प्रकाश व अंधार एकत्र अस्तित्वात राहू शकत नाही. एकाची उपस्थिती दुसऱ्याची अनुपस्थिती दर्शविते. वास्तवात, एका प्रसिद्ध ख्रिस्ती विद्वानाने अशा प्रकारे लिहिले आहे, "प्रकाश दया, आणि अंधार हा स्वतःहून निघून जाईल." तथापि, अंधार हा केवळ भौतिक प्रकाशाच्या अनुपस्थिती विषयी नाही; त्याचा अर्थ त्यापेक्षाही अधिक असू शकतो.
सामान्यतः, जेव्हा भौतिक अंधार असतो, कोणी काहीही पाहू शकत नाही, कोणाला कळत नाही की काय करावे, कोणाला सरळपणे काहीही ठाऊक नसते. मोठया दृष्टीकोनाच्या अर्थाने, अंधाराच्या स्थिती मध्ये संभ्रम, निराशा, विस्मरण, थकवा, नुकसान इत्यादी क्षणांचा समावेश असू शकतो. तरीही सुवार्ता ही आहे की, अंधाराचे प्रमाण हे काहीही असो, उपाय हा प्रकाश पुरविणे आहे.
बायबल मध्ये, आपण एक प्रकारचा प्रकाश पाहतो जो सर्व काही व्यापून आहे. हा तो आहे जो आपल्या जीवनात कोणत्याही क्षणी आपल्या आवाहनांवर विचार करतो. हा तो आहे जो आपल्याला दाखवितो की आपल्या जीवना विषयी काय करावे. तो प्रकाश हा देवाचे वचन आहे.
"तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो" (स्तोत्र ११९:१३०)
हे त्यामुळे आपल्याकडून अपेक्षित आहे की देवाच्या वचनास आपल्या अंत:करणात येऊ दयावे. हे मग अंधाराला दूर करेल, व आपली जीवने ही पूर्णपणे प्रकाशित होतील. संभ्रम हा संपून जाईल. निराशा ही पळून जाईल. स्पष्टता ही पुरविली जाईल. तथापि, हे केवळ आपोआप होत नाही कारण आपण आपले बायबल आपल्याबरोबर नेहमी घेऊन चालत आहोत; वचनास आपल्या जीवनात रुजू देण्याची आपल्याला गरज आहे- आपले आंतरिक मुख्य अस्तित्व. ह्यामध्ये वचनाची आपली समज सुद्धा सामावलेली आहे जेव्हा ते आपल्याकडे येते.
"तुझ्या वचनाच्या उलगड्याने प्रकाश प्राप्त होतो त्याने भोळयांना ज्ञान प्राप्त होते." (स्तोत्र ११९:१३०)
वचन समजण्यामध्ये, आपल्याला पूर्ण समज प्राप्त होते, आणि मग हे आपल्याला साहाय्य करते की वचन आपल्या जीवनास योग्यपणे लागू करावे. त्यामुळे, वचनास केवळ वरवर समजण्यापेक्षा त्याहीपलीकडे जाण्याचा आपण सतत शोध करावा. चला आपण परिश्रमपूर्वक देवाच्या वचनाचा अभ्यास करू व त्यावर मनन करू जोपर्यंत देवाच्या वचनाचा प्रकाश आपल्यावर प्रकाशत नाही.
यासाठी आपल्यावतीने समर्पणाची गरज लागते आणि ते शक्य केले जाते जेव्हा आपण पवित्र आत्म्याचे साहाय्य घेतो.
इफिस १:१७-१८ मध्ये आपण याचे अत्यंत महत्त्व पाहतो जेव्हा प्रेषित पौलाने प्रार्थना केली, "आपला प्रभु येशू ख्रिस्त ह्याचा देव जो वैभवशाली पिता, ह्याने तुम्हांला आपल्या ओळखीसंबंधीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा दयावा; म्हणजे त्यामुळे तुमचे अंत:चक्षु प्रकाशित होऊन त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती, 'पवित्र जनांमध्ये' त्याने दिलेल्या 'वतनाच्या' वैभवाची समृद्धि केवढी."
प्रार्थना
पित्या, तुझ्या वचनाच्या प्रवेशा साठी तुझा धन्यवाद जे प्रकाश व समज देते. असे होवो की तुझ्या वचनाचा प्रकाश हा माझ्या अंत:करणावर नेहमी प्रकाशित व्हावा. असे होवो की माझ्या समजेचे अंत:चक्षु प्रज्वलित व्हावेत आणि असे होवो की तुझे वचन माझ्या जीवनात फळ निर्माण करोत. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● शेवटच्या समयाचे गुपित: भविष्यात्मक पहारेकरी● भविष्यात्मक मध्यस्थी
● दिवस १३ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● पवित्रतेचे दुहेरी पैलू
● इतरांवर कृपा करा
● ज्ञानी लोकांकडून शिकावे
● महान पुरुष व स्त्रियांचे पतन का होते-२
टिप्पण्या