डेली मन्ना
दिवस ३४:४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
Saturday, 13th of January 2024
31
19
801
Categories :
उपास व प्रार्थना
दारिद्र्याच्या आत्म्यावर उपाय
“एकदा संदेष्ट्यांच्या शिष्यांच्या स्त्रियांपैकी एकीने अलीशाकडे गाऱ्हाणे केले; ती म्हणाली, ‘तुझा सेवक माझा नवरा मरून गेला आहे; तुला ठाऊक आहे की तो परमेश्वराचे भय बाळगणारा होता. त्याचा सावकार माझ्या दोन पुत्रांना दास करून नेण्यासाठी आला आहे.’ अलीशाने तिला विचारले, ‘मी तुझ्यासाठी काय करू हे मला सांग; तुझ्या घरात काय आहे?’...तिने जाऊन देवाच्या माणसाला हे सांगितले. तो म्हणाला, ‘जा, तेल विकून आपले कर्ज फेज व जे शिल्लक राहील त्यावर आपला व आपल्या पुत्राचा निर्वाह कर.” (१ राजे ४:१, ७)
दारिद्र्यात राहणे हे यातनामय आहे. दारिद्र्य देवाचे गौरव करत नाही. ते दिवस आता निघून गेले आहेत जेव्हा दारिद्र्य आणि अभाव हे पवित्रतेसह चुकीने जोडलेले होते. तथापि, या वर्तमान काळात, येथे अजूनही काही लोक आहेत जे पवित्रतेला दारिद्र्य आणि अभावसह जोडतात. ते त्यास जगिक गोष्ट मानतात. परंतु ते तसे नाही. देवाचे वचन सांगते की पैसे सर्व गोष्टींना उत्तर देते (उपदेशक १०:१९). नैसर्गिक क्षेत्रात पुष्कळ गोष्टी पूर्ण करण्यासाठी पैशाची गरज लागते. ते अदलाबदलचे माध्यम आहे. मूल्य जतन करण्यासाठी देखील ज्याचा तुम्ही वापर करता हे ते आहे. पैसे हे साधन आहे ज्याचा वापर पृथ्वीवरील आपल्या जीवनाचा उद्देश पूर्ण करण्यासाठी केला पाहिजे. हे ते साधन देखील आहे ज्याचा वापर सुवार्तेच्या प्रगतीसाठी केला पाहिजे.
जेव्हा तुम्हांला पैशाचा अभाव असतो, तेव्हा नवीन कार्ये करण्याची तुमची क्षमता ही मर्यादित होते. देव ज्याची आपण सेवा करतो तो श्रीमंत आहे. तो गरीब देव नाही, आणि तरीही तो अत्यंत पवित्र आहे. स्वर्गातील रस्ते हे शुद्ध सोन्याने केलेले आहेत (प्रकटीकरण २१:२१). म्हणून, दारिद्र्य आणि अभावबरोबर पवित्रतेला जोडण्याचा कोणताही विचार हे नरकाच्या खड्ड्यातून पूर्णपणे खोटे आहे. आपल्या अढळ वचनापासून, तुम्ही पाहू शकता की विधवेचा पती हा प्रामाणिक संदेष्टा होता, देवाचा सेवक जो देवाचे भय बाळगणारा होता, पण तो कर्जात जगला, आणि कर्जात मरून गेला. पत्नीला कोणताही व्यवसाय नव्हता किंवा काहीही साधन नव्हते की कर्ज फेडावे. म्हणून, मग तिने दारीद्र्यावर कसा उपाय केला?
जर तुम्ही कथा वाचता, तेव्हा तुम्हांला कळते की या स्त्रीजवळ घरात तेलाची कुपी होती परंतु त्याचे काय महत्व आहे हे तिला माहित नव्हते. तिने तेलाच्या कुपीला वाढवले नाही जोपर्यंत संदेष्टा अलीशा येत नाही. पुष्कळ विश्वासणारे या विधवेसारखे आहेत; त्यांच्या घरात त्यांच्याजवळ तेलाची कुपी आहे, तरीही ते दारिद्र्यात राहतात. पुष्कळ प्रतिभावान लोक गरीब आहेत, त्यांना प्रतिभा नाही यामुळे नाही. त्यांची अद्वितीय क्षमता आणि गौरव पाहण्यापासून सैतानाने त्यांच्या डोळ्यांना आंधळे केल्यामुळे आहे.
आज, जेव्हा आपण दारिद्र्यावर उपाय करतो तेव्हा मला गरज आहे की तुम्हांला एक संतुलित दृष्टीकोन असावा आणि आध्यात्मिक बाजू आणि स्वाभाविक बाजूकडे देखील पाहावे. कधीकधी, लोक गरीब आहेत, हे त्यांच्या वित्तीयतेवरील हल्ल्यामुळे नाही, पण ते योग्य करत नसल्यामुळे आहे जेव्हा सृष्टीच्या संपत्तीच्या नियमाचा विचार येतो.
