“तो मुख्य याजक व सरदार ह्यांच्याकडे निघून गेला आणि त्यांच्या हाती त्याला कसे धरून द्यावे ह्याविषयी त्याने त्यांच्याशी बोलणे केले. तेव्हा त्यांना आनंद झाला व त्यांनी त्याला पैसा देण्याचा करार केला. त्याला तो मान्य झाला आणि गर्दी नसेल तेव्हा त्यांच्या हाती त्याला धरून देण्याची तो संधी शोधू लागला.” (लूक २२:४-६)
यहूदाच्या विश्वासघाताची कथा ही आपल्या तारणाऱ्याच्या शेवटल्या दिवसांतील कथेमधील केवळ एक कथनात्मक तपशीलापेक्षा अधिक आहे. अनियंत्रित महत्वाकांक्षा आणि आध्यात्मिक निष्काळजीपणा आपल्यातील सर्वात जवळच्या व्यक्तीलाही दिशाभूल करू शकते याचे हे एक शक्तिशाली स्मरण करणारे आहे.
यहूदा इस्कर्योत हा बायबलमध्ये एक रहस्यमय व्यक्ती आहे. तो येशूसोबत चालला, त्याच्या चमत्कारांचा साक्षीदार होता, आणि त्याच्या अत्यंत जवळच्या शिष्यांतील होता. आणि तरीही, त्याने देवाच्या पुत्राचा विश्वासघात करण्याची निवड केली. प्रभूच्या इतक्या जवळ राहणाऱ्या कोणाला इतके घृणास्पद कृत्य करण्यासाठी कशाने प्रेरणा मिळू शकते?
यहूदाला जे तीस चांदीचे नाणे मिळाले त्यावर आपण नेहमी लक्ष केंद्रित करत असतो. पण आर्थिक लाभाचे आमिष ही संपूर्ण कथा आहे का? जेव्हा आपण यामध्ये खोलवर जातो, आपण एका माणसाला पाहतो, ज्याने कदाचित एका चांगल्या हेतूने हे सुरु केले. यहूदाने कदाचित एखाद्या ख्रिस्ताची कल्पना केली असेन जो इस्राएलला रोमी दडपशाहीपासून मुक्त करेल. जसे याचा पवित्र शास्त्रात इशारा दिला आहे, “त्याला कदाचित या नवीन राज्यात प्रमुख भूमिका बजावण्याची अपेक्षा होती (लूक १९:११). मान्यता आणि अधिकाराची त्याची आकांक्षा अंधकारमय सैतानी शक्तींना त्याचा वापर करण्यासाठी इंधन म्हणून काम करत असावी.
तथापि, जेव्हा हे स्पष्ट झाले की येशूचे राज्य हे या जगाचे नाही, तेव्हा यहूदाच्या मनात भ्रमनिरास झाला असावा. हा भ्रमनिरास, त्याच्या अंगभूत लोभासह जुळला गेला-कारण जी थैली त्याच्याजवळ होती त्यातून तो पैसे चोरत असे (योहान १२:४-६)-सैतानाने त्याचे जाळे विणण्यासाठी वापरलेले परिपूर्ण वादळ बनले.
सैतान केवळ कमकुवत लोकांवर शिकार करत नाही ही एक चिंताजनक जाणीव आहे, तर तो अगदी बलवान लोकांच्या असुरक्षित क्षणांना लक्ष्य करतो. प्रेषित पेत्र चेतावणी देतो, “सावध असा, जागे राहा; तुमचा शत्रू हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो” (१ पेत्र ५:८).
येशूच्या कथेमध्ये खलनायकच्या वर्गवारीमध्ये ठेवत, यहूदापासून आपल्या स्वतःला वेगळे करणे हे सोपे आहे. परंतु हा दृष्टीकोन आत्मसंतुष्टतेस कारणीभूत ठरू शकतो, जर यहूदा, जो येशूसोबत शारीरिकदृष्ट्या उपस्थित होता, जर तो चुकू शकतो, तर आपण देखील चुकू शकतो. या सत्याने आपल्याला निराशेकडे न नेता दक्षतेकडे नेले पाहिजे.
प्रेषित पौलाने हे चांगले समजले होते जेव्हा त्याने पापाच्या खमिराबद्दल लिहिले होते. केवळ थोडेसे हे संपूर्ण संघावर परिणाम करू शकते (१ करिंथ. ५:६-८). प्रत्येक वेळी जेव्हा आपण आपल्या जीवनात मत्सर, महत्वाकांक्षा, किंवा लोभ यांचा इशारा देतो, तेव्हा आपण त्यास वाढू देण्यास आणि आपल्याला परिभाषित करू देण्याच्या धोक्यात असतो.
तथापि, कथा ही आशेचे किरण म्हणून देखील कार्य करते. त्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये देखील, येशूने प्रेम आणि क्षमा प्रदान केली, यहूदाला ‘मित्र’ म्हटले (मत्तय २६:५०). येशूचे उत्तर आपल्याला याची आठवण देते की आपण किती दूर भटकून गेलो आहोत याची पर्वा नाही, देवाचा हात हा पसरलेलाच राहतो, स्वीकारणे आणि पुनर्स्थापित करण्यास तयार.
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, आमच्या अंत:करणाचे प्रलोभन आणि महत्वाकांक्षांपासून रक्षण कर जे आमची दिशाभूल करू शकते. आम्ही नेहमी तुझ्या मुखाचा धावा करावा आणि तुझ्या प्रेमात आणि कृपेत स्थिर राहावे असे होऊ दे. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● आध्यात्मिक वाढीचे शांत गुदमरवणारे● लहान तडजोडी
● विश्वासाद्वारे कृपा प्राप्त करणे
● २१ दिवस उपवासः दिवस १५
● परमेश्वरा सोबत चालणे
● तुमच्या रांगेतच राहा
● जेव्हा तुम्ही युद्धात आहात: समज
टिप्पण्या