लोकांना सुटका देण्याच्या सेवाकार्याच्या प्रक्रीयेमध्ये, मला अनुभव आला आहे ज्यामध्ये प्रभावित व्यक्तीमधील भुताने स्पष्ट केले जे काहीतरी यासारखे सांगितले की, "मी जाणार नाही कारण त्याने मला कायदेशीर अधिकार दिला आहे की त्याच्या शरीरात वास करावा." हे महत्वाचे आहे की अशा परवानगीवर विचार करावा आणि भुताचा अधिकार ध्वस्त करावा जेणेकरून प्रभावी आणि टिकणारी सुटका प्राप्त करावी.
"प्रवेशाची ठिकाणे" समजणे किंवा अवज्ञाचा भाग जेथे भुते आपल्या जीवनात बालेकिल्ला प्राप्त करू शकतात हे या प्रक्रियेचा मुख्य पैलू आहे. जर अशा प्रवेशाच्या ठिकाणावर पूर्णपणे उपाय केला गेला नाही, तर खरेच सुटका प्राप्त होऊ शकत नाही. या प्रकारात, आजपासून सुरुवात करून, या समस्यांचे निराकरण करणे आणि विश्वासणाऱ्यांना समर्थ करणे की सुटका केवळ त्यांच्यासाठीच प्राप्त करू नये परंतु इतर जे गरजेमध्ये आहेत त्यांना देखील सुटकेची सेवा करावी या उद्देशाने मी सर्वसमावेशक मालिका शिकविणार आहे.
जसे आपण या मालिकेस प्रारंभ करत आहोत, असे होवो की तुम्ही ज्ञान व पारखन्याच्या आत्म्याने भरून जावे की तुमच्या जीवनात आणि ज्यांना सेवा देत आहात त्यांच्या जीवनात ह्या गोष्टी ओळखाव्या आणि ती प्रवेशाची ठिकाणे बंद करावी.
प्रतिदिवशी, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही दररोजचा भक्तिविषय (दररोजचा मान्ना) जितके शक्य होईल तितके सांगत राहावे. म्हणजे, एकत्र मिळून आपण भुतांच्या अत्याचाराची साखळी मोडणे आणि ज्या पूर्ण सुटकेचे देवाने त्याच्या लेकरांसाठी आश्वासन दिले आहे त्याचा अनुभव करण्याच्या उद्देशाने कार्य करू शकतो.
१. पापाच्या सवयीचे आचरण
पाप हे उल्लंघनाचे किंवा देवाद्वारे दिलेले नियमशास्त्र व आज्ञा मोडणे आहे. हे त्याच्या दैवी इच्छेविरुद्ध बंडखोरी प्रतिनिधित करते आणि ते तात्पुरते किंवा कायमच्या परिणामाकडे नेऊ शकते. पाप हा मानवी स्वभावाचा एक व्यापक पैलू आहे आणि प्रत्येक व्यक्ति अपरिहार्यपणे देवाच्या परिपूर्ण मानकांपासून कमी पडतो (रोम. ३:२३).
व्यक्ति दोन प्रमुख मार्गांनी पाप करतात: ती कृत्ये करण्याद्वारे जी नैतिकदृष्टया चुकीची आहेत आणि देवाच्या आज्ञांच्या विरुद्ध आहेत आणि ती कृत्ये करण्यास चुकतात जी नैतिकदृष्टया योग्य आहेत आणि देवाच्या इच्छेनुसार आहेत.
"८ आपल्या ठायी पाप नाही असे जर आपण म्हणत असलो [आपण पापी आहोत याचा नकार करत असलो], तर आपण स्वतःला फसवतो, व आपल्या ठायी सत्य [जे सुवार्ता सादर करते] नाही.[ते आपल्या हृदयात नाही]
९ जर आपण [स्वतः] आपली पापे पदरी घेतली, तर तो विश्वसनीय व न्यायी आहे [त्याचा स्वभाव व आश्वासनाशी खरा आहे] म्हणून आपल्या पापांची क्षमा करील [आपला अधर्म फेटाळून लावेल], व आपल्याला सर्व अनीतीपासून [उद्देश, विचार आणि कृत्यांमध्ये जे काही त्याच्या इच्छेनुरूप नाही] शुद्ध [सतत] करील." (१ योहान १:८-९)
तथापि, हे ओळखणे महत्वाचे आहे की जेव्हा आपण सतत किंवा वारंवार पाप करत राहतो, तेव्हा आपण प्रभावीपणे त्या पापाला शरण जातो, आणि त्याद्वारे गुलाम होतो.
