“तसेच ज्याप्रमाणे लोटाच्या दिवसांत झाले, त्याप्रमाणे होईल,.... .” (लूक १७:२८)
जगात आज, आपण नमुने आणि प्रवृत्तींचे निरीक्षण करतो जे भूतकाळातील सभ्यता आणि त्यांचे उल्लंघन करतात. विशेषतः दू:खाची गोष्ट म्हणजे आपल्या सध्याची संस्कृती आणि लोटाच्या काळामध्ये समांतरता आहे, तो काळ जेव्हा सदोम व गमोरा ह्यांच्या नैतिक पतनाचा अत्यंत ऱ्हास झाला होता. आपल्याला उत्पत्तीमध्ये आठवण दिली आहे की सूर्य उदय पावला आहे , लोक त्यांच्या दैनंदिन जीवनाच्या कामात व्यस्त झाले आहेत, आणि नाश होण्याचे कोणतेही तत्काळ चिन्ह दिसले नाही. तरीही, अनेकांना अज्ञात असलेला, न्याय हा क्षितिजावर होता.
सदोम हा त्याच्या अत्यंत लैंगिक अनैतिकतेने सूचित होता, इतके अधिक की देवदूत जे लोटाच्या भेटीला आले होते त्यांच्यासह समागम करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, त्यांच्याबरोबर अनैतिक संबंधाची इच्छा केली (उत्पत्ती १९:१-५). त्यांचा उद्धटपणा आणि नैतिक संयमाचा अभाव खरोखरच धक्कादायक आहे. आजच्या वातावरणात, समाज वाढत्या सीमांना ओलांडत आहे आणि शारीरिक इच्छांच्या मुलभूत तत्वांकडे दुर्लक्ष करण्यासह ईश्वरी मूल्यांकडे उघड उपेक्षा करताना आपणही अनेकदा पाहतो.
तरीही, यामध्ये, बायबल मार्गदर्शन, शहाणपण आणि आशा पुरवते. २ तीमथ्यी ३:१-५ मध्ये प्रेषित पौलाने लिहिले, “शेवटल्या काळी कठीण दिवस येतील हे समजून घे. कारण माणसे स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदक, आईबापांना न मानणारी, उपकार न स्मरणारी, अपवित्र, ममताहीन, शांतताद्वेषी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी, विश्वासघातकी, हूड, गर्वाने फुगलेली, देवावर प्रेम करण्याऐवजी सुखाविलासाची आवड धरणारी, सुभक्तीचे केवळ बाह्य रूप दाखवून तिचे सामर्थ्य नाकारणारी अशी ती होतील; त्यांच्यापासून दूर राहा.” पौलाचे म्हणणे हे भीती देण्यासाठी नाही परंतु आपल्याला तयार करावे म्हणजे आपण जागरूक असावे आणि आपल्या विश्वासात स्थिरचित्त राहावे.
पण आपण स्थिरचित्त कसे राहावे?
१. तुमच्या स्वतःला वचनात मग्न ठेवा:
“तुझे वचन माझ्या पावलांकारिता दिव्यासारखे आणि माझ्या मार्गावर प्रकाशासारखे आहे” (स्तोत्र. ११९:१०५) . जसजसे जग अधिक अंधुक होते, तेव्हा देवाचे वचन आपल्यासाठी मार्गदर्शक प्रकाश असे होते, आपल्या मार्गाला प्रज्वलित करते आणि आपण अंधारात अडखळणार नाही याची खातरी करते.
२. धार्मिक चर्च/नेतृत्वाचा हिस्सा व्हा:
उपदेशक ४:१२ स्पष्ट करते, “जो एकटा असतो त्याला कोणी माणूस भारी झाला तर त्याचा प्रतिकार दोघांना करता येईल; तीनपदरी दोरी सहसा तुटत नाही.” देवाच्या मंदिराशी जुळलेले राहणे हे या शेवटल्या दिवसांत अत्यंत महत्वाचे आहे नाहीतर घाणीच्या पुरामध्ये तुम्ही वाहून जाऊ शकता. तसेच, एखाद्याने नेतृत्वाशी जुळलेले राहिले पाहिजे जे तुमच्या आत्म्यास बळकटी आणेल, आणि नैतिक पतनाच्या विरोधात स्थिर असे उभे राहण्यास आपल्याला सक्षम करेल. जर तुम्ही करुणा सदन उपासनेला हजर राहत असाल, तर जे-१२ पुढाऱ्याशी तुम्ही संबंधात राहावे यासाठी मी तुम्हांला प्रोत्साहन देत आहे.
३. प्रार्थना आणि उपासामध्ये देवाचा धावा करा:
प्रार्थना आणि उपास हे या शेवटल्या दिवसांत प्रमुख गोष्टी आहेत. हे तुमच्या आत्मिक-मनुष्यात देवाची ज्योत सतत पेटत ठेवेल. १ थेस्सलनीका. ५:१७ मध्ये जसे पौल प्रोत्साहन देत आहे, “निरंतर प्रार्थना करा.”
४. प्रकाश बना:
अंधाराला शाप देण्याऐवजी, तेजस्वीपणे चमकण्यासाठी आपल्याला बोलावण्यात आले आहे. मत्तय. ५:१६ आपल्याला स्मरण देते की, “तुम्ही जगाचा प्रकाश आहात;... तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कृत्ये पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे .”
या गोंधळाच्या समयातून दिशा काढण्यासाठी, आपल्याला अनैतिकतेच्या पुरामुळे भारावून जाण्याची गरज नाही तर त्याऐवजी सार्वकालिक प्रकाशावर लक्ष केंद्रित करावे जो कधीही अंधुक होत नाही-प्रभू येशू ख्रिस्त. इब्री. १२:२ आपल्याला प्रोत्साहन देते, “आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू ह्याच्याकडे पाहत असावे; .....” तो या पृथ्वीवर चालला, आपल्या परीक्षांचा अनुभव केला, आपल्या आव्हानांचा सामना केला , तरीही निष्पाप राहिला. त्याच्यामध्ये, आपण आपला मूळ आराखडा पाहतो, आपल्या शक्तीचे स्त्रोत, आणि आपल्या आशेचे किरण.
प्रार्थना
पित्या, या आव्हानात्मक समयात, तुझे वचन आणि मार्गात आम्हांला स्थिर कर. आमच्या प्रार्थनामय जीवनास बळकट कर आणि जेथे कोठे आम्ही जातो तेथे आमचा प्रकाश प्रज्वलित होवो. जगाच्या मोहापायी आम्ही नेहमी तुझा मार्ग निवडावा असे होऊ दे. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● अन्य येशू, निराळा आत्मा आणि निराळी सुवार्ता-२● दिवस १८:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
● एक क्षेत्र ज्यामध्ये सैतान तुम्हांला अधिक अडथळा आणतो
● निराशेवर मात कशी करावी
● देवाने एवढी प्रीती केली की त्याने दिला
● दिवस १६ : ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● स्वैराचाराच्या सामर्थ्यास मोडणे-२
टिप्पण्या