आजच्या समयात आपल्याकडे अद्भुत सेलफोन आहे. काही सेलफोन हे महाग आहेत आणि काहींच्या फारच कुशलतेने किंमती ठरविल्या आहेत आणि कमी महाग आहेत. आता तुमच्याकडे या पृथ्वीवरील सर्वात महाग फोन असेल परंतु जर तो टॉवर ला जुडलेला नसेल, तर त्याचा काहीही उपयोग नाही. तुम्ही त्याच्यासह काहीही लाभदायक काम करू शकत नाही केवळ काही खेळ खेळण्यावाचून. जुडलेले राहणे ही किल्ली आहे.
तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हांमध्ये राहीन. जसे फाटा वेलांत राहिल्यावाचून त्याला आपल्याआपण फळ देता येत नाही तसे माझ्यामध्ये राहिल्यावाचून तुम्हांलाही देता येणार नाही." (योहान १५:४)
केवळ द्राक्षवेलात जुडलेले राहणे जीवन देते.
केवळ द्राक्षवेलात जुडलेले राहून तुम्ही फळ निर्माण करू शकता.
येथे जीवनात काही गोष्टी आहेत ज्या नकली असू शकत नाही. त्यापैकी एक हे आपले येशू बरोबर जुडलेले राहणे. काही प्रयत्न करतात, परंतु ते काही वेळानंतर स्पष्ट असते.
जर मी एखादया शाखेस झाडाला चिटकविले, तर काय शाखा वाढेल, व त्यावर पाने व फळ येतील काय? नाही. ते मृत आहे. केवळ त्यास झाडाला चिटकविले म्हणजे त्याचा अर्थ हा नाही की ते खरेच झाडाला जुडलेले आहे. त्यास झाडाच्या जीवन देणाऱ्या गाभ्यात जुडलेले असण्याची गरज आहे, की शाखे मध्ये जीवन मिळण्यास योग्यता यावी.
प्रभु येशूने म्हटले, "कोणी माझ्यामध्ये राहिला नाही तर त्याला फाट्याप्रमाणे बाहेर टाकतात व तो वाळून जातो; आणि तसले फाटे गोळा करून अग्नीत टाकतात व ते जळून जातात." (योहान १५:६)
हे आपल्यासाठी सोपे आहे की येशू बरोबर जुडलेले आहे असे दिसावे. परंतु आपण जर त्याचे वचन, प्रार्थना व पवित्र प्रभूभोजन द्वारे त्याबरोबर खरेच ख्रिस्ता "मध्ये" जुडलेले नाही- तर शाखे प्रमाणे जी खरेच द्राक्षवेल बरोबर जुडलेली नाही, आपला विश्वास हा नष्ट होईल.
अनेक लोक आमच्या सभेला येतात आणि त्यासाठी मी देवाचा धन्यवाद करतो. तथापि, मी नेहमी पाहतो अनेक जण हे जेव्हा उपासना होत असते, ते केवळ येथे तेथे पाहत असतात. ते सहज विचलित होतात, कोणाबरोबर बोलतात वगैरे.
हजर राहणे हे केवळ धार्मिक कर्तव्य पूर्ण करणे आहे. हा तो संबंध आहे जो बदल आणतो. आणि मग आपण तो संबंध कसा बनवावा? हे ते जुडणे आहे जे संबंध बनविते व सांभाळते.
तर मग, जेव्हा तुम्ही उपासनेला हजर राहता, देवाच्या आत्म्याबरोबर जुळा. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता किंवा बायबल वाचत आहात त्याशी जुळा. सर्व अडथळे दूर करण्याचा व काढून टाकण्याचा प्रयत्न करा. तुम्ही लवकरच परिणाम पाहाल.
प्रार्थना
प्रभु येशू, तूं वास्तवात खरी द्राक्षवेल आहेस. नेहमी तुझ्या बरोबर जुडलेले राहण्यास मला साहाय्य कर. असे होवो की माझे जीवन फळ निर्माण करो जे तुला गौरव व आदर आणेन. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● पृथ्वीवरील राजांचा अधिपती● परमेश्वरा जवळ या
● दैवीव्यवस्था-२
● आत्मे जिंकणे-ते किती महत्वाचे आहे?
● एक शास्वती होय
● परमेश्वराची सेवा करण्याचा अर्थ काय आहे-१
● दानधर्म करण्याची कृपा - ३
टिप्पण्या