दारिद्र्याची कारणे काय आहेत?
१. दारिद्र्य हे पापामुळे देखील उद्भवू शकते.
पाप दारिद्र्याला हातभार लावू शकते. श्रीमंत लोक गरीब झाल्याची येथे अनेक उदाहरणे आहेत कारण त्यांनी त्यांचे हात पापात बुडवले आहेत.
अनुवाद २८:४७-४८ म्हणते,
“कारण सर्व गोष्टींची समृद्धी असताना तू आनंदाने व उल्हासित मनाने आपला देव परमेश्वर ह्याची सेवा केली नाही, म्हणून तू भुकेला, तहानेला, नग्न आणि सर्व बाबतींत गरजवंत होऊन, ज्या तुझ्या शत्रूंना परमेश्वर तुझ्यावर पाठवील त्यांचे तुला दास्य करावे लागेल; तुझा नाश करीपर्यंत तो तुझ्या मानेवर लोखंडी जूं ठेवील.”
कारण लोक देवाची आज्ञा पाळण्यात चुकले आहेत, त्यांना दारिद्र्यात, अभावात जगण्याची अट केली आहे.
२. आळशीपणा देखील दारिद्र्याला हातभार लावू शकतो.
स्त्री जिच्याजवळ तेलाची कुपी होती तिला त्याचे काय करावे हे माहित नव्हते; ती त्याच्यासह निष्क्रिय होती. नीतिसूत्रे ६:१०-११ म्हणते, “आणखी थोडीशी झोप घेतो, आणखी थोडीशी डुलकी खातो, आणखी हात उराशी धरून निजतो. असे म्हणत जाशील तर तुला दारिद्र्य दरोडेखोराप्रमाणे, आणि गरिबी तुला सशस्त्र मनुष्याप्रमाणे गाठील.”
आळशी माणसाला शेवटी दारिद्र्याच येते कारण दारीद्र्यावर उपाय करण्यासाठी तुला काम केले पाहिजे. म्हणजे, काम हे दारीद्र्यावर उपचार आहे. तुम्ही कठीण परिश्रम केले पाहिजे.
३. दारिद्र्य हे दुर्दैवाने देखील निर्माण होऊ शकते. कोणीतरी त्याची संपत्ती गमावण्याशी याचा संबंध आहे. एक चांगले उदाहरण हे ईयोबाचे आहे. ज्यासाठी त्याने परिश्रम केले होते ते सर्वकाही त्याने गमावले. तो एक मेहनती माणूस होता. त्याने कोणतेही पाप केले नव्हते, तरीही त्याने त्याची संपत्ती गमावली. कारण तेथे त्याच्या वित्तीयतेवर आध्यात्मिक हल्ला झाला होता. म्हणजे आध्यात्मिक हल्ला देखील दारिद्र्य आणू शकतो. ते दुर्दैव आणू शकते जे मग त्या व्यक्तीजवळ जे सर्वकाही आहे ते गमावण्याकडे घेऊन जाते.
शास्ते अध्याय ६:६ मध्ये, तुम्ही गिदोनाची कथा पाहाल. लोकांनी जे पेरलेले आहे त्याचा नाश करण्यासाठी मिद्यानी लोक येत होते.
“मिद्यानामुळे इस्राएल लोकांची हलाखीची अवस्था झाली, तेव्हा इस्राएल लोकांनी परमेश्वराचा धावा केला.”
जेव्हा तुम्ही ज्या गोष्टी दारिद्र्य आणत आहे हे समजता तेव्हा तुमच्या जीवनात त्या गोष्टींवर प्रभावीपणे उपाय करण्यासाठी तुम्ही सक्षम व्हाल. कधीकधी, प्रार्थना ही दारीद्र्याला हाताळण्यासाठी उपाय होऊ शकते; इतर वेळी ते कठीण परिश्रम असू शकते.
४. शिस्तीच्या अभावामुळे दारिद्र्याला हातभार लावला जाऊ शकतो.
तुमच्या खर्च करण्यात तुम्हांला शिस्तबद्ध असले पाहिजे. तुमच्या वेळेच्या वापराबाबत तुम्हांला शिस्तबद्ध असले पाहिजे. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हांला शिस्तबद्ध असले पाहिजे. तुमच्या जीवनात तुम्हांला शिस्तबद्ध असले पाहिजे. तुम्ही पैसे कसे खर्च करता? यापैकी काही गोष्टी ह्या किरकोळ गोष्टी आहेत जे दारिद्र्य आणते.
५. देवाचे वचन न पाळणे देखील दारिद्र्य आणू शकते.
