आता योसेफाला स्वप्न पडले, आणि त्याने ते त्याच्या भावांना सांगितले, आणि त्यांनी मग त्याचा अधिकच द्वेष केला. (उत्पत्ति ३७: ५)
एक लहान लेकरू म्हणून, "जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तुम्हांला काय व्हावे असे वाटते?" उत्तर हे शक्यतो हे असू शकते, 'मला एक डॉक्टर किंवा विमानचालक व्हायला पाहिजे". आपल्यापैकी प्रत्येक जण त्यांच्या मनात देवाने दिलेले स्वप्न घेऊन असतात. कदाचित तुम्ही तुमच्या स्वतःला एक प्रचारक असे पाहता, एकव्यक्ति ज्याकडे एक यशस्वी व्यवसाय आहे. स्वप्न काहीही असो, ते धूसर होऊ देऊ नका, ते नष्ट होऊ देऊ नका.
जुन्या करारात, योसेफाला दोन स्वप्ने पडली आणि त्याचा अर्थ एकच होता. पहिल्या स्वप्नात, शेतात गव्हाच्या पेंढ्या होत्या –प्रत्येक हे याकोबाच्या पुत्रांना प्रतिनिधित करीत होते. पेंढी जी योसेफाला सादर करीत होती, " उभी राहिली" आणि इतर पेंढ्या त्याच्याभोवती उभ्या राहिल्या आणि त्यांनी तिला नमन केले" (उत्पत्ति ३७: ७)
दुसऱ्या स्वप्नात योसेफाने पाहिले सूर्य, चंद्र आणि ११ तारे त्यास नमन करीत आहेत (उत्पत्ति ३७:९). ही स्वप्ने अर्थहीन नव्हती. ते योसेफाच्या भविष्याचे भविष्यात्मक चित्र होते.
देवाने-दिलेले स्वप्न ही एक अद्भुत गोष्ट आहे.
तुमच्यामध्ये देवाने-दिलेले स्वप्न हे तुम्हाला तुमच्या भविष्याबद्दल आशा देऊ शकते आणि जेव्हा सर्व गोष्टी ह्या तुमच्या विरोधात आहेत तेव्हा ते तुम्हाला प्रोत्साहन देते की प्रयत्न हा करीत राहावा. माझा विश्वास आहे हेच काय ज्याने योसेफाला पुढे जाण्यास प्रेरणा दिली जरी जेव्हा त्याला खाड्यात टाकण्यात आले आणि नंतर त्याच्या स्वतःच्या भावांद्वारे गुलाम म्हणून विकण्यात आले. (उत्पत्ति३७: २४, २८)
इतर कोणीही अशा अपमानात आणि अस्वीकारात खचून गेला असता परंतु योसेफ नाही. जरी जेव्हा त्याच्यावर खोटा आरोप ठेवण्यात आला, माझा विश्वास आहे कीत्याच्यामध्ये देवाने-दिलेल्या स्वप्नाने त्यास पुढे जाण्यास प्रेरणा दिली. योसेफ मिसर मध्ये एक महान व्यक्ति झाला आणि शेवटी अक्षरशः तो त्यांच्यावर अधिकारी झाला ज्यांनी त्याचे खच्चीकरण केले होते. (उत्पत्ति ४५)
जास्तीत जस, अर्थात आपल्या मागण्या किंवा कल्पना ह्यांपलीकडे आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे अधिक्याने कार्य करावयास जो समर्थ आहे त्याला मंडळ्यांमध्ये व ख्रिस्त येशूच्या ठायी पिढ्यानपिढ्या युगानुयुग गौरव असो. आमेन. (इफिस ३:२०)
परमेश्वर तुमचे स्वप्न हे पूर्ण करू शकतो किंवा पूर्ण करेल कारण हा तोच आहे ज्याने ते स्वप्न तुमच्या आत ठेवले आहे.
त्याच्याबरोबर घनिष्ठ संबंध ठेवा आणि त्यास तुमचे स्वप्न सांगा-ते खात्रीने पूर्ण होईल.
प्रार्थना
पित्या, मी माझे स्वप्न तुझ्याकडे समर्पित करतो. (आता वेळ घ्या की तुमच्या इच्छा त्यास सांगाव्या) मी जे मागेन किंवा कल्पना करेन त्यापेक्षा अधिक करण्यास तूं समर्थ आहे. तुझ्या आत्म्याने मला समर्थ कर आणि त्या गोष्टी पूर्ण कर. येशूच्या नांवात. आमेन.
Join our WhatsApp Channel
Most Read
● वर्षाव● इतरांबरोबर शांतीमध्ये राहा
● छाटण्याचा समय
● असामान्य आत्मे
● देवाचे ७ आत्मे: ज्ञानाचा आत्मा
● दिवस ०६ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
● देवाच्या चेतावणी कडे दुर्लक्ष करू नका
टिप्पण्या