डेली मन्ना
तुमच्या सुखकारक क्षेत्रामधून बाहेर पडा
Friday, 26th of January 2024
28
18
1113
Categories :
सुख
परमेश्वराने अब्रामास सांगितले, तूं आपला देश, आपले नातेवाईक व आपल्या बापाचे घर सोडून मी दाखवीन त्या देशात जा; मी तुजपासून मोठे राष्ट्र निर्माण करीन; मी तुला आशीर्वाद देईन, तुझे नांव मोठे करीन; तूं आशीर्वादित होशील." (उत्पत्ति १२:१-२)
प्रत्येकाला सुखकारक क्षेत्र असते
- येथे काही निश्चित तापमान आहे ज्यात आपल्याला अत्यंत सुखकारक असे वाटते.
- येथे जीवनाचा काही मार्ग आहे ज्यात आपल्याला फार बरे वाटते.
- चर्च संपल्यावर येथे काही घोळका आहे ज्यांना आपण भेटतो ज्यात आपल्याला अत्यंत सुखकारक असे वाटते.
सुखकारक क्षेत्र काय आहे?
तुमचे सुखकारक क्षेत्र हे लोक, ठिकाणे, गोष्टी व सवयी ज्याशी तुम्ही परिचित आहात त्यांनी बनलेले असते.
देवाने अब्राहम ला आशीर्वाद देण्याअगोदर, देवाने अब्राहामाला त्या सुखकारक क्षेत्रामधून बाहेर जाण्यास सांगितले.
वास्तविकता ही आहे की जोपर्यंत आपण आपल्या सुखकारक क्षेत्रामधून बाहेर निघत नाहीत, तोपर्यंत देवाला जसे पाहिजे तसे तो आपल्याला आशीर्वाद देणार नाही.
जेव्हा त्याने (प्रभु येशूने) बोलणे थांबविले, तेव्हा त्याने शिमोनाला म्हटले, "खोल पाण्यात हाकार; मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा." (लूक ५:४)
परमेश्वराला तुम्हाला आशीर्वाद द्यायचा आहे-मोठी वेळ! हे ह्या कारणासाठी त्याने शिमोनाला म्हटले, "खोल पाण्यात हाकार; मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा." खोल ठिकाणीच तुम्ही चांगल्या प्रकारचे आणि खूप मासे मिळवू शकता. तुम्ही किनाऱ्यावर थोड्याश्या पाण्यात त्यांना मिळवू शकत नाही. परंतु खोल ठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला किनाऱ्यावरच्या सुखकारक ठिकाणाहून जावे लागणार.
आता, जर तुमच्या आशीर्वादापेक्षा तुमचे सुखकारक जीवन तुम्हाला महत्वाचे असेन, तर तुम्ही तुमचा आशीर्वाद कधीही प्राप्त करणार नाही परंतु ते जे तुमच्या सुखकारक क्षेत्रामधून बाहेर जाण्यास तयार आहेत, परमेश्वर म्हणत आहे, "मी नवीन गोष्टी करेन."
येथे काही आहेत जे त्यांच्या आध्यात्मिक सुखकारक क्षेत्रामध्ये समाधानी झाले आहेत.
- आपल्यापैकी काही अनेक वर्षे १५ मिनिटे प्रार्थना करीत आहेत
- आपल्यापैकी काही आत्मे कधीही जिंकित नाहीत.. आपण जे नेहमीचे लोक आपल्या चर्च मध्ये येतात त्यांच्याबरोबरच आनंदी आहोत.
- आपल्यापैकी काही रुपये ५० किंवा रुपये १०० पेक्षा जास्त कधीही देत नाहीत. (मी हे यासाठी म्हणत नाही की मला तुमचे पैसे मिळतील. हे ह्यासाठी की तुम्ही त्या चाकोरीबद्ध पद्धतीमधून बाहेर पडावे.)
- आपल्यापैकी काहींनी कधीही उपास हा केलेला नाही
- आपल्यापैकी काही अजूनही ते कटुत्व घेऊन चालत आहेत, कोणा विरुद्ध वाईटपण महिनोमहिने आणि कदाचित अनेक वर्षे ठेवत आहेत. हे अनेकांसाठी फारच सुखकारक असे वाटते.
येशूने त्यांना भाकर व मासे (सुखकारक भोजन) देऊन तृप्त केले आणि ते जवळजवळ त्यास राजा करू पाहत होते.
ज्याक्षणी त्याने त्याचे शरीर हे खरे खाद्य व त्याचे रक्त हे खरे पेय आहे असे म्हटले (असुखकारक भोजन), ते ताबडतोब त्यास सोडून गेले. आज सुद्धा हे अनेकांबरोबर असेच आहे. कृपा करून त्यांच्यासारखे होऊ नका.
आपण जेव्हा अत्यंत सुखकारक होतो, आपण तेथून निघण्याची शक्यता फारच कमी असते. मग आपण एक चळवळ होण्याऐवजी एक स्मारक असे होतो.
अब्राहामाला पाचारण झाल्यावर जे ठिकाण त्याला वतनादाखल मिळणार होते तिकडे 'निघून जाण्यास' तो विश्वासाने मान्य झाला; आणि आपण कोठे जातो हे ठाऊक नसताही 'तो निघून गेला.' (इब्री ११:८)
अनेक जण त्यांच्या अंतिम ठिकाणी पोहचू शकले नाही कारण त्यांच्या सुखकारक क्षेत्रामधून बाहेर पडण्याची किंमत भरण्यास त्यांनी नकार दिला. वेगळे असे दाखविण्याचे धैर्य करा. तुमच्या सुखकारक क्षेत्रामधून बाहेर निघा ज्यासाठी परमेश्वराने तुम्हाला पाचारण केले आहे.
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना अस्त्र जोपर्यंत तुमच्या हृदयातून येत नाही तोपर्यंत ते वारंवार म्हणा. प्रत्येक प्रार्थना अस्त्र कमीत कमी २ मिनिटे पुन्हा पुन्हा म्हणा.
१. पित्या, मला सामर्थ्य दे की माझ्या रोजच्या जीवनासाठी तुझी जी योजना आहे ती पूर्ण करावी.
२. प्रत्येक कुंठीत होण्याची शक्ती जी माझ्या विरुद्ध कार्यरत आहे, मी त्यास भस्म होण्यासाठी बोलत आहे. तुझी वेळ संपली आहे. येशूच्या नांवात आता मला सोड.
३. येशूच्या नांवात, मी उच्च स्तरावर जात आहे.
१. पित्या, मला सामर्थ्य दे की माझ्या रोजच्या जीवनासाठी तुझी जी योजना आहे ती पूर्ण करावी.
२. प्रत्येक कुंठीत होण्याची शक्ती जी माझ्या विरुद्ध कार्यरत आहे, मी त्यास भस्म होण्यासाठी बोलत आहे. तुझी वेळ संपली आहे. येशूच्या नांवात आता मला सोड.
३. येशूच्या नांवात, मी उच्च स्तरावर जात आहे.
Join our WhatsApp Channel
Most Read
● अडथळ्याचा धोका● देवाला प्रथम स्थान देणे # 1
● तुम्ही किती मोठ्याने बोलू शकता?
● परमेश्वरा जवळ या
● मोठया संकटात
● आध्यात्मिक वाढीचे शांत गुदमरवणारे
● पृथ्वीवरील राजांचा अधिपती
टिप्पण्या