जेव्हा आपण देवाच्या वचनाचे पालन करत नाही, तेव्हा आपण आपल्या स्वतःला छळण्यासाठी सैतानासाठी योग्य जमीन तयार करत असतो. देवाचे वचन आशीर्वाद आणि परिणामासह येते. जर तुम्ही त्याचे पालन करता, तर तुम्ही आशीर्वादाचा आनंद घेता. जेव्हा तुम्ही त्याचे पालन करत नाही, तेव्हा त्याचे परिणाम आपोआप निर्माण होतात.
६. सैतानी कृत्ये देखील दारिद्र्याकडे नेऊ शकते. (लूक. ८:४३-४८).
स्त्री जिला रक्त वाहण्याचा आजार होता तिने तिची सर्व संपत्ती तिच्या आरोग्यावर खर्च केली होती. आरोग्याविषयक आव्हाने (आजार आणि रोग) हे काही मार्ग आहेत ज्याद्वारे सैतान लोकांच्या वित्तीयतेवर हल्ला करतो, जे त्यांना प्रत्येक आठवड्याला किंवा महिन्याला औषधांसाठी हजारो रुपये खर्च करायला लावतो.
येथे वेगवेगळे मार्ग आहेत ज्याद्वारे सैतान लोकांच्या वित्तीयतेवर हल्ला करतो. ह्या सर्व सैतानी हल्ल्यांवर प्रार्थनेच्या ठिकाणी उपाय केला जाऊ शकतो.
आज, ज्या गोष्टींचा मी उल्लेख केला आहे त्याद्वारे आपल्याला दारीद्र्यावर उपाय करण्याची गरज आहे. आपण प्रभावीपणे त्यावर उपाय केला पाहिजे आणि त्याबद्दल निष्क्रिय राहू नये.
प्रार्थना
तुमच्या मनापासून येईपर्यंत प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणत राहा. केवळ तेव्हाच पुढील प्रार्थना अस्त्राकडे वळा. घाई करू नका.
१. माझे वित्तीयता, कुटुंब, व्यवसाय आणि माझ्या जीवनातील सर्व क्षेत्रातील गरिबीचा प्रत्येक प्रकार येशूच्या नावाने संपुष्टात येतो.
२.येशूच्या नावाने, माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या जीवनातील दारिद्र्याच्या आत्म्यापासून येशूच्या नावाने मी वेगळा होत आहे. (अनुवाद ८:१८)
३.दारिद्र्याला हातभार लावणाऱ्या माझ्या वंशपरंपरागत कोणत्याही पद्धतींना, येशूच्या रक्ताद्वारे, येशूच्या नावाने मी तोडून टाकतो आणि त्यास नष्ट करतो. (गलती. ३:१३-१४)
४.कोणतीही शक्ती जी माझ्या वित्तीयतेवर हल्ला करत आहे, येशूच्या नावाने नष्ट होवो. येशूच्या नावाने मी तुझ्या कोणत्याही कार्यांना माझ्या वित्तीयतेवर प्रतिबंध करतो. (३ योहान २)
५.येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्ही जो माझा आशीर्वाद गिळून टाकत आहात तुम्ही मरून जावोत. (मलाखी ३:११)
६.हे परमेश्वरा, मला प्रगतीची कल्पना प्रदान कर, जी मला विपुलतेच्या क्षेत्रात प्रवेश करण्यास येशूच्या नावाने कारणीभूत होऊ दे. (नीतिसूत्रे ८:१२)
७.पित्या, मला मोठ्या संधी आणि योग्य लोकांशी येशूच्या नावाने संपर्कात आण. (नीतिसूत्रे ३:५-६)
८.पित्या, मला पुरेशा नाही या क्षेत्रापासून ते अपेक्षेपेक्षा अधिक क्षेत्रात येशूच्या नावाने घेऊन चल. (फिलिप्पै. ४:१९)
९.माझे गमावलेली सर्व संपत्ती, गौरव आणि संसाधने येशू ख्रिस्ताच्या नावाने आताच माझ्याकडे परत प्रवाहित होऊ दे. (योएल २:२५)
१०.पित्या, मला समृद्धी पाठव; येशूच्या नावाने तुझ्या पवित्रस्थानातून मला मदत पाठव. (स्तोत्र. २०:२)
११.पित्या, मी प्रगतीच्या कल्पनांसाठी प्रार्थना करतो. मी प्रार्थना करतो की माझा व्यवसाय दृष्टीक्षेपात यावा. आणि हे की तुझे गौरव माझे जीवन आणि माझ्या वित्तीयतेवर येशूच्या नावाने उदय व्हावे. (यशया ६०:१)
Join our WhatsApp Channel
Most Read
● सत्ता हस्तांतराची ही वेळ आहे● कृतज्ञतेसाठी एक धडा
● देवाचे वचन आपल्या अंतःकरणात रोपावे (लावावे).
● अविश्वास
● सात-पदरी आशीर्वाद
● आपल्या आध्यात्मिक पात्याचे रक्षण करणे
● देवाचे 7 आत्मे
टिप्पण्या