डेली मन्ना
त्याच्या प्रकाशात नातेसंबंधांचे संगोपन करणे
Tuesday, 23rd of January 2024
27
18
826
Categories :
संबंध
नातेसंबंध, मानवी परस्परसंवादाचा मुख्य भाग, परीक्षांपासून मुक्त नाही. बागेतील, नाजूक फुलांसारखे, सतत काळजी आणि संगोपनाची त्यांना गरज असते. एका महान माणसाने एकदा म्हटले होते, “नातेसंबंध कधीही नैसर्गिक मृत्यूने मरत नाहीत.” अहंकार, अनादर, स्वार्थीपणा आणि बेईमानीने त्यांची हत्त्या केली जाते. इतिहास आणि पवित्र शास्त्राच्या पानांतून हा वेदनादायक मार्ग प्रतिध्वनित होतो, जे आपल्याला मानवी नातेसंबंधाच्या कमकुवत स्वरुपाची आठवण देते.
नातेसंबंध जपणे आणि मजबूत करण्यासंबंधी बायबल बरेच काही बोलते. इफिस. ४:२-३ मध्ये, प्रेषित पौल सल्ला देतो, “ पूर्ण नम्रता, सौम्यता व सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या; आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखण्यास झटत जा.” हे वचन नम्रता, संयम आणि प्रीतीच्या महत्वाला अधोरेखित करते –सद्गुणे जी अहंकार आणि अनादरच्या विरोधात आहेत ज्यामुळे नेहमी नातेसंबंध बिघडतात.
स्वार्थीपणा, नातेसंबंधांची हत्या करणारा आणखी एक आहे, त्याबददल फिलिप्पै. २:३-४ मध्ये विचार व्यक्त केला आहे, “तट पाडण्याच्या अथवा पोकळ डौल मिरवण्याच्या बुद्धीने काहीही करू नका, तर लीनतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना. तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसऱ्यांचेही पाहा.” हे वचन निस्वार्थी प्रीतीची मागणी करते, प्रीती जी दुसऱ्यांचे कल्याण पाहते, जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या शिकवणीस प्रतिध्वनित करते, ज्याने त्याचे जीवन आणि सेवाकार्यामध्ये आयुष्यभर निस्वार्थीपणा दाखवला.
बायबलमधील योनाथान आणि दावीद यांच्यामधील मैत्री हे एक उज्वल उदाहरण आहे. गुंतागुंतीची राजकीय आणि कौटुंबिक प्रेरकशक्ती असतानाही, त्यांची मैत्री कायम राहिली, जे त्यांच्या एकमेकांबद्दलच्या त्यांच्या निष्ठा आणि परस्पर आदराचा पुरावा आहे. १ शमुवेल १८:१-३ मध्ये, एक नातेसंबंध आपण पाहतो जे वैयक्तिक लाभाच्याही पलीकडील आहे, “योनाथानाचे मन दाविदाच्या मनाशी इतके जडले की तो त्याला प्राणाप्रमाणे प्रिय झाला .....मग योनाथानाने दाविदाशी करार केला कारण तो त्याच्यावर स्वतःसारखी प्रीती करत होता.” हा प्रसंग नातेसंबंधात एकनिष्ठेच्या मुल्यास अधोरेखित करतो.
बेईमानी, हा अनेक नातेसंबंधाला अंतिम धक्का आहे, हे यहूदा इस्कर्योतच्या कथेमध्ये स्पष्टपणे चित्रित केले आहे, ज्याने चांदीच्या तीस नाण्यांसाठी येशूचा विश्वासघात केला (मत्तय.२६:१४-१६). लोभ आणि बेईमानीमुळे विश्वासघाताच्या कृत्यास चालना दिली, ज्याने ख्रिस्ती इतिहासातील एका सर्वात महत्वाच्या क्षणाकडे नेले –ख्रिस्ताला वधस्तंभी खिळणे. या विश्वासघातानंतरचा परिणाम नातेसंबंधात बेईमानीच्या विनाशक शक्तीची गंभीर आठवण म्हणून कार्य करते.
या नकारात्मक शक्तींना विरोध करण्यासाठी, बायबल क्षमा आणि समेट करण्याचे प्रोत्साहन देते. कलस्सै. ३:१३ शिकवते, “एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसांत क्षमा करा; प्रभूने तुम्हांला क्षमा केली तशी तुम्हीही करा.” हे वचन क्षमा करण्याच्या बरे करण्यावर शक्तीवर आणि बिघडलेले नातेसंबंध पुन्हा जोडण्यासाठी समेट करण्याच्या महत्वावर जोर देते.
एका महान माणसाने एकदा ज्ञानीपणे स्पष्ट केले होते, “अशक्त कधीही क्षमा करू शकत नाही. क्षमा करणे हा बलवानाचा गुणधर्म आहे.” जर तुम्हांला तुमच्या नातेसंबंधात व्यवस्थित संबंध हवे आहे तर नम्रता, निस्वार्थीपणा, एकनिष्ठेचे आचरण ठेवा आणि क्षमा ही मजबूत संबंध बनवेल आणि समज गहन करेल.
प्रार्थना
स्वर्गीय पित्या, नम्रता, निस्वार्थीपणा, एकनिष्ठेने आमच्या नातेसंबंधांचे संगोपन करण्यासाठी आम्हांला शक्ती प्रदान कर. जसे तू क्षमा केली आहे तसेच क्षमा करण्यास आम्हांला मदत कर आणि प्रीतीचे आणि समजेचे बंधन मजबूत करण्यासाठी तुझ्या प्रकाशात आम्हांला मार्गदर्शन कर. येशूच्या नावाने. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● रहस्य स्वीकारणे● पैसे कशा साठी नाही
● दिवस ३७:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
● त्वरित आज्ञापालनाचे सामर्थ्य
● तुरुंगात स्तुती
● दुष्टात्म्यांच्या प्रवेशाची ठिकाणे बंद करणे- १
● तुमच्या अंत:करणाचे परिश्रमपूर्वक रक्षण करा
टिप्पण्या