शिष्यांनी, तरुण श्रीमंत शासकाचा संघर्ष पाहिला होता, शिष्यत्वाची किंमत द्यावी लागेल या विचारात ते होते. पेत्र, जो नेहमी गटाचा प्रथम आवाज होता, त्याने येशूला एक मार्मिक प्रश्न विचारला, जो लूक १८:२८-३० मध्ये अंतर्भूत आहे.
“२८ तेव्हा पेत्र म्हणाला, “पाहा, आम्ही आपले घरदार सोडून तुम्हांला अनुसरलो आहोत.” २९ त्याने त्यांना म्हटले, “मी तुम्हांला खचित सांगतो, देवाच्या राज्याकरता ज्याने आपले घर, बायको, भाऊ, आईबाप किंवा मुलेबाळे सोडली आहेत, ३० त्याला ह्या काळात पुष्कळ पटीने, व येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन मिळणार नाही असा कोणी नाही.”
घर, कुटुंब आणि उदरनिर्वाहासाठी त्यांचा त्याग लहान नव्हता, आणि पेत्राने अशा महत्वपूर्ण गुंतवणुकीवरील परतावा समजून घेण्याचा प्रयत्न केला.
प्रभू येशू प्रगल्भ आश्वासनाचे उत्तर देतो –ज्यांनी देवाच्या राज्यासाठी त्याग केला आहे त्यांना या जीवनात अनेक पटीने आशीर्वाद मिळतीलच पण त्याहूनही महत्वाचे म्हणजे सार्वकालिक जीवन वारसहक्काने मिळेल. राज्याची बक्षिसे व्यवहारात्मक नसून परिवर्तानात्मक आहेत, तात्कालिक नसून शाश्वत आहेत.
प्रारंभीच्या चर्चमधील शिष्यांची अद्वितीय भूमिका महत्वाची होती.
“प्रेषित व संदेष्टे ह्या पायावर तुम्ही रचलेले आहात; स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशीला आहे.” (इफिस. २:२०)
“नगरीच्या तटाला बारा पाये होते, त्यांच्यावर कोकऱ्याच्या बारा प्रेषितांची नावे होती.” (प्रकटीकरण २१:१४)
ही वचने त्यांच्या मुलभूत योगदानावर प्रकाश टाकतात. पृथ्वीवरील त्यांच्या बलिदानांना शाश्वत सन्मान मिळाला.
देवाचे राज्य अशा तत्वांवर चालते जे सहसा जगाच्या मार्गांच्या पूर्णपणे विरुद्ध वाटतात. दानधर्म करणे, त्याग करणे, आणि सेवा करणे हे सर्व खऱ्या श्रीमंतीकडे नेते. जसे प्रभू येशूने म्हटले, “घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे” (प्रेषित २०:३५). ही स्वर्गीय अर्थव्यवस्था आहे जेथे तोटा हा फायदा आहे आणि शरणागती हा विजय आहे.
दानधर्म करण्याचे हृदय असणे म्हणजे संपत्तीच्या भ्रष्टाचारापासून संरक्षण करणे होय. जेव्हा पैशावरील प्रीती मूळ धरते, तेव्हा ती सर्व प्रकारच्या वाईटाकडे नेऊ शकते (१ तीमथ्य. ६:१०). तथापि, देवाच्या हृदयाशी जुळवलेले हृदय, उदारतेवर केंद्रित आहे, जमा करण्यावर नाही.
देवाचे अभिवचन हे स्पष्ट आहे: उदारतेमध्ये तो मागे पडणार नाही. मोजमाप जे देण्यासाठी आपण वापरू- मग ती वेळ, स्त्रोत, किंवा प्रीती असो- आपल्याला परत देण्यासाठी तेच मोजमाप वापरले जाणार आहे, चांगले माप दाबून, हलवून व शीग भरून (लूक ६:३८). देवाच्या अर्थव्यवस्थेमध्ये, आपला निवेश नेहमीच सुरक्षित असतो आणि मोजमापाच्या पलीकडे लाभांश देतो.
दानधर्म करण्याची जीवनशैली स्वीकारणे म्हणजे ऐहिक संपत्तीपेक्षा देवाच्या राज्याच्या मूल्यांना प्राधान्य देणे आहे. आपल्या स्वर्गीय पित्याला आपल्या गरजा माहित आहेत आणि त्या तो पुरवील जेव्हा आपण प्रथम त्याच्या राज्याचा धावा करतो यावर भरवसा ठेवणे हे यात समाविष्ट आहे (मत्तय ६:३३). सध्याच्या युगात या तत्वानुसार जगणे हे आपल्याला येशूने दिलेले वचन “अनेक पटींनी जास्त” अनुभवण्यास मदत करते.
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, आमच्यात खऱ्या उदारतेचे हृदय निर्माण कर. तुझ्या शाश्वत संपत्तीच्या वचनावर विश्वास ठेवून आम्ही आमचे जीवन तुझ्या राज्यात निवेश करावे असे होऊ दे. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● अद्भुतरित्या नवीन मार्ग सापडणे (दिवस 13)● स्वयं-गौरवाचा सापळा
● विश्वासणाऱ्यांचे राजकीय याजकगण
● प्रभु येशू ख्रिस्ताचे अनुकरण कसे करावे
● दिवस ०२:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● चमत्कार करणारा परमेश्वर जो आवश्यकतेपेक्षा अधिक आहे
● चमत्कारिकतेमध्ये कार्य करणे: किल्ली #१
टिप्पण्या