तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या आवया ऐकाल; घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा; कारण असे होणे अवश्य आहे; परंतु तेवढयात शेवट होत नाही. कारण'राष्ट्रांवर राष्ट्र व राज्यावर राज्य उठेल' आणि जागोजागी दुष्काळ व भूमिकंप होतील. (मत्तय २४: ६-७)
'शेवटच्या समयाची भविष्यात्मक चिन्हे' ह्या आपल्या शृंखलेमध्ये पुढे जात, आणखी एक चिन्ह ज्याविषयी येशूने म्हटले ते 'तुम्ही लढायांविषयी ऐकाल व लढायांच्या आवया ऐकाल'.
सध्याचे संशोधन रिपोर्ट हे सांगते की आज जगातील सर्वसंशोधनकारांच्यापन्नास टक्के हे काही प्रकारच्या शस्त्र आणिशस्त्रात्रसाठाच्या बाबतीत व्यस्त आहेत. ह्या शेवटच्या समयात, काहीआपत्तिमय युद्ध हे होतील जे आपण आतापर्यंत पाहिले आहे त्यावर ते मात करतील. तथापि, प्रभु येशूने त्याच्या शिष्यांना सांगितले की ह्या गोष्टींनी घाबरून जाऊ नका.
ह्या चिन्हांचा उद्देश काय आहे? जेव्हा आपण ढग पाहतो, ते आपल्याला याची चाहूल देते की आता नभोमंडळात पाऊस लवकरच येईल. ही चिन्हे प्रभूच्या येण्याकडे निर्देश करतात.
आता, कृपा करून हे समजून घ्या की अनेक चिन्हे घडत आहेत याचा अर्थ हा नाही की ख्रिस्त आजच येणार आहे, परंतु जितके अधिक चिन्हे आपण पाहतो, तेव्हा त्याच्या येण्याचा समय हा शक्यतो जवळ आहे.
शांति ही मनुष्याला देवाची देणगी आहे. एकदाकी ही शांति (देवाची मनुष्याला देणगी) हिरावून घेतली, मनुष्य हे युद्ध आणि विनाश कडे जातील. मनुष्ये आणि राष्ट्र यामधील शांति हे देवाची देणगी आहे. ही मनुष्यांमधील स्वाभाविक संबंधांची स्थिती नाही. आपले राष्ट्र आणि जगाच्या राष्ट्रांमध्येशांति साठी आपण प्रार्थना करण्याची सवय केली पाहिजे.
नुकतेच कोणी मला लिहिले हे विचारीत, "पास्टर, जर युद्ध हे होणेच आहे, तर आपण शांति साठी प्रार्थना कशी करू शकतो, आणि आपण देवाच्या इच्छे विरुद्ध तर जात नाही ना?"
पहिल्यांदा, प्रभूने आपल्याला प्रार्थना करावयाला शिकविले की त्याच्या पवित्र दुतांद्वारे जशी त्याची इच्छा स्वर्गात पूर्ण होते तशी ह्या पृथ्वीवर पूर्ण होवो (मत्तय ६:१०). पापी पुरुष आणि स्त्री द्वारे ह्या पृथ्वीवर जसे होते तसे नाही.
प्रेषित पौलाने सुद्धा शुभवर्तमानाच्या खातर राष्ट्रांसाठी आपल्याला प्रार्थना करावयाला सांगितले आहे. "तर सर्वात प्रथम हा बोध मी करितो की, सर्व माणसांसाठी विनंत्या, प्रार्थना, रदबदल्या व उपकारस्तुति करावी;
राजांकरिता व सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता करावी, ह्यासाठीकी, पूर्ण सुभक्तीने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्यक्रमण करावे. हे आपला तारणारा देव ह्याच्या दृष्टीने चांगले व स्वीकारावयास योग्य आहे. त्याची अशी इच्छा आहे की, सर्व माणसांचे तारण व्हावे व त्यांनी सत्याच्या परिपूर्ण ज्ञानप्रत पोहोचावे. (१ तीमथ्यी २:१-४)
राष्ट्रांच्याशांति आणि सुवार्ताप्रसार यामधील सामर्थ्यशाली जोड कडे लक्ष दया.
शेवटी, प्रभु येशूने स्वतः ही घोषणा देत म्हटले, "जेशांति करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील." (मत्तय ५:९)
तर मग शांति साठी प्रयत्न करा कीजे काही आपल्या सभोवती घडत आहे त्याच्यामध्ये ती कायम राहावी.
प्रार्थना
1. पित्या, तूं सर्व राष्ट्रांचा परमेश्वर आहे, सर्व गोष्टी तुला शक्य आहेत. आमचे राष्ट्र आणि त्याच्या सीमेवर शांति साठीआम्ही तुला प्रार्थना करीत आहो.
2. पित्या, मी कबूल करतो की मी आणि माझ्या कुटुंबातील सदस्य ह्या जिवंतांच्या भूमीत परमेश्वराच्या चांगुलपणाचा अनुभव घेऊ.
3. हे परमेश्वरा, जगाच्याराष्ट्रांमध्ये येथे शांति वसो. असे होवो की मला तुझी शांती प्राप्त होवो. येशूच्या नांवात, आमेन.
2. पित्या, मी कबूल करतो की मी आणि माझ्या कुटुंबातील सदस्य ह्या जिवंतांच्या भूमीत परमेश्वराच्या चांगुलपणाचा अनुभव घेऊ.
3. हे परमेश्वरा, जगाच्याराष्ट्रांमध्ये येथे शांति वसो. असे होवो की मला तुझी शांती प्राप्त होवो. येशूच्या नांवात, आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● प्रभु येशू ख्रिस्ताचे अनुकरण कसे करावे● ईश्वरीय शिस्तबद्धतेचे स्वरूप-१
● छाटण्याचा समय
● गुणधर्म ज्याने दावीद ला राजासमोर उभे राहण्यास समर्थ केले
● तुमचा कमकुवतपणा परमेश्वराला दया
● छाटण्याचा समय– २
● किंमत मोजणे
टिप्पण्या