english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. डेली मन्ना
  3. नीतिमान रागास स्वीकारणे
डेली मन्ना

नीतिमान रागास स्वीकारणे

Friday, 24th of November 2023
18 15 1859
Categories : Anger Character Emotions Self Control
राग ही एक नैसर्गिक भावना आहे ज्याचा सहसा नकारात्मक अर्थ असतो, विशेषेकरून ख्रिस्ती संदर्भात. तथापि, बायबल दोन प्रकारच्या रागांमध्ये फरक करते: पापी राग आणि नीतिमान राग.

ख्रिस्ती लोकांच्या आध्यात्मिक प्रवासासाठी हा फरक समजणे महत्वाचे आहे. इफिस. ४:२६ आपल्याला उपदेश देते, “तुम्ही रागवा, परंतु पाप करू नका” हे आपल्याला सुचवते की, ते त्याच्यातच, जन्मजात पापमय नाही.

१) दैवी राग 
नीतिमान रागाची कल्पना खुद्द देवाच्या स्वभावामध्येच खोलवर मुळावलेली आहे. स्तोत्र. ७:११ देवाला नीतिमान न्यायाधीश म्हणून चित्रित करते, “देव न्यायी न्यायाधीश आहे; तो प्रतिदिनी रोष दाखवणारा देव आहे.” हे वचन यावर प्रकाश टाकते की देवाचा क्रोध हा त्याचा न्याय आणि पवित्रतेचा विस्तार आहे. वास्तवात, पवित्र शास्त्रातील संदर्भ देवाच्या रागाला शेकडो वेळा दाखवतात, नेहमीच त्याच्या परिपूर्ण स्वभावाशी ऐक्यात असते, अशा प्रकारे पापापासून वेगळे ठेवते.

२) पवित्र शास्त्रातील व्यक्तींमध्ये नीतिमान राग 
पवित्र शास्त्रातील पुष्कळ व्यक्ती नीतिमान रागाला उत्तेजन देतात, हे दर्शवत की ते नैतिक आणि आध्यात्मिक अखंडतेपासून निर्माण होऊ शकते. मोशेने, उदाहरणार्थ, सोन्याच्या वासरामुळे इस्राएलाच्या मूर्तीपूजेप्रती नीतिमान राग दाखवला. “मोशे छावणीजवळ येऊन पोहचल्यावर ते वासरू व नाचतमाशा त्याने पाहिला, तेव्हा त्याचा राग भडकला आणि त्याने आपल्या हातातल्या पाट्या पर्वताच्या पायथ्याशी फेकून फोडून टाकल्या” (निर्गम ३२:१९).

“आसपास उभे असणाऱ्या लोकांना दाविदाने विचारले, ‘ह्या पलिष्ट्याला मारून इस्राएलाची अप्रतिष्ठा दूर करणाऱ्या मनुष्याला काय मिळेल? ह्या असुंती पलिष्ट्याने जिवंत देवाच्या सेना तुच्छ लेख्याव्यात काय?” (१ शमुवेल १७:२६)

गल्ल्याथा विरुद्ध दाविदाचा राग देवाच्या आदरासाठी आवेशाने प्रेरित झाला होता. या घटना दाखवतात की देवाची मुल्ये आणि तत्वांसाठी गहन समर्पणापासून नीतिमान राग उद्भवतो.

३) प्रभू येशू
प्रभू येशू ख्रिस्ताने, त्याच्या पृथ्वीवरील सेवाकार्यात, नीतिमान रागाची सर्वात परिपूर्ण उदाहरणे प्रदान केली. त्याने परुश्यांना त्यांच्या कायदेशीरपणाबद्दल फटकारले, जेव्हा त्यांच्या परंपरा करुणेच्या कृत्यांना अडथळा करत होते, जसे शब्बाथ दिवशी बरे करणे. “मग त्याने त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पाहिले व त्या माणसाला म्हटले, ‘हात लांब कर.’ त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला.” (मार्क. ३:५)

“ते पाहून येशूला फार वाईट वाटले; आणि तो त्यांना म्हणाला, ‘बालकांना माझ्याजवळ येऊ द्या; त्यांना मनाई करू नका, कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे” (मार्क. १०:१४). मुलांना त्याच्याकडे येण्यापासून रोखण्याबद्दल त्याच्या शिष्यांबद्दलचा त्याचा राग त्याने निर्दोषपणा आणि विश्वासावर ठेवलेल्या मुल्यावर जोर देतो. 

