असामान्य कृपा ही मोकळी केले जाते जेव्हा असामान्य मध्यस्थी करणारा तुमच्यासाठी प्रार्थना करतो
प्रेषित १२ मध्ये, त्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतल्या काहीं जणांस छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला; आणि योहानाचा भाऊ याकोब ह्याला त्याने तरवारीने जिवे मारले. ते यहूदी लोकांना आवडले असे पाहून तो पेत्रालाही पकडून तुरुंगात टाकले. हे पाहून चर्च आग्रहाने मध्यस्थी करू लागले, देवाला हे मागू लागले की पेत्राला मुक्त कर. चर्च च्या ह्या कळकळीच्या प्रार्थनेच्या प्रत्युत्तरात, देवाने चमत्कारीतरित्या तुरुंगाचे दरवाजे उघडले आणि पेत्राला मुक्त केले.
जेव्हा पहाऱ्याचा पहिला आणि दुसरा दरवाजा त्यांनी ओलांडला, ते लोखंडी दरवाजा जवळ आले जो शहरात जातो, जो आपोआप त्यांच्यासाठी उघडला गेला; आणि ते बाहेर पडून पुढे एक रस्ता चालून गेले, तोच देवदूत त्याला सोडून गेला.
मग पेत्र भानावर येऊन म्हणाला, आता मला खरोखर कळले की, प्रभूने आपला दूत पाठवून हेरोदाच्या तावडीतून व यहूदी लोकांचा संपूर्ण अपेक्षाभंग करून मला सोडविले आहे. (प्रेषित १२: १०-११)
हे असे नाही कोणीही प्रार्थना करेल आणि असामान्य कृपा ही पुरविली जाईल परंतु लोक ज्यांस दृष्टांत पाहण्याचे ओझे आहे जे तुमच्या मनात आहे ते प्रकट होते! असे लोक जे तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहेत ते तुमच्या जीवनात असामान्य कृपा मोकळी करतील. पेत्राच्या प्रकरणात, लोक जे त्याच्यासाठी प्रार्थना करीत होते ते केवळ काही धार्मिक विधी मध्ये भाग घेत नव्हते. त्यांनी पेत्रावर प्रीति केली होती आणि त्यांना हे पाहिजेच होते की त्याने मुक्त व्हावे.
२. प्रत्येकाला मध्यस्थी करणाऱ्याची गरज आहे
"ओह! तो मनुष्य देवाबरोबर मध्यस्थी आणि विनंती करीत होता [माझ्यासाठी]
त्याचे शेजारी आणि मित्रांसोबत एक मनुष्य म्हणून. (ईयोब १६: २१)
वरील वचन त्या वाक्याच्या सत्याला ठळकपणे स्पष्ट करीत आहे: ह्या पृथ्वी ग्रहावर प्रत्येक व्यक्तीला एका मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीची खूपच गरज आहे.
जरी प्रेषित पौल स्वतः प्रार्थना करणारा एक महान योद्धा होता आणि देवा द्वारे महानरित्या उपयोगात आणला गेला होता, तरी त्याने नेहमी चर्च ला त्याच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगितले होते.
बंधुजनहो, आपल्या प्रभु येशू ख्रिस्तामुळे व आत्म्याच्या द्वारे निष्पन्न झालेल्या प्रेमामुळे मी तुम्हांला विनंती करितो की माझ्यासाठी देवाजवळ माझ्याबरोबर आग्रहाने प्रार्थना करा. (रोम १५: ३०)
मी नम्रपणे तुम्हाला विनंती करीत आहे की माझ्यासाठीं, माझ्या कुटुंबासाठी आणि माझ्या संघा साठी दररोज प्रार्थना करा म्हणजे ज्यासाठी परमेश्वराने मला पाचारण केले आहे त्यामध्येमी सतत विश्वासू आणि प्रभावी व्हावे.
