उपासनेच्या सुगंधासह परिधान करून होती, म्हणून आपण सुद्धा तसे केले पाहिजे. आपली जीवने देवाला प्रामाणिक उपासनेद्वारे भरून राहिली पाहिजे. सत्य हे आहे की उपासना देवाला तिचे मधुर सुंगंध देत असते जेव्हा परीक्षा व संकटांच्या अग्नीने केली जाते. स्तुतीचे अर्पण जेव्हा संकटाच्या काळात केले जाते हे राजांच्या राजाला विशेषकरून मधुर आणि प्रसन्न करणारे असते. शंका आणि संशयाऐवजी भरोसा आणि विश्वासाच्या स्थानावरून ही उपासना आहे. एक अर्पण ते आहे ज्याची आपल्याला किंमत लागते. दुसऱ्या शब्दात, आपण आपली उपासना केवळ चांगल्या समयासाठीच मर्यादित नाही ठेवली पाहिजे, परंतु तेव्हा सुद्धा उपासना करावी जेव्हा गोष्टी हया आपल्यासाठी कृपादायक अशा होत नसतात.
डी. ए. कार्सनने एकदा म्हटले, "उपासना म्हणजे नैतिक, संवेदनशील व्यक्तींचा देवाला योग्य प्रतिसाद, सर्व सन्मान, व मूल्य त्यांच्या निर्माणकर्त्या देवाला देणे नेमके याकारणासाठी की तो पात्र आहे, म्हणूनच हर्षाने करावी." राजा दावीद हा अगोदरच अभिषिक्त राजा होता, परंतु त्याच्यासाठी गोष्टी हया योग्य होत नव्हत्या. त्याच्यासाठी जीवनात उलथापालथ होत होती, तरीही त्याने म्हटले, "माझा जीव परमेश्वराच्या ठायी प्रतिष्ठा मिरवील; दीन हे ऐकून हर्ष करितील. तुम्ही माझ्याबरोबर परमेश्वराची थोरवी गा; आपण सराव मिळून त्याच्या नावाची महती वर्णू या" (स्तोत्र ३४:२-३).
म्हणून सर्व लज्जा बाजूला ठेवा, आणि तुमचे अंत:करण उपासनेने भरा. तुमची उपासना हा पुरावा आहे की तुम्ही देवावर विश्वास ठेवता कि त्या आव्हानामधून तुमची सुटका करावी. तुम्ही खूप रडला आहात; आता वेळ उपासनेची आहे.

प्रार्थना
पित्या, येशूच्या नावाने, माझ्या जीवनात तुझ्या चांगुलपणासाठी मी तुझे आभार मानतो. सर्व समयी तुझ्या विश्वासूपणासाठी मी तुझी उपासना करतो. मी तुझ्या पवित्र नामाची स्तुति करतो कारण तू माझ्यासाठी चांगला आहे. मी प्रार्थना करतो की माझ्या उपासनेमध्ये मी सातत्य ठेवून राहावे म्हणून तूं मला मदत कर. मी प्रार्थना करतो की माझे जीवन उपासनेचा सुगंध सतत दरवळत राहील. म्हणून, आजपासून, शोकाची वस्त्रे मी बाजूला ठेवत आहे, आणि मी स्तुतीचे वस्त्र धारण करीत आहे. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● प्रार्थनेचा सुगंध● तुमच्या भविष्यासाठी देवाची कृपा आणि उद्देश स्वीकारणे
● तुम्हांला एकासदुपदेशकाची का गरज लागते
● परमेश्वराचा आनंद
● दैवीव्यवस्था-२
● मानवी स्वभाव
● सार्वकालिकता मनात ठेवून जगणे
टिप्पण्या