सर्वात लक्षणीय, त्याचे मंदिराला स्वच्छ करणे रागाचे उदाहरण देते जे अन्याय आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात केलेले होते. “१५ मग ते यरुशलेमेस येऊन पोहचल्यावर येशू मंदिरात गेला व मंदिरात क्रय-विक्रय करणाऱ्यांना बाहेर घालवून देऊ लागला. त्याने सराफांचे चौरंग व कबुतरे विकणाऱ्यांच्या बैठका उलथून टाकल्या. १६ त्याने कोणालाही कसल्याच भांड्याची मंदिरातून नेआण करू दिली नाही. १७ मग तो त्यांना शिक्षण देऊ लागला व म्हणाला की, ‘माझ्या घराला सार्वराष्ट्रीय प्रार्थनामंदिर म्हणतील’ असा शास्त्रलेख आहे ना? परंतु तुम्ही तर ही ‘लुटारूंची गुहा’ करून टाकली आहे.” (मार्क. ११:१५-१७)

विश्वासणाऱ्यांसाठी, देवाला ज्याचा राग येतो त्यासह आपल्या रागाला एकरूप करणे हे महत्वाचे आहे. याकोब १:२० आपल्याला आठवण देते, “कारण माणसाच्या रागाने देवाच्या नीतिमत्वाचे कार्य घडत नाही.” नीतिमान रागाने आपल्याला विनाशकारक प्रतिक्रियेपेक्षा रचनात्मक कृत्यांकडे नेले पाहिजे. ते प्रीती, न्याय आणि देवाच्या सत्याचा विजय व्हावा या इच्छेने प्रेरित असले पाहिजे.

नीतिमान राग जोपासण्यासाठी व्यवहारिक पाऊले: 
१. स्वयं-चिंतन:
तुमचे हृदय आणि प्रेरणा नियमितपणे तपासा. तुमच्या संतप्त प्रतिक्रिया स्वयं-केंद्रित आहेत की देव-केंद्रित आहेत?

२. पवित्र शास्त्राशी जुळवून घ्या:
देवाच्या वचनाविरुद्ध तुमच्या रागाचे मोजमाप करा. ते पवित्र शास्त्राचे तत्व आणि मूल्याशी जुळते का?

३. प्रार्थनापूर्वक मार्गदर्शन:
त्याचा आदर करण्याच्या मार्गांनी तुमच्या भावनांना ओळखणे आणि ते व्यवस्थित करण्यासाठी प्रार्थनेने देवाच्या मार्गदर्शनाचा धावा करा.

नीतिमान राग, जेव्हा योग्यप्रकारे प्रकट केला जातो, तेव्हा ते सकारात्मक बदलासाठी एक शक्तिशाली स्त्रोत होऊ शकते. ते आपल्याला ह्या पतित जगात अन्याय, सत्यासाठी उभे राहणे, आणि नीतिमान तत्वांना धरून राहण्यासाठी प्रेरणा देऊ शकते. आपल्या रागाचा उपयोग पापाचे शस्त्र म्हणून नव्हे तर नीतिमत्वासाठी एक साधन म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने मांडलेल्या उदाहरणांचे प्रतिबिंब दाखवण्याचा प्रयत्न करू या.

प्रार्थना
स्वर्गीय पित्या, नीतिमान आणि पापी राग यांच्यातील फरक ओळखण्यासाठी मला ज्ञान प्रदान कर. माझ्या हृदयाने तुझ्या हृदयाला प्रतिध्वनित करावे असे होऊ दे, अन्याय आणि असत्याबद्दल संतप्त व्हावे, तरीही तुझ्या इच्छेसाठी प्रीती आणि इच्छेने सतत मार्गदर्शित असावे. येशूच्या नावाने. आमेन.

Join our WhatsApp Channel


Most Read
● तुम्ही प्रभूचा प्रतिकार करीत आहात काय?
● परमेश्वराची सेवा करण्याचा अर्थ काय आहे-१
● दिवस ०६ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● ४०वा दिवस: उपास आणि प्रार्थनेचे ४० दिवस
● याचा अर्थ काय आहे, येशूचे कार्य करणे आणि त्यापेक्षा मोठी कार्य करणे?
● आपल्या आध्यात्मिक सामर्थ्याचे नुतनीकरण कसे करावे -२
● अडथळ्यांपासून ते पुनरागमनापर्यंत
टिप्पण्या
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन