डेली मन्ना
तुमच्या भविष्यासाठी देवाची कृपा आणि उद्देश स्वीकारणे
Monday, 16th of October 2023
34
21
906
“पूर्वीच्या गोष्टींची आठवण करू नका, जुन्या गोष्टी मनात आणू नका. पाहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे; आत्ताच ती उद्भवत आहे; तुम्ही ती पाहणार नाही काय? मी अरण्यात सडक करीन, मरुभूमीत नद्या वाहवीन.” (यशया ४३:१८-१९)
अस म्हटलं जात की नियती सुखाच्या ऋतूंऐवजी संघर्षाच्या ऋतूमध्ये प्रकट होते. जेव्हा आपण बायबलच्या इतिहासाकडे पाहता, तेव्हा आपल्याला या विधानाच्या प्रतिध्वनीचे सत्य सापडते. मोशेचा फारोबरोबर संघर्ष झाला, दाविदाने गल्ल्याथचा सामना केला, आणि प्रभू येशूला नरकाच्या क्रोधाचा सामना करावा लागला. संघर्षाच्या प्रत्येक क्षणाने त्यांच्या जीवनासाठी एक मोठी योजना आणि उद्देश प्रकट केला, एका दैवी नियतीस चिन्हित केले.
पण पुढे काय आहे हे खऱ्या अर्थाने आत्मसात करण्यापूर्वी आपण हे लक्षात ठेवू या की, आपण आपल्या भूतकाळाशी जुळवून घेतले पाहिजे. भूतकाळातील चुका, अपयश किंवा गमावलेल्या संधींनी पछाडले जाणे असामान्य नाही. आणि, बऱ्याच वेळा, आपण स्वतःचे सर्वात वाईट टीकाकार बनतो, आपण ज्यास भूतकाळातील कमकुवतपणा समजतो त्याबद्दल स्वतःला शिक्षा करतो. कधी कधी, आपण फक्त इतरांना दोष देतो. सुवार्ता ही आहे की देव आपल्याला आपल्या भूतकाळाच्या दृष्टीकोनातून पाहत नाही.
फिलिप्पै. ३:१३-१४ मध्ये, प्रेषित पौल लिहितो, “बंधुंनो, मी अद्यापि ते आपल्या कह्यात घेतले असे मानत नाही; तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून, ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्यासंबंधीचे बक्षीस मिळवण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो; हेच एक माझे काम.”
जेव्हा आपण आपल्या मागच्या आठवणींमध्ये अडकतो, तेव्हा देव आपल्या जीवनात जी नवीन गोष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे ते समजण्यात ते अडथळा बनते. आपली खरी ओळख पाहणे कठीण होऊन जाते, जी देवाच्या प्रतिमेत रचलेली असते. हा तो दृष्टांत नाही जो आपण बाळगावा अशी देवाची इच्छा आहे. त्याच्या कृपेने आणि दयेने रंगलेल्या भविष्यात पाऊल ठेवण्यासाठी आपण लाजेच्या बंधनातून मुक्त व्हावे अशी त्याची इच्छा आहे.
योहान ८ मध्ये येशूचा जेव्हा व्यभिचारात सापडलेल्या स्त्रीशी सामना झाला, तेव्हा त्याने तिला दोषी ठरवले नाही, जरी नियमशास्त्राने म्हटले की तिला दगडमार केला पाहिजे. त्याऐवजी, त्याने तिला म्हटले, मी देखील तुला दोष देत नाही; जा आणि येथून पुढे पाप करू नको.” येशूने तिजवर कृपा केली, एका नवीन सुरुवातीसाठी एक संधी. एखाद्याच्या भूतकाळाला त्यांच्या भविष्यासाठी लाज वाटू न देण्याचे हे एक प्रगल्भ उदाहरण होते.
आता, तुम्ही कदाचित विचार करत असाल, “ते सर्व चांगले आणि उत्तम आहे, पण मी ते कसे सोडून देऊ? तो एक वैध प्रश्न आहे आणि उत्तर, साधारण असतानाही, आत्मसमर्पण व विश्वासाची मागणी करते.
१ पेत्र. ५:७ आपल्याला प्रोत्साहन देते, “त्याच्यावर तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो.” तुमचा भूतकाळ त्याच्या पायावर ठेवून सुरुवात करा. देव तुमच्यावर शाश्वत प्रीतीने प्रेम करतो. त्याची कृपा आपली सर्व पापे, चुका आणि उणीवा झाकण्यासाठी पुरेशी आहे. त्याच्या दयेवर भरवसा ठेवा, ती दररोज सकाळी नवीन होते.
जेव्हा तुम्ही पुढे चालता, तेव्हा लक्षात ठेवा की देवाची योजना तुमच्या जीवनासाठी हानी पोहचवण्यासाठी नाही तर तुम्हांला आशा आणि भविष्य देणारी आहे (यिर्मया २९:११). तो तुम्हांला त्याच्या आशीर्वादाने भरून नियतीसाठी तयार करत आहे, आणि संघर्षाचा प्रत्येक ऋतू फक्त तुम्हांला आकार देत असतो, तुम्हांला घडवत असतो, आणि त्या दैवी आव्हानासाठी तुम्हांला परिष्कृत करत असतो.
प्रार्थना
प्रिय स्वर्गीय पित्या, माझ्या भूतकाळास सोडण्यास, तुझी कृपा स्वीकारण्यास, आणि तू माझ्यासाठी तयार केलेल्या नियतीमध्ये पाऊल टाकण्यासाठी मला मदत कर. जेव्हा मी तुझ्या उद्देशामध्ये चालतो तेव्हा मला धैर्य, आशा आणि प्रीतीने भर. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● राजवाड्याच्या मागील माणूस● त्याच्या सिद्ध प्रितीमध्ये स्वतंत्रता प्राप्त करणे
● दिवस ०५:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● अडथळ्यांपासून ते पुनरागमनापर्यंत
● जिवासाठी देवाचे औषध
● नवीन वर्षाच्या शुभेच्छा २०२१ (दिवस २१)
● हेतुपुरस्सर शोध
टिप्पण्या