डेली मन्ना
तुमचा दिवस तुमची व्याख्या देतो
Tuesday, 20th of February 2024
30
21
858
Categories :
Discipleship
प्रत्येक दिवस हा तुमच्या जीवनाचे औपचारिक चित्रण आहे. तुम्ही तुमचा दिवस कसे घालविला, गोष्टी ज्या तुम्ही करता, त्या दिवसा दरम्यान लोक ज्यांना तुम्ही भेटता हे सर्व तुमचे भविष्य कसे वळण घेईल याविषयी बरेच काही प्रगट करते. जेव्हा तुम्ही तुमचा दिवस जगता, तसेच तुम्ही तुमचे भविष्य घडविता.
पवित्र शास्त्र सुद्धा 'दररोज' विषयी महत्वावर जोर देते, प्रभु येशूने म्हटले, "जर कोणी माझ्या मागे येऊ पाहतो तर त्याने आत्मत्याग करावा व दररोज स्वतःचा वधस्तंभ उचलून घेऊन मला अनुसरावे." (लूक ९:२३)
येशूच्या मागे चालणे ही आठवड्याची, महिन्याची किंवा वर्षाची गोष्ट नाही-ती दररोजची गोष्ट आहे जी आपल्याला करण्याची गरज आहे.
परमेश्वराचे गुणगान करा, त्याच्या नांवाचा धन्यवाद करा; त्याने केलेल्या तारणाची घोषणा प्रतिदिवशी करा. (स्तोत्र ९६:२)
'प्रतिदिवशी' ह्या वाक्प्रचार कडे लक्ष दया. त्याचा सरळ अर्थ हा, 'दररोज'. आपल्याला प्रतीदिवशी नियमितपणे उपासना [परमेश्वराला गुणगान गाणे] करण्याची गरज आहे. आपल्याला प्रतीदिवशी नियमितपणे आपल्या जीवनात त्याची साक्ष सुद्धा देण्याची गरज आहे आणि हे केवळ आठवड्याला किंवा महिन्याच्या आधारावर नाही.
येथे अशी काही गोष्ट नाही की हा महत्वाचा दिवस किंवा हा व्यर्थ दिवस. ह्यामुळेच बायबल म्हणते:
"परमेश्वराने नेमिलेला दिवस हाच आहे. ह्यांत आपण उल्लास व आनंद करू." (स्तोत्र ११८:२४)
परमेश्वर तुमच्यावर जबरदस्ती करणार नाही की उल्लास व आनंद करा. आपल्या जीवनात आणखी एक दिवस जोडल्या बद्दल देवाला धन्यवाद देणे व आनंद करणे ही आपली निवड आहे.
तर तुम्ही पाहता, की तुमच्या भविष्याचे गुपित हे तुमच्या दररोजच्या नियमित कार्यात लपलेले आहे. कोणीतरी म्हटले आहे, "मला तुमचे दररोजचे नियमित कार्य दाखवा आणि मी तुम्हाला सांगेन तुम्ही किती अधिक प्रगती कराल." अनेक अत्यंत श्रीमंत लोकांना हे रहस्य ठाऊक आहे आणि आता वेळ झाली आहे की तुम्ही व मी याविषयी समजले पाहिजे.
प्रभु येशूने म्हटले, "ह्यास्तव उद्याची चिंता करू नका, कारण उद्याची चिंता उदयाला; ज्या दिवसाचे दु:ख त्या दिवसाला पुरे." (मत्तय ६:३४)
उद्या काय घडेल याविषयी अनेक हे चिंतेत व उत्सुकतेमध्ये असतात. प्रभु येशू आपल्या "आज" वर लक्ष केंद्रित करा हे सांगण्याद्वारे चिंता व काळजी वर प्रभुत्व करण्याचे रहस्य प्रगट करतो. उदयाच्या कापणी करिता आज हे बी आहे. तुम्ही एक विद्यार्थी, एक अधिकारी, किंवा एक व्यवसायिक व्यक्ति असाल, जर तुम्ही आज तुमचे उत्तम ते कार्य कराल, तर तुमच्या उद्याची काळजी केली जाईल.
आणखी एक गोष्ट: मी ऐकले होते देवाच्या एक महान मनुष्याने एकदा म्हटले होते, "देवाने-दिलेल्या स्वप्नाभोवती तुम्ही तुमचे दररोजचे कार्यक्रम हे नेहमी बनविले पाहिजे." म्हणजे प्रत्येक भेटी, जे सर्व काही तुम्ही करता, जेथे कोठे तुम्ही जाता, तुम्ही कोणाला भेटता हे सर्व त्यानुसार आयोजित करावे. हेच काय ते मी प्रयत्न केले व करतो. ते कोणा व्यक्तीला कदाचित निराश करेल परंतु शेवटी ज्याने तुम्हाला बोलाविले आहे त्यास तुम्ही प्रसन्न कराल.
अंगीकार
(हे दररोज म्हणा) आज हा माझ्या जीवनाचा उत्तम दिवस आहे, आज मी पूर्वी कधीही केले नाही तसे प्रार्थना व उपासना करीन, पूर्वी कधीही नाही त्याप्रमाणे मी आज देवाची कृपा अनुभवेन, आज मी माझ्या दैवी सहाय्यकास भेटेन, आजचा दिवस हा उल्लास व हर्षाचा दिवस आहे.
Join our WhatsApp Channel
Most Read
● उपासाचे जीवन-बदलणारे लाभ● मनुष्यांची परंपरा
● तुम्ही एक खरे उपासक आहां काय?
● दैवी भेट देण्याचा तुमचा क्षण ओळखा
● वरील आणि समानांतर क्षमा
● वेदीवर अग्नी कसा प्राप्त करावा
● कलंकित करणाऱ्या पापासाठी अद्भुत कृपेची आवश्यकता आहे
टिप्पण्या