एका स्त्रीजवळ दहा नाणी होती आणि एक गमावले. हरवलेले नाणे, जरी अंधाऱ्या, अदृश्य ठिकाणी असले तरी, त्यास मूल्य होते. "तिने त्या नाण्याचे मूल्य जाणले." आपल्या जीवनात, आपल्याला कदाचित हरवलेले, अदृश्य, आणि अयोग्य असे वाटेल परंतु देवाच्या दृष्टीसमोर, आपले मूल्य अतुलनीय आहे. "आपण सत्कृत्ये करावीत म्हणून ख्रिस्त येशूच्या ठायी निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत; ती सत्कृत्ये आचरत आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजून ठेवली." (इफिस. २:१०)
अंधारात प्रकाश:
हरवलेल्या नाण्याच्या शोधात, "अंधारामुळे तिने दिवा पेटवला,- पेटवलेल्या दिव्याने तिला नाण्याच्या तिच्या शोधात साहाय्य केले." प्रकाश हा देवाच्या वचनाचे प्रतीक आहे जे आपल्या मार्गाला प्रकाश देते, लपलेल्या गोष्टी प्रकट करते, आणि आपल्या आध्यात्मिक प्रवासात मार्गदर्शन देते. स्तोत्रकर्ता घोषित करतो, "तुझे वचन माझ्या पावलांसाठी दिव्यासारखे व माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे" (स्तोत्र. ११९:१०५). आपण, जे चर्च आहोत, ते या दिव्य प्रकाशाने संपन्न आहोत आणि जगाच्या अंधाऱ्या कोपऱ्यात त्याचा प्रसार करण्याचे काम त्यांना दिले आहे, लपलेला खजिना शोधून काढणे-हरवलेले आत्मे जे तारणासाठी आतूर आहेत.
तीव्र शोध:
स्त्रीचा शोध हा औपचारिक नव्हता; तो हेतुपुरस्सर आणि तीव्र होता. चर्च, जे पवित्र आत्म्या द्वारे मार्गदर्शित होते, त्याने हरवलेल्यांना शोधण्यात अशी तीव्रता प्रतिबिंबित केली पाहिजे, गहन, प्रगाढ प्रीतीवर जोर द्यावा जे प्रभू प्रत्येक व्यक्तीला देतो. "परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हांला सामर्थ्य प्राप्त होईल, आणि यरुशलेमेत, सर्व यहूदीयात, शोमरोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल" (प्रेषित १:८). यामुळेच आम्ही करुणा सदन सेवाकार्य येथे मध्यस्थीला गंभीरपणे घेतले पाहिजे. मध्यस्थी कृपा आणि सामर्थ्य मोकळे करील की आपण सुवार्ता सांगण्यासाठी अथक आणि हेतुपुरस्सर असणे आवश्यक आहे, हे समजणे की प्रत्येक आत्मा हा प्रभूसाठी खजिना आहे.
शुद्धीकरण आणि प्रतिबिंब:
घर झाडणे हे केवळ परिश्रमपूर्वक शोध करणे नाही परंतु प्रत्येक चर्चमध्ये शुद्धीकरण आणि प्रतिबिंबाचे प्रतीक देखील आहे. "म्हणून आपली हृदये सिंचित झाल्याने दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खऱ्या अंत:करणाने व विश्वासाच्या पूर्ण खातरीने जवळ येऊ" (इब्री. १०:२२). हे आपल्यासाठी महत्वाचे आहे की ते स्वयं सतत तपासावे, त्यास आतून शुद्ध करावे, की या जगामध्ये ख्रिस्ताच्या प्रकाशाचे प्रखर प्रतिबिंब व्हावे.
पुनर्स्थापनेमध्ये आनंद करणे:
जेव्हा स्त्रीला नाणे सापडले, तेव्हा तिने आनंद केला आणि तिच्या शेजाऱ्यांना बोलावले की तिच्या आनंदात सहभागी व्हावे. हा उत्कट आनंद पश्चाताप करणाऱ्या एका पापी व्यक्तीबद्दल स्वर्गीय आनंदाचे प्रतिनिधित्व करतो. "त्याप्रमाणे, पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांसमोर आनंद होतो, हे मी तुम्हांला सांगतो" (लूक १५:१०). प्रभू आणि हरवलेल्यांमधील पुनर्स्थापित संबंध हे दैवी उत्सवासाठी कारण आहे, जे तारणाचा शाश्वत स्वभाव प्रतिबिंबित करते.
आज, मी तुम्हांला नम्रपणे विनंती करतो की आपल्यातील प्रत्येकासाठी असणाऱ्या देवाच्या अपार प्रेमावर चिंतन करा. वेळ फार थोडा आहे. तुम्हांला व मला आपल्या सभोवतालच्या लोकांपर्यंत पोहचण्याची गरज आहे. घाबरू नका; तो आपल्याला समर्थ करेल. त्याचवेळी, ख्रिस्ताची प्रीती सांगण्यासाठी ज्ञानाचा वापर करा. जेव्हा तुम्ही हे करता, तेव्हा स्वर्गात आनंद प्रकट होईल.
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, आमच्या मार्गाला प्रकाशित करण्यासाठी आम्ही तुझ्या कृपेची मागणी करतो, आमची अंत:करणे शुद्ध कर आणि हरवलेलेल्यांसाठी आमच्या शोधाला तीव्र कर. आम्ही तुझे अमर्याद प्रेम प्रतिबिंबित करावे आणि तुझ्या शाश्वत वैभवासाठी पुन्हा प्राप्त केलेल्या प्रत्येक आत्म्याचा उत्सव साजरा करावा असे होऊ दे. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● २१ दिवस उपवासः दिवस ०२● दुर्मिळ गोष्ट जी आज मिळते
● चांगले हे उत्तमतेचे शत्रू आहे
● परमेश्वर पुरवठा कसा करतो # 4
● दिवस १४:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● आदर व ओळख प्राप्त करा
● तुमचा गुरु कोण आहे - I
टिप्पण्या