लूक १८:३४ मध्ये, आपल्याला एक मार्मिक क्षण येतो जेथे शिष्य येशूचे दू:ख सहन करणे आणि गौरवाविषयीच्या शब्दांचा पूर्ण अर्थ समजू शकत नाही. त्यांनी त्याची वाणी ऐकली, त्यांनी त्याचे मुख पाहिले, तरीही अर्थ त्यांच्यापासून लपलेलाच राहिला. हा समजून घेण्याचा अभाव हा बुद्धिमत्ता किंवा जागरूकतेच्या अभावामुळे नव्हता; ते एका उद्देशासाठी दैवी थांबवून ठेवणे होते जे फक्त पूर्णपणे देवालाच ठाऊक होते.
काहीवेळा आपली समज जाणूनबुजून मर्यादित असते, ते आपल्या अपयशामुळे नाही परंतु कारण देवाला माहित आहे की कोणत्याही वेळी काय सहन करू शकतो हे समजणे सांत्वनदायक असते. योहान १६:१२ मध्ये, येशूने म्हटले, “मला अद्याप तुम्हांला पुष्कळ गोष्टी सांगायच्या आहेत, परंतु आत्ताच तुमच्याने त्या सोसवणार नाहीत.” विजयी मसीहाची शिष्यांची संकल्पना इतकी रुजलेली होती की दू:खी सेवकाचे प्रकटीकरण त्यांच्या सध्याच्या स्वीकारण्याच्या किंवा समजण्याच्या क्षमतेच्या पलीकडे होते.
यहूदी परंपरा दोन मसीहाविषयी बोलले: एक दू:ख सहन करेल (योसेफ पुत्र मसीहा) आणि एक विजयी राज्य करेल (यहूदाचा पुत्र मसीहा). ही दुहेरी अपेक्षा येशूच्या सेवाकार्याच्या दुहेरी वास्तविकतेला प्रतिबिंबित करते: त्याचे दू:ख सहन करणे आणि मृत्यू आणि त्यानंतर लगेचच पुनरुत्थान आणि गौरव. शिष्य त्यांच्या सांस्कृतिक अपेक्षांमध्ये अडकले होते-त्यांना एक मसीहा-येशू मध्ये या पैलूंचा ताळमेळ घालणे कठीण वाटले.
येशूच्या परीक्षेच्या वेळी सैतानाद्वारे पवित्र शास्त्राचे विकृतीकरण (लूक ४:९-११) चुकीच्या शिकवणीचा धोका स्पष्ट करते. वचन जाणणे हे पुरेसे नाही; योग्य संदर्भात समजणे आणि लागू करणे हे महत्वाचे आहे. गैरसमज आपल्याला देव प्रकट करू इच्छित असलेल्या गहन सत्यांसंबधी आंधळे करू शकते.
गैरसमजेचा पडदा फाडण्याचा मार्ग नम्रता आणि प्रार्थनेने सुरु होतो, आपल्याला सर्व सत्याकडे नेण्यासाठी देवाचे मार्ग शोधत असतो (योहान १४:२६). जेव्हा आपण आपल्या पूर्वकल्पित कल्पनांना समर्पित करतो आणि पवित्र आत्म्याच्या शिकवणीसाठी आपले अंत:करण उघडतो, तेव्हा ज्या सत्यावर पडदा पडला होता ते स्पष्ट होते.
देवाला, त्याच्या ज्ञानामध्ये, ठाऊक आहे की आपल्या डोळ्यावरून पडदा केव्हा काढावा. येशूच्या पुनरुत्थानानंतर शिष्यांची अंतिम समज दर्शवते की देव त्याच्या स्वतःच्या परिपूर्ण वेळेत त्याचे सत्य प्रकट करतो. हा तो नमुना आहे जो संपूर्ण पवित्र शास्त्रात आणि आपल्या जीवनात वारंवार केला जातो: प्रकटीकरण हे तेव्हा येत नाही जेव्हा आपण त्याची मागणी करतो परंतु जेव्हा आपण ते स्वीकारण्यास तयार असतो.
प्रमुख रहस्य जे शिष्यांनी समजून घेण्यासाठी संघर्ष केला ते वधस्तंभ होते. प्रेषित पौल वधस्तंभाच्या संदेशाविषयी बोलतो “कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे; पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणांस तो देवाचे सामर्थ्य असा आहे” (१ करिंथ. १:१८). वधस्तंभ हे देवाच्या प्रेमाचे आणि सामर्थ्याचे अंतिम अनावरण आहे, एक सत्य जे जीवने परिवर्तीत करते आणि नशिबांना पुन्हा वळण देते.
जसे आपण आपल्या विश्वासात वाढतो, तसे देवाच्या मार्गांना समजण्याच्या प्रक्रीयेबाबत संयमी होऊ या. राज्याचे रहस्य हे नेहमी नियमावर नियम, कानुवर कानू असे प्रकट होतात (यशया २८:१०). योग्य वेळेत, जे एकेकाळी लपलेले होते ते देवासोबतच्या सखोल नातेसंबंधासाठी एक स्पष्ट मार्ग बनते.
प्रार्थना
पित्या, प्रकटीकरणासाठी तुझ्या वेळेवर विश्वास ठेवण्यासाठी आम्हांला कृपा प्रदान कर. तुझ्या सत्यासाठी आमचे डोळे उघड, आणि तुझ्या राज्याचे रहस्य पूर्णपणे आत्मसात करण्यासाठी आमच्या हृदयास तयार कर. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● देवाचा आरसा● वातावरणावर महत्वाची समज - २
● महाविजयीठरणे
● तुमचे संबंध गमावू नका
● परमेश्वराकडे तुमच्यासाठी योजना आहे
● धन्यवाद आणि स्तुतिचा दिवस (दिवस १९)
● येशूचे रक्त लावणे
टिप्पण्या