परमेश्वर मध्यस्थी करणारे शोधत आहे
खरे मध्यस्थी करणारे हे फार थोडे आहेत. तेदुर्मिळ असे लोक आहेत. यात काही आश्चर्य नाही की परमेश्वर स्वतः मध्यस्थी करणारे शोधत आहे.
परमेश्वराने म्हटले हे बोलत, "मी भूमीचा नाश करू नये म्हणून तिच्यातला कोणी तट बांधील कोण मजसमोर देशांसाठी तटाच्या खिंडीत उभा राहील की काय याची मी वाट पाहिली; पण मला कोणी आढळला नाही." (यहेज्केल २२: ३०)
परमेश्वराकडेत्याच्या हृदयात एक विशेष स्थान आहे त्या लोकांसाठी, ते जे मध्यस्थी करतात, ते जे कोणासाठी तरी खिंडीत उभे राहतात.तुम्ही एक मध्यस्थी करणारे म्हणून त्याच्या वाणीला ऐकाल काय आणिशत्रूच्या-सैतानाच्या योजनांना उलथून टाकाल आणि थांबवाल. परमेश्वर निश्चितच तुमचा आदर करेल.
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना मुद्द्यांसाठी कमीतकमी ३ मिनिटे किंवा जास्त वेळ प्रार्थना केली पाहिजे.
व्यक्तिगत आध्यात्मिक वाढ
पवित्र आत्म्या, माझे कान उघड की मध्यस्थी करण्यासाठी तुझी वाणी स्पष्टपणे ऐकावी. मी माझे हृदय उघडतो आणि एक मध्यस्थी होणारा असे स्वीकारतो. तुझ्याआत्म्या द्वारे सामर्थ्यशाली होतो की मध्यस्थी करावी. येशूच्या नांवात. (आता काही वेळ मध्यस्थी करीत घालवा) १. तुमचे कुटुंब आणि नातेवाईकांच्या तारणासाठी २. लोक जे केएसएम उपासनेला येतात त्यांच्या तारणासाठी
कुटुंबाचे तारण
माझ्या व माझ्या कुटुंबाच्या सदस्यांच्या जीवनात शांतीला अडथळा करणारी प्रत्येक शक्ती उपटून काढली जावो, येशूच्या नांवात. असे होवो की तुझी शांति माझ्या व माझ्या कुटुंबांच्या जीवनात राज्य करो.
आर्थिकतेचा नवीन मार्ग
मी आणि माझ्या कुटुंबाचे सदस्ये हे पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असावे. जे सर्व काही आम्ही करू ते संपन्न होईल, देवाच्या गौरवाकरिता (स्तोत्र १:३). आम्ही खचणार नाही, कारण यथाकाळी आम्ही योग्य कापणी करू. (गलती ६:९)
केएसएम चर्च
पास्टर मायकल व त्याच्या कुटुंबाचे सदस्ये, व संघ सदस्यांच्या जीवनात शांतीला अडथळा करणारी प्रत्येक शक्ती, येशूच्या नांवात उपटून काढली जावो. असे होवो की तुझी शांति त्यांच्या जीवनात राज्य करो.
देश
प्रभु येशू, तूं शांतीचा राजकुमार आहे. आमच्या देशाच्या सीमेवर शांति व्हावी म्हणून आम्ही प्रार्थना करतो. आम्ही प्रार्थना करतो की आमच्या देशाच्या प्रत्येक शहरात व राज्यात शांति राज्य करो.
Join our WhatsApp Channel
Most Read
● सुटकेचा दिवस (दिवस १०)● जीवन हे रक्तात आहे
● तुमचे तारण झालेच्या दिवसाचा उत्सव करा
● येशू एक बाळ म्हणून का आला
● वर घेतले जातील (रैप्चर) केव्हा होईल?
● क्षमेसाठी व्यावहारिक पाऊले
● महानतेचे बीज
टिप्पण्या