अब्राहामाला सारेपासून मुलगा झाला त्याचे नांव त्याने इसहाक ठेविले. (उत्पत्ति २१:३)
सामाजिक माध्यमात मो ह यास मोठयाने हसणे असे म्हटले जाते. मी खात्रीशीर नाही की किती खरेच हसतात जेव्हा ते तशा प्रकारे व्यक्त करण्याचा वापर करतात. बायबल मध्ये उत्पत्ति १७ मध्ये पहिल्यांदा हसण्याचा संदर्भ दिला आहे.
अब्राहामाला, परमेश्वरा द्वारे आश्वासन दिल्यानंतर की त्यास पुत्र होईल, या वास्तविकतेमध्ये विनोद सापडतो की परमेश्वराने वाट पाहिली जोपर्यंत अब्राहाम व सारा हे अत्यंत वृद्ध होत नाहीत की त्यांस बाळ होणे अशक्य होईल! तो हसला (उत्पत्ति १७:१७), याकारणासाठी नाही की त्याने देवाच्या सनातन सामर्थ्यावर शंका घेतली (रोम ४:२०-२१), परंतु केवळ आनंदाने भरून की तो पिता होईल जेव्हा त्याचे वय १०० वर्षाचे होईल!
परमेश्वर त्याचा मित्र, अब्राहामाच्या हसण्याच्या प्रत्युत्तरात, निर्णय घेतो की स्वतःच त्या मुलाचे नांव ठेवावे! तो घोषित करतो की मुलाचे नांव इसहाक ठेवावे, इब्री भाषे मध्ये त्याचा अर्थ, "तो हसतो" किंवा "हसणे" (उत्पत्ति १७:१९).
परमेश्वराने जेव्हा सारेला सांगितले की त्यांना त्यांच्या वृद्धापकाळी पुत्र होईल, ती हसली, कारण ती त्यावर विश्वास ठेवू शकली नाही. आता, शंके चे हसणे हे हर्षाचे हसणे झाले होते, जेव्हा परमेश्वराने त्यांना दिलेले आश्वासन पूर्ण केले होते.
आणि सारा म्हणाली, "देवाने मला हसविले आहे; जो कोणी हे ऐकेल तो माझ्याबरोबर हसेल." (उत्पत्ति २१:६)
आपल्या जीवनात येथे दोन प्रकारचे लोक असतात. एक जो तुमच्यावर हसेल व एक जो तुमच्याबरोबर हसेल. मला विश्वास आहे की परमेश्वर तुम्हाला त्या ऋतू मध्ये आणत आहे जेथे परमेश्वर तुमची निंदा करणाऱ्यांस धक्का देईल व आश्चर्यात टाकेल. परमेश्वर तुम्हांला लोक देईल जे तुमच्याबरोबर हसतील.
हसणे हे तणाव व चिंतेच्या नकारात्मक परिणामावर एक सामर्थ्यशाली प्रतिबंधक असे आहे. संशोधन दर्शविते की आपले आरोग्य व कल्याणासाठी विनोदाचे अनेक लाभ आहेत. चांगले हसण्याप्रमाणे काही गोष्टी नकारात्मक प्रभाव जो तणाव आणतो त्याविरोधात ताबडतोब कार्य करतात. विनोद आपल्या भावनांना सौम्य करतो, आपल्याला चांगले वाटेल असे करतो, आणि कमी तणावात आहो असे करतो. परमेश्वराने त्याच्या ज्ञानामध्ये आपल्याला हसणे हे एका उद्देशाने दिले आहे.
हसण्यास येथे आध्यात्मिक घटक सुद्धा आहे. परमेश्वर तुम्हाला पुन्हा हसवेल,
आनंदाच्या ओरडण्याने तुम्ही तुमची छप्परे उंच वाढवाल,
तुमच्या शत्रूला पूर्णपणे कमी लेखण्यात येईल, पत्त्यांचे त्यांचे घर कोसळून जाईल. (ईयोब ८:२१ एमएसजी)
मी विश्वास ठेवतो की छप्पर उंच करणे म्हणजे मर्यादा वाढवणे जे जगाने तुमच्यावर ठेवले आहे, तुमच्या भोवतालच्या लोकांनी तुमच्यावर ठेवले आहे, कदाचित मर्यादा जी तुम्ही स्वतःच तुमच्यावर ठेवली असेन. परमेश्वर तुम्हाला पुन्हा हसवेल. हे वचन प्राप्त करा!
प्रार्थना
पित्या, माझे मुख व माझ्या कुटुंबाच्या सदस्यांची मुखे हसण्याने भरून टाक. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● स्वर्गाचे द्वार उघडा व नरकाचे द्वार जोरानेबंद करा● येशू स्वर्गात काय करीत आहे
● तुम्ही मत्सरास कसे हाताळाल
● तुमचे तारण झालेच्या दिवसाचा उत्सव करा
● २१ दिवस उपवासः दिवस १५
● दानधर्म करण्याची कृपा-२
● तुमच्या अंत:करणाचे परिश्रमपूर्वक रक्षण करा
टिप्पण्या