आज्ञापालनाकरता ज्याला तुम्ही स्वतःस गुलाम असे समर्पण करता, ज्याची आज्ञा तुम्ही मानता त्याचे तुम्ही गुलाम आहात. ज्याचा परिणाम मरण आहे अशा पापाचे गुलाम किंवा ज्याचा परिणाम नीतिमत्व आहे अशा आज्ञापालनाचे तुम्ही गुलाम आहात हे तुम्हांला ठाऊक नाही काय?" (रोम ६:१६)
जितके अधिक आपण एखादया विशेष पापास शरण जातो, तितके अधिक आपण त्याच्या प्रभावाशी समरूप होतो. पापाचे हे वर्चस्व आपल्या जीवनावर आपल्या चारित्र्याला वळण देते आणि आपल्या ओळखीसाठी महत्वपूर्ण योगदान करते.
सतत पापात जगणे हे एखादया धोकादायक चक्राकडे नेऊ शकते, जेथे आपण त्याच्या नियंत्रणात अधिक संवेदनशील होतो, आणि त्याच्या विळख्यातून निघण्यास कमी समर्थ होतो. सतत पाप करण्याची सवय जिचा आपण पश्चाताप केला नाही आणि देवाजवळ कबूल केले नाही ते मग एक उघडे द्वार निर्माण करते ज्याद्वारे दुष्टात्मा आपल्या जीवनात प्रवेश करू शकतो. ते मग भुतांच्या शक्तीला कायदेशीर अधिकार देतात की त्या भागांवर नियंत्रण करावे जेथे अवज्ञा घडते.
यामुळेच हे विश्वासणाऱ्यांसाठी महत्वाचे आहे की त्यांच्या जीवनात पाप ओळखणे आणि त्यावर उपाय करण्यास जागृत असावे. प्रामाणिक कबुली आणि मनापासून पश्चाताप करण्याद्वारे, आपण देवाकडून क्षमा आणि पुनर्स्थापना मागू शकतो. आपल्या सर्व अधार्मिकतेपासून शुद्ध करण्यास आणि पापाच्या गुलामगिरीच्या सामर्थ्यावर वर्चस्व करण्यास आपल्याला समर्थ करण्यास त्याची कृपा पुरेशी आहे.
तुमची कृत्ये व विचारांवर लक्ष देण्यासाठी थोडा वेळ दया: "कोणते विशेष पाप मी सतत केले आहे? कोणती नकारात्मक वागणूक किंवा भावना ज्यास मी सतत बळी पडलो आहे, जसे चिंता, भय, धडकी, क्रोध, निंदा, तक्रार, मत्सर, क्षमाहीनता किंवा इतर पापे?" जर तुम्ही स्वतःला सवयीचे किंवा सतत करणाऱ्या पापामध्ये पाहता, तर तुम्ही अनवधानाने स्वतःला भूतबाधा होण्याच्या जोखीमासाठी उघडे केले आहे. त्यामुळे, ह्या पद्धतींना ओळखणे महत्वाचे आहे आणि त्यांवर तत्काळ उपाय करावा की त्यांच्या विळख्यामधून मुक्त व्हावे, त्यामुळे स्वतःचे दुष्टात्म्याच्या प्रभावापासून संरक्षण करावे आणि आध्यात्मिक वाढ व आरोग्यासाठी मार्ग मोकळा करावा.
प्रार्थना
1. पित्या, माझ्या संपूर्ण अंत:करणापासून मी तुला हाक मारीत आहे, आणि तुला विनंती करीत आहे, की तुझ्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने, मला त्या भयानक विळख्यातून मुक्त कर जे ह्या सवयीमुळे माझ्या जीवनावर आहे! (सवयीचे नाव/नावांचा उल्लेख करा.) येशूच्या नावाने.
2. तो जो जगामध्ये आहे त्याच्यापेक्षा तो जो मजमध्ये आहे तो मोठा आहे. मला ठाऊक आहे की तू शत्रूपेक्षा मोठा आहे. आणि या वाईट सवयीवर विजय मिळविण्यास मला साहाय्य करू शकतो! माझ्या जीवनावरील प्रत्येक सैतानी प्रभावाला मी आज्ञा देत आहे, येशूच्या शक्तिमान नावात तुझी पकड सैल कर!
3. प्रभु येशू, तुझ्या विजयासाठी मी तुझे आभार मानतो जी तू अगोदरच वधस्तंभावर जिंकली आहे. वाईट सवयी आणि पापी पद्धती ज्यांनी माझे जीवन त्रस्त केले आहे त्यांवर मी विजयाचा हक्क दाखवितो. स्वतंत्रता आणि अधिकारामध्ये चालण्यास मला साहाय्य कर जे तू मला तुझे लेकरू म्हणून दिले आहे.
Join our WhatsApp Channel
Most Read
● नरक हे खरे स्थान आहे● येथून पुढे अस्थिरता नाही
● संयम आत्मसात करणे
● याबेस ची प्रार्थना
● शेवटच्या समयाचे गुपित: भविष्यात्मक पहारेकरी
● इतरांवर सकारात्मक प्रभाव कसा टाकावा
● देवाने-दिलेले सर्वात उत्तम स्त्रोत
टिप्पण्या