योहान. १४:२७मधील हृदयाला स्पर्श करणाऱ्या वचनांमध्ये, प्रभू येशू त्याच्या शिष्यांना गहन सत्य सांगत आहे, शांतीचा वारसा: “मी तुम्हांला शांती देऊन ठेवतो; मी आपली शांती तुम्हांला देतो; जसे जग देते तसे मी तुम्हांला देत नाही. तुमचे अंत:करण अस्वस्थ अथवा भयभीत होऊ नये.” प्रभू येशूने ही घोषणा केली जेव्हा त्याने या पृथ्वीवरून प्रस्थान करण्याची तयारी केली, ज्यात शांतीच्या स्वरूपाबद्दल महत्वाचे सत्य आहे.
१. दैवी देणगी म्हणून शांती
अ.] शांती प्रदान करणे
शांती ही मनाची स्वयं-निर्मित अवस्था आहे या विश्वासाच्या उलट, बायबल एक दैवी देणगी म्हणून तिच्यावर भर देते. योहान. १४:२७मध्ये, येशू जगाच्या शांतीपासून तो देणाऱ्या शांतीमध्ये फरक दाखवतो. फिलिप्पै. ४:७मध्ये ते प्रतिध्वनित झाले आहे, “म्हणजे सर्व बुद्धीसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाने दिलेली शांती तुमची अंत:करणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.” ही शांती आपल्या मानवी प्रयत्नांचे कृत्य नाही, पण प्रभूकडून एक देणगी आहे.
ब.] शरण जाण्याने शांती
लूक. १०:३८-४२मध्ये मार्था आणि मरीयेची कथा मानवी प्रयास आणि दैवी शांतीच्या विरोधावर ठळकपणे बोलते. मार्था सेवा करण्याच्या व्यवसायात व्यस्त असताना, मरीया येशूच्या चरणापाशी बसण्याची निवड करते, जे शरण जाणे आणि स्वीकारण्याचे मूर्त स्वरूप दर्शवते. हे कृत्य खऱ्या शांतीच्या मार्गाचे प्रतिक आहे- भयभीत कृत्यांनी नाही, तर देवाच्या उपस्थितीला शांततेने आणि शरण जाण्याद्वारे आहे.
२. आत्म्याचे फळ
“२२ आत्म्याच्या द्वारे निष्पन्न होणारे फळ, प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, २३ सौम्यता, इंद्रियदमन हे आहे, अशांविरुद्ध नियमशास्त्र नाही.” (गलती. ५:२२-२३)
हे वचन शांतीला आत्म्याचे फळ म्हणून स्पष्ट करते. काहीतरी जे आपल्यामध्ये वाढते जेव्हा आपण आत्म्यात जीवन जगतो. शांती ही आध्यात्मिक परिपक्वतेचे चिन्ह आहे, शांत आश्वासन जे देवासोबतच्या गहन नातेसंबंधापासून निर्माण होते.
३. शांतीचे साधन होणे
अ.] शांती पसरविणे
देवाची शांती प्राप्त करणारे म्हणून, आपण ख्रिस्ती लोकांना या संकटग्रस्त जगात शांतीचे दूत म्हणून बोलावण्यात आले आहे. मत्तय. ५:९, घोषित करते, “जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील.” शांती करणे हे निष्क्रिय कृत्य नाही तर देवाकडून मिळालेल्या शांततेचा सक्रीय प्रसार करणे आहे.
ब.] गोंधळात शांतता
जीवनाच्या वादळांमध्ये, देवाची आतील शांती स्थिर पाया म्हणून कार्य करते. जसे स्तोत्र. ४६:१० सल्ला देते, “शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे.” गोंधळाच्या मध्य आपण ते प्राप्त करतो, जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांना तो अलौकिक विसावा उपलब्ध आहे.
४. दररोज शांतीची जोपासना करणे
अ.] देवासोबत दिवसाची सुरुवात करावी
प्रार्थना आणि वचन वाचण्याद्वारे देवासोबत प्रत्येक दिवसाची सुरुवात करणे ही या विश्वासाची जोपासना करण्यासाठी महत्वाची आहे. यशया २६:३ आश्वासन देते, “ज्याचे मन तुझ्या ठायी स्थिर झाले आहे त्याला तू पूर्ण शांती देतोस, कारण त्याचा भाव तुझ्यावर असतो.” हे दररोजचे आचरण हे केवळ विधी नाही परंतु देवाच्या उपस्थितीत आपले मन एकरूप करण्याचा मार्ग आहे.
ब.] शांतीमध्ये परिपक्व होणे
जेव्हा आपण दररोज या वागणुकीमध्ये राहतो, तेव्हा देवाची शांती आपल्यात वाढत जाते, परिपक्व होते आणि गहन होत जाते. प्रेषित पौलाचे जीवन याची साक्ष आहे, जेव्हा त्याने संकटे आणि छळाच्या मध्ये शांती राखून ठेवली, जसे २ करिंथ. १२:९-१० मध्ये वर्णन केलेले आहे.
“९ परंतु त्याने मला म्हटले आहे, ‘माझी कृपा तुला पुरेशी आहे; कारण अशक्तपणातच माझी शक्ती पूर्णतेस येते.’ म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेषेकरून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन. १० ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे ह्यांत मला संतोष आहे; कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे.”
शांती जी येशू प्रदान करतो ती गहन वारसा आहे, जी जगाच्या समजेच्याही पलीकडील आहे. ती एक देणगी आहे जी शरण जाणे, देवासोबत दररोजची सहभागीता जोपासण्याद्वारे प्राप्त केली जाते आणि आपल्या जीवनात शांती करणारे म्हणून प्रगट होते. अशांत अशा जगात, ही दैवी शांती आशेचे किरण आणि आपल्या जीवनात ख्रिस्ताच्या जिवंत उपस्थितीची साक्ष म्हणून स्थिर राहते.
प्रार्थना
पित्या मी तुझा धन्यवाद करतो, येशूच्या बहुमुल्य रक्तासाठी ज्याने तुझ्या व माझ्या मध्ये शांति आणली आहे. येशू ख्रिस्त हा सदा सर्वकाळ माझा प्रभु आणि तारणारा आहे. मी तुझी शांति माझ्या जीवनात प्राप्त करतो. (आता तुमचे हात वर करा, तुमचे डोळे बंद करा आणि हळूहळू व सौम्यपणे येशू म्हणत राहा) कृपा करून प्रयत्न करा व हे दररोज करा.
तुमचे देवाबरोबर आणि मनुष्यांबरोबर चालणे हे बदलेल.
तुमचे देवाबरोबर आणि मनुष्यांबरोबर चालणे हे बदलेल.
Join our WhatsApp Channel
Most Read
● त्याला सर्व सांगा● पवित्र आत्म्यासाठी संवेदनशीलता विकसित करावी-१
● विश्वासात परीक्षा
● देवाच्या प्रकारची प्रीति
● परमेश्वरा मध्ये स्वतःला कसे प्रोत्साहित करावे
● चला आपण परमेश्वराकडे वळू या
● देवाचे वचन वाचण्याचे 5 लाभ
टिप्पण्या