डेली मन्ना
दिवस १५ : ४० दिवस उपास व प्रार्थनेचे
Friday, 6th of December 2024
29
20
281
Categories :
उपास व प्रार्थना
अंधाराची कामे पुन्हा करणे व उलट करणे
"पाहा, उपटण्यास व विध्वंस करण्यास, नासधूस करण्यास व पाडून टाकण्यास, बांधण्यास व लागवड करण्यास मी तुला आज राष्ट्रांवर व राज्यांवर नेमिले आहे." (यिर्मया १:१०)
अंधाराच्या कृत्यांना विरोध करणे व नष्ट करणे ही विश्वासणारे म्हणून आपली जबाबदारी आहे. जे काही तुम्ही प्रतिकार करण्यास अपयशी ठराल ते कायम राहील. बहुतेक विश्वासणारे त्यांच्या जीवनात सैतानाचा प्रतिकार करण्यासाठी देवाची वाट पाहत आहेत. ते दैवी सिद्धांतापासून अनभिज्ञ आहेत जे आपल्यावर "सैतानाचा प्रतिकार" करण्याची जबाबदारी देते.
अंधाराच्या शक्तींची कार्ये वास्तविक आहेत; आपण त्यांना आपल्या समुदायात, बातम्यांमध्ये आणि देशात पाहू शकतो. बरेच जण व्याकरणाने ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात, परंतु आध्यात्मिक व्यक्तीला ठाऊक असते की त्या गोष्टी आध्यात्मिकरित्या तयार केलेल्या आहेत.
विश्वासणारे म्हणून, ख्रिस्त पृथ्वीवर असताना त्याने सैतानाची कामे कशी नष्ट केली हे शिकून त्याचे अनुकरण करणे हे आपले ध्येय आहे.
"नासोरी येशूला देवाने पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला; तो सत्कर्मे करीत व सैतानाच्या सत्तेखाली असलेल्या सर्वांना बरे करीत फिरला; कारण देव त्याच्याबरोबर होता." (प्रेषित. १०:३८)
शत्रूची शस्त्रे कोणती आहेत?
शत्रूच्या सर्व शस्त्रांची यादी मी देऊ शकत नाही; उद्देश हा तुम्हाला काही गोष्टी सांगाव्यात ज्या तुमचे डोळे दुष्टाच्या कृत्यांसाठी उघडतील.
ही थोडक्यात यादी तुम्हाला पवित्रशास्त्र संदर्भ जे त्याच्यासोबत जोडलेले आहेत त्याने आध्यात्मिक समज पुरवेल.
१. आजार व रोग
येशू शब्बाथ दिवशी एका सभास्थानात शिकवीत होता. तेव्हा पाहा, अठरा वर्षे विकाराचा आत्मा लागलेली एक स्त्री तेथे होती; ती कुबडी असल्यामुळे तिला नीट उभे राहता येत नव्हते. येशूने तिला पाहून बोलावले व म्हटले, बाई, तूं आपल्या विकारापासून मुक्त झाली आहेस. त्याने तिच्यावर हात ठेवताच ती सरळ झाली व देवाचा महिमा वर्णू लागली.
ही तर अब्राहामाची कन्या आहे; पाहा, हिला सैतानाने अठरा वर्षे बांधून ठेवले होते, शब्बाथ दिवशी हिला ह्या बंधनापासून सोडविणे योग्य नव्हते काय? (लूक १३:१०-१३, १६)
हिला सैतानाने १८ वर्षे बांधून ठेवले होते, जर ख्रिस्त आला नसता, तर ती त्याच आजारात मरण पावली असती. (लूक १३: १६-१७)
२. आरोप
सैतान लोकांना पाप करावयास लावतो; आणि तरीही देवासमोर त्यांच्यावर आरोप ठेवतो.
"१ तेव्हा मुख्य याजक यहोशवा हा परमेश्वराच्या दिव्यदूतासमोर उभा आहे व त्याचा विरोध करण्यासाठी सैतान त्याच्या उजवीकडे उभा आहे; असे त्याने मला दाखविले. २ मग परमेश्वर सैतानास म्हणाला, अरे सैताना, परमेश्वर तुला धमकी देवो; यरुशलेम आपलीशी करणारा परमेश्वर तुला धमकी देवो; (जखऱ्या ३:१-२)
तेव्हा मी स्वर्गात मोठी वाणी ऐकली; ती म्हणाली: "आतां आमच्या देवाने सिद्ध केलेले तारण, त्याचे सामर्थ्य व त्याचे राज्य आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार ही प्रगट झाली आहेत; कारण आमच्या बंधूंना दोष देणारा आमच्या देवासमोर रात्रंदिवस त्यांच्यावर दोषारोप करणारा, खाली टाकण्यात आला आहे." (प्रकटीकरण १२:१०)
सैतानाच्या आरोपाचा सामना करताना, आपण देवाच्या वचनाच्या सत्यात आशा आणि शक्ती शोधू शकतो. प्रभु येशूने स्वतः सैतानाकडून आरोपाचा सामना केला, आणि त्याने पवित्र शास्त्रातून संदर्भ देत आणि देवाचा पुत्र म्हणून त्याच्या ओळखीवर स्थिर राहत उत्तर दिले.
३. चालाकी, भीति, शंका आणि खोटे बोलणे
सैतानाचा हल्ला हा आजार व रोगापुरता मर्यादित नाही. जर तुम्ही सत्याविषयी अज्ञानी असाल, तर सैतान तुमच्यासाठी खोटेपणा विकेल. आजार, रोग, मृत्यु, दारिद्र्य आणि सैतानाचे इतर सर्व हल्ले यासाठी चालाकी व खोटेपणा हे द्वार उघडणारे आहेत.
तेव्हा परीक्षक त्याच्याजवळ येऊन म्हणाला, "तूं देवाचा पुत्र आहेस तर ह्या धोंडयाच्या भाकरी व्हाव्या अशी आज्ञा कर." (मत्तय ४:३)
सैतान हा फसवणुकीचा स्वामी आहे आणि तो सत्याला मुरडण्याचा प्रयत्न करील आणि आपल्या मनात संशयाचे बीज पेरेल. देवाचे वचनाच्या सत्याचे नियमित वाचन आणि मनन करून आपण याचा प्रतिकार करू शकतो, जो आपल्या विश्वासाचा खात्रीशीर व भक्कम पाया आहे.
४. दुष्ट बाण
दुष्ट बाण हे आध्यात्मिक बाण आहेत जे लोकांवर मारले जातात की एकतर त्यांना मारावे किंवा त्यांच्या जीवनात चुकीच्या गोष्टींचे कार्य करावे.
"कारण पाहा, दुर्जन धनुष्य वाकवीत आहेत; सरळ मनाच्यांना अंधारात मारावयासाठी दोरीला तीर लावीत आहेत." (स्तोत्रसंहिता ११:२)
"त्यांनी आपली जीभ तरवारीसारखी पाजळली आहे; सात्विकाला एकांतात मारावे म्हणून त्यांनी तीरासारखा आपल्या कटू शब्दांचा नेम धरिला आहे." (स्तोत्रसंहिता ६४:३)
हे दुष्ट बाण अनेक रूपें घेऊ शकतात; उदाहरणार्थ, कटू शब्द. एक मार्ग की दुष्ट बाणांना विरोध करावा म्हणजे देवाची शस्त्रसामग्री धारण करावी हे आहे, जसे इफिस ६:१०-१७ मध्ये वर्णन केलेले आहे.
५. आंधळेपणा
जेव्हा तुमची आध्यात्मिक समज उघडते, तुम्ही सैतानाच्या शक्तीमधून देवाकडे स्वतंत्र होता. हा एक शक्तिशाली आणि परिवर्तनीय अनुभव होऊ शकतो.
"मी तुला त्यांच्याकडे पाठवितो, ह्यासाठी की, त्यांनी अंधारातून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे, म्हणून तूं त्यांचे डोळे उघडावे, आणि त्यांना पापाची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे." (प्रेषित २६:१८)
"त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने ह्या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत, अशा हेतूने की, देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये." (२ करिंथ ४:४)
६. मृत्यु, निराशा व वांझपणा
मृत्यूचा आत्मा विविध मार्गांनी कार्य करू शकतो, कधीकधी लोक घसरतात आणि मरू शकतात आणि इतर वेळी ते आत्महत्या, अपघात, नैसर्गिक आपत्ती, युद्ध वगैरे द्वारे देखील करू शकतो. सैतान हा हिरावून घेणे, मारणे, आणि विनाशास कारणीभूत आहे, आणि हे तुम्हांला अंधाराची कार्ये ओळखण्यास साहाय्य करेल. (योहान १०:१०)
७. अपयश आणि गरिबी
गरिबी हे सैतानाच्या हातात मुख्य साधन आहे. तो त्याचा उपयोग करतो की लोकांच्या नाशिबांना मर्यादित करावे. तुमच्याकडे पैसा असेल तर देवाच्या राज्यासाठी अनेक चांगल्या गोष्टी कराल. गरिबीने अनेकांना वेश्याव्यवसाय, लुटमार आणि निराशेमध्ये नेले आहे. ही देवाची इच्छा आहे की तुमच्या सर्व गरजांची पूर्तता व्हावी.
"माझा देव आपल्या संपत्यनुरूप तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्या द्वारे पुरवील." (फिलिप्पै. ४:१९)
८. पाