डेली मन्ना
दिवस १६ : ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
Tuesday, 26th of December 2023
36
26
1322
Categories :
उपास व प्रार्थना
धन्यवादाने चमत्कार प्राप्त करणे
“परमेश्वराचे उपकारस्मरण करणे, हे परात्परा, तुझ्या नावाची स्तोत्रे गाणे चांगले आहे. प्रभातसमयी तुझे वात्सल्य, प्रतिरात्री तुझी सत्यता वाखाणणे, दशतंतु वाद्य, सतार, व वीणा ह्यांच्या साथीने, गंभीर स्वराने गाणे चांगले आहे. कारण हे परमेश्वरा, तू आपल्या कृतीने मला हर्षित केले आहेस; तुझ्या हाताच्या कृत्यांचा मी जयजयकार करतो.” (स्तोत्र. ९२:१-४)
धन्यवाद देणे ही प्रशंसा करण्याची कृती आहे. आपल्यासाठी देवाने जे केले आहे, करत आहे आणि करणार आहे त्या सर्वांसाठी देवाला कृतज्ञता व्यक्त करणे आहे. पवित्र शास्त्रानुसार, देवाला धन्यवाद देणे ही चांगली गोष्ट आहे (स्तोत्र. ९२:१). कोणाही ख्रिस्ती व्यक्तीला या समजेचा अभाव आहे ते त्याला नुकसानीचे आहे. धन्यवाद, स्तुती आणि प्रशंसेशी जुळलेले काही आशीर्वाद तुम्हांला दाखवण्याचा मी प्रयत्न करीन.
धन्यवाद, स्तुती आणि उपासनेला तुम्ही एकमेकांपासून वेगळे करू शकत नाही. जेव्हा तुम्ही धन्यवाद देत आहात, तेव्हा आत्मा तुम्हांला उपासना करण्याकडे देखील नेऊ शकतो. त्याचवेळेस पवित्र आत्मा तुम्हांला धन्यवाद, स्तुती आणि उपासना करण्यास सांगतो. धन्यवाद देणे ही आध्यात्मिक कृती आहे, मानसिक कृती नाही, म्हणजे पवित्र आत्मा धन्यवाद देण्याच्या वेळेस तुमच्यावर सहज प्रभुत्व करू शकतो.
लोक देवाचा धन्यवाद का करत नाहीत
लोकांनी देवाचा धन्यवाद जसा केला पाहिजे तसे ते करत नाहीत त्यासाठी पुष्कळ कारणे आहेत, आणि त्यापैकी काही मी खाली सांगणार आहे:
१. ते गहनपणे विचार करत नाहीत (स्तोत्र. १०३:२)
जेव्हा तुम्ही विचार करण्यात चुकता, तेव्हा तुम्ही जसे देवाचा धन्यवाद केला पाहिजे होता त्यामध्ये तुम्ही चुकता. गहनपणे विचार करणे गहनपणे उपासना करण्याकडे प्रेरित करू शकते.
ज्याबद्दल विचार करावा अशा कोणत्या गोष्टी आहेत ?
देवाने तुमच्यासाठी काय केले आहे त्यावर विचार करा.
त्याने तुम्हांला कोठून आणले त्यावर विचार करा.
कठीण समयाबद्दल विचार करा जेव्हा त्याने तुम्हांला मदत केली.
मृत्यू, अपघात, वाईटापासून जेव्हा त्याने तुम्हांला सोडवले त्या समयाबद्दल विचार करा.
तुमच्याप्रती त्याच्या प्रीतीबद्दल विचार करा.
सध्या तो तुमच्यासाठी काय करत आहे त्याबद्दल विचार करा.
तो तुमच्यासाठी लवकरच काय करणार आहे त्याबद्दल विचार करा.
जेव्हा तुम्ही या सर्व गोष्टींबद्दल विचार करता, तेव्हा ते तुम्हांला देवाला धन्यवाद, स्तुती आणि उपासना करण्यासाठी प्रेरित करेल.
येथे अशा अनेक गोष्टी आहेत ज्यासाठी तुम्ही प्रार्थना केली होती, आणि त्या सर्वांसाठी तुम्ही त्याला आधीच स्तुती आणि धन्यवाद दिला पाहिजे.
२. प्राप्ती आणि ताबा
त्यांना वाटते की त्यांच्या प्राप्ती आणि ताबा ह्या त्यांच्या मानवी शक्तीने आहेत. जेव्हा तुम्ही देवाला तुमच्या शक्तीचे स्त्रोत आणि तुमच्या जीवनाची शक्ती म्हणून पाहता, तेव्हा तुम्ही त्याला धन्यवाद देण्यास प्रेरित व्हाल, परंतु जर तुम्हांला वाटले की जे काही तुमच्याजवळ आहे ते तुमच्या कठीण परिश्रमामुळे आहे, तर कृतज्ञतेचा आत्मा जपणे हे कठीण होईल.
नबुखदनेस्सरच्या जीवनात हेच घडले होते.
“२९ बारा महिने लोटल्यावर तो एकदा बाबेलच्या राजवाड्याच्या गच्चीवर फिरत होता. ३० त्यावेळी राजा म्हणाला, ‘हे थोर बाबेल नगर राजनिवासासाठी माझ्याच पराक्रमाने व माझ्या प्रतापाच्या वैभवासाठी मी बांधले आहे ना!”
३३ त्याच घटकेस हे नबुखदनेस्सराच्या प्रत्ययास आले; त्याला मनुष्यातून घालवून दिले व तो बैलाप्रमाणे गवत खाऊ लागला; त्याचे शरीर आकाशातल्या दहिवराने भिजू लागले; येथवर की त्याचे केस गरुडाच्या पिसांसारखे वाढले आणि त्याची नखे पक्ष्यांच्या नखांसारखी झाली.” (दानीएल. ४:२९-३०, ३३)
३. जीवनाचा श्वास हा त्याच्याकडून आहे याबद्दल ते अज्ञानी आहेत
तुमच्या नाकपुड्यात असणाऱ्या श्वासाचा स्त्रोत देव आहे; त्याच्यावाचून, तुम्ही क्षणात मरण पावाल. आपण कृतज्ञ राहायला पाहिजे आणि जिवंत आहोत यासाठी देवाला धन्यवाद द्यावा.
“प्रत्येक प्राणी परमेशाचे स्तवन करो. परमेशाचे स्तवन करा!” (स्तोत्र. १५०:६)
४. त्यांच्या जीवनातील प्रत्येक चांगल्या गोष्टींचा स्त्रोत देव आहे हे त्यांना माहित नाही
तुमच्या जीवनातील त्या चांगल्या गोष्टी ह्या सरळपणे देवाकडून आहेत. जर देवाने त्या होऊ दिल्या नसत्या, तर त्या तुम्हांला कधीही मिळाल्या नसत्या.
जे काही चांगल आणि परिपूर्ण आहे ते आपला देव जो पिता याजपासून आपल्यासाठी खाली आलेले दान आहे, ज्याने स्वर्गातील सर्व ज्योती निर्माण केल्या आहेत. तो कधीही बदलत नाही किंवा बदलणारी सावली टाकत नाही. (याकोब १:१७)
५. त्यांना जास्त पाहिजे
देवाला तुम्हांला जास्त द्यायचे आहे, पण तुम्ही जर त्याला धन्यवाद देण्यात चुकला, तर ते प्रवाहाला अडवू शकते. पुष्कळ लोक धन्यवाद देत नाहीत कारण त्यांना जास्त पाहिजे असते.
“६चित्तसमाधानासह भक्ती हा तर मोठाच लाभ आहे. ७ आपण जगात काही आणले नाही, आपल्याला त्यातून काही नेता येत नाही; ८ आपल्याला अन्नवस्त्र असल्यास तेवढ्यात तृप्त असावे.” (१ तीमथ्य. ६:६-८)
६. इतरांसोबत ते स्वतःची तुलना करतात
पण ते केवळ स्वतःच एकमेकांशी तुलना करत असतात; स्वतःला मोजमापाचे प्रमाण म्हणून वापरत असतात. किती अज्ञानी आहेत!” (२ करिंथ. १०:१२)
धन्यवादाशी कोणते चमत्कारिक आशीर्वाद जुळलेले आहेत?
१). तुमचे बरे होणे आणि जे काही तुम्हांला देवाकडून मिळाले आहे त्यास धन्यवाद परिपूर्ण करते. (लूक. १७:१७-१९; फिलिप्पै. १:६)
२). धन्यवाद देणे हे तुम्हांला जास्त आशीर्वादांसाठी पात्र ठरवू शकते.
३). अशक्य परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्हांला देवाची शक्ती प्रकट व्हावी असे वाटते तेव्हा धन्यवाद दिला पाहिजे. (योहान. ११:४१-४४)
४). धन्यवाद देणे देवाच्या उपस्थितीला आकर्षित करू शकते आणि सैतानाला फार दूर घालवून देते.
५). धन्यवाद देणे तुम्हांला स्वर्गाच्या न्यायालयात प्रवेश करू देते. (स्तोत्र. १००:४)
६). धन्यवाद देणे दैवी कृपेला प्रेरित करू शकते. (प्रेषित. २:४७)
७). धन्यवाद दिल्यावाचून तुमची प्रार्थना पूर्ण होत नाही. अशक्य ते शक्य होण्यापूर्वी तुमची प्रार्थना धन्यवादासोबत जुळली पाहिजे. योहान. ११:४१-४४ मध्ये, ख्रिस्त धन्यवादाला प्रार्थनेसोबत जोडताना आपण पाहतो.
८) धन्यवाद देणे हे तुम्हांला देवाच्या परिपूर्ण इच्छेमध्ये ठेवते (१ थेस्सलनीका. ५:१८), जेव्हाजेव्हा आपण धन्यवाद देतो, तेव्हातेव्हा आपण सरळपणे देवाची इच्छा पूर्ण करत आहोत, आणि देवाची इच्छा पूर्ण करणारे हे तेच देवाच्या इच्छेमध्ये असलेल्या आशीर्वादांचा आनंद घेऊ शकतील. (इब्री. १०:३६)
इस्राएली लोकांना कुरकुर आणि तक्रार करण्यासाठी अनेक वेळेला शिक्षा केली होती. सैतानाला पाहिजे की तुम्ही तक्रार करावी, म्हणजे तुम्ही देवाच्या इच्छेच्या बाहेर होऊ शकता. मी प्रार्थना करतो की देवाने येशूच्या नावाने धन्यवादाच्या चमत्कारिक आशीर्वादांसाठी तुमची समज स्पष्ट करावी.
९) देवावर तुमचा विश्वास व्यक्त करण्याचा धन्यवाद हा एक प्रकार आहे. ते तुमच्या विश्वासाला मजबूत करते आणि तुमच्या अपेक्षेच्या जलद पूर्णतेची शास्वती देते. (रोम. ४:२०-२२)
१०) ते अप्रिय परिस्थितीला बदलू शकते. योना माशाच्या पोटात होता जेव्हा त्याने देवाचा धन्यवाद केला, आणि धन्यवादाच्या त्याच्या अर्पणानंतर, देवाने माशाला त्याला ओकून टाकण्याची आज्ञा दिली. (योना २:७-१०)
११) ते चमत्कारिक विजयाची शास्वती देते. (२ इतिहास २०:२२-२४)
१२) धन्यवाद देणे बहुगुणीत होण्याची शास्वती देते. (योहान. ६:१०-१३)
तुम्ही कोणत्या परिस्थितीतून जात आहात याची पर्वा नाही, देवाच्या सामर्थ्याला प्रकट होण्यासाठी धन्यवाद देणे, स्तुती आणि उपासनेच्या शक्तीला सक्रीय करा. (प्रेषित. १६:२५-२६)
पुढील अभ्यासासाठी: स्तोत्र. १०७:३१; लूक. १७:१७-१९; स्तोत्र. ६७:५-७
प्रार्थना
तुमच्या मनापासून येईपर्यंत प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणत राहा. केवळ तेव्हाच पुढील प्रार्थना अस्त्राकडे वळा. घाई करू नका.
1.माझ्या आणि माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या जीवनातून निराशेच्या आत्म्याला येशूच्या नावाने मी उपटून टाकतो. (यशया ६१:३)
2.पित्या, ख्रिस्त येशूमध्ये जे सर्व आशीर्वाद तू मला दिले आहेत त्यासाठी तुझा धन्यवाद होवो. (इफिस. १:३)
3.पित्या, येशूच्या नावाने माझ्या सर्व गरजा तू पूर्ण केल्या आहेत यासाठी मी तुझा ऋणी आहे. (फिलिप्पै. ४:१९)
4.परमेश्वरा, येशूच्या नावाने स्तुतीचे वस्त्र मला नेसव. (यशया ६१:३)
5.पित्या, तुझ्या आत्म्याने माझ्या हृदयाला पवित्र आत्म्याच्या आनंदाने भरावे असे येशूच्या नावाने होऊ दे. (रोम. १५:१३)
6.पित्या, तू माझ्या जीवनात जे सर्व केले आहे, करत आहे आणि करणार आहे त्यासाठी येशूच्या नावाने मी तुला कृतज्ञता व्यक्त करत आहे. (१ थेस्सलनीका. ५:१८)
7.पित्या, येशूच्या नावाने मी तुला धन्यवाद देतो कारण सर्वकाही माझ्या जीवनात चांगल्यासाठी घडत आहे. (रोम. ८:२८)
8.माझ्या जीवनात दु:ख आणण्यासाठी जे काही रचलेले आहे ते येशूच्या नावाने आशीर्वाद आणि आनंदामध्ये परिवर्तीत होवो. (उत्पत्ती ५०:२०)
9.हे परमेश्वरा, येशूच्या नावाने माझ्या मुखात स्तुतीचे नवीन गीत भर. (स्तोत्र. ४०:३)
10.माझ्या सभोवतालच्या परिसरात आणि जे या उपास आणि प्रार्थनेच्या २१ दिवसांच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत त्या सर्वांच्या जीवनात येशूच्या नावाने आनंद आणि उत्सवाचा ध्वनी दुमदुमत राहो. (स्तोत्र. ११८:१५)
11.देवाचा आदर आणि गौरव करण्यासाठी अन्य भाषेत प्रार्थना करा. (१ करिंथ. १४:२)
12.देवाची चांगली उपासना आणि स्तुती करण्यासाठी चांगला वेळ समर्पित करा. (स्तोत्र. ९५:६)
Join our WhatsApp Channel
Most Read
● आत्म्याद्वारे मार्गदर्शित होणे याचा काय अर्थ आहे?● भटकण्याचे सोडा
● तुम्ही आणि मी देवाची स्तुति का केली पाहिजे?
● शरण जाण्याचे ठिकाण
● विश्वासाचे बरे करणारे सामर्थ्य
● ख्रिस्ता मधील तुमच्या दैवी नियतीमध्ये प्रवेश करणे
● आत्म्यात उत्सुक असा
टिप्पण्या