"११एके दिवशी असे झाले की तो तेथे येऊन त्या खोलीत उतरला व तेथे निजला. १२त्याने आपला सेवक गेहजी ह्याला म्हटले, "त्या शूनेमकरिणीला बोलावून आण." त्याने तिला बोलावले, आणि ती येऊन त्याच्यापुढे उभी राहिली. १३तो त्या सेवकाला म्हणाला, "तू तिला म्हण, तू आमची काळजी घेण्यात एवढी तत्परता दाखवलीस; तुझ्यासाठी मी काय करावे? राजाकडे किंवा सेनापतीकडे तुझी शिफारस करू काय?" ती म्हणाली, "मी आपल्या लोकांत नांदत आहे." (२ राजे ४:११-१३)
शूनेमकरीन स्त्रीने तिच्या घरावर एक अतिरिक्त घर बनविले होते आणि केवळ देवाचा माणूस, संदेष्टा अलिशासाठी त्यास सामानासह सज्ज केले होते. जेव्हा त्याने जाणले की शूनेमकरीन स्त्रीने त्याच्यासाठी काय केले आहे, तेव्हा तो भावनाविवश झाला आणि त्या बदल्यात तिला आशीर्वाद देण्याची त्याची इच्छा होती. जेव्हा तिच्यासाठी काय केले जाऊ शकते हे विचारले, तेव्हा तिच्याकडे कोणतीही विनंती नव्हती. अलीशाने राजा किंवा सेनापतीकडे शिफारस करू काय असे तिला म्हटले, परंतु तिने ते स्वीकारले नाही. स्त्रीची कोणतीही विनंतीची उणीव, अशी मोठी ऑफर आलेली असताना देखील, तिचा शुद्ध हेतू आणि तिच्या जीवनातील समाधान दर्शवते.
ही स्त्री संदेष्टा अलीशाला सहजपणे दया दाखवत नव्हती म्हणजे ती देवाकडून काहीतरी प्राप्त करू शकेन. मिळविण्यासाठी तिने दिले नव्हते. तथापि, ती एवढी धार्मिक देखील नव्हती की जेव्हा देवाला तिला आशीर्वाद देण्याची इच्छा होती, तेव्हा तिने खोट्या नम्रतेने त्याचा आशीर्वाद नाकारला. तिच्या बक्षीसामागील हेतू पूर्णपणे निस्वार्थी होता. तिने दिले, त्याबदल्यात काहीही मिळविण्याची अपेक्षा ठेवली नाही. मी विश्वास ठेवतो येथे आपल्या सर्वांना जीवनासाठी धडा आहे.
आपले दानधर्म करणे हे देव आणि ज्यांना आपण देतो त्यांच्यासाठी प्रीतीच्या शुद्ध हृदयाने असावे. आपण केवळ यासाठी नाही दिले पाहिजे की त्याबदल्यात पुन्हा प्राप्त करावे. बायबल म्हणते की संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो" (२ करिंथ ९:७).
"तेव्हा मरीयेने अर्धा शेर शुद्ध जटामांसीचे मोलवान सुगंधी तेल घेऊन येशूच्या चरणांना लावले आणि आपल्या केसांनी त्याचे चरण पुसले; तेव्हा त्या सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले." (योहान १२:३)
जटामांसी हे तेल जटामांसीच्या मुळातून काढले जाते, जे भारतात वाढते. जसे योहान उल्लेख करतो, ते फार महाग होते. जटामांसीच्या तेलाचा एक पाऊंड हा ३०० डेणारी एवढा होता जसे यहूदाने ते गणले होते, याचा अर्थ येशूच्या समयी काम करणाऱ्या एका माणसाच्या नऊ महिन्याच्या वेतनाएवढे ते होते.
मरीयेने येशूला दिलेले बक्षीस इतके विलक्षण आणि मूलगामी होते की त्याच्या प्रमुख नेत्यांनीही ते समजू शकले नाही. ते प्रभूसाठी प्रीतीच्या शुद्ध हेतूने केलेले होते. मरीयेचे बक्षीस, प्रीतीच्या हेतूने, प्रकृतीत भविष्यसूचक बनले कारण त्याने येशूला त्याच्या उत्तरकार्याच्या दिवसासाठी तयार केले.
आता मग, पिकाची इच्छा करणे आणि अपेक्षा बाळगण्यात काहीही चूक नाही जेव्हा तुम्ही आर्थिक बी पेरता. तथापि, आपण त्या समजेपर्यंत पोहचले पाहिजे की आपण देतो कारण आपण हे ओळखले आहे की जे सर्व काही आपल्याजवळ आहे ते देवाकडून प्राप्त होते. आपण दानधर्म करतो कारण परमेश्वर त्याच्या राज्याच्या कार्यात निवेश करून जे काही करत आहे त्याच्या अनंत प्रतिफळात आपल्याला भाग हवा आहे. आपण दानधर्म करतो कारण देवाने तसे करण्यास आपल्याला आज्ञा दिली आहे.
देवाबरोबरच्या तुमच्या चालण्यामध्ये जेव्हा तुम्ही परिपक्वतेच्या या पातळीपर्यंत येता, तेव्हा जरी ते कठीण असले तरी तुम्ही दानधर्म करण्यास सुरुवात कराल कारण आता प्रभूसाठी शुद्ध प्रीती हा हेतू आहे. हे तेव्हाच तुमच्या जीवनात, सेवाकार्यात खरा प्रवाह ओसंडून वाहू लागतो. आता तुम्ही त्या ठिकाणावर पोहचला आहात जेथे परमेश्वर मोठ्या गोष्टींसाठी तुमच्यावर भरवसा ठेवू शकतो कारण तुमचे हेतू हे शुद्ध आहेत.
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, तुझा पुत्र, येशू ख्रिस्ताच्या अनमोल बक्षीसासाठी मी तुझा ऋणी आहे. मजमध्ये प्रीती व उदारतेचे हृद्य निर्माण कर. जसे माझे तुझ्यावरील प्रेम बहरते, तसतसे इतरांना निस्वार्थीपणे दानधर्म करण्यास मला मार्गदर्शन कर. येशूच्या नावाने मी प्रार्थना करतो. आमेन!
Join our WhatsApp Channel
Most Read
● आदर आणि मूल्य● वासनेवर विजय मिळवावा
● लैंगिक परीक्षेवर वर्चस्व कसे मिळवावे
● तुम्ही अजूनही का वाट पाहत आहात?
● नरक हे खरे स्थान आहे
● बीज चे सामर्थ्य - २
● वारा जो डोंगराला देखील सरकवतो
टिप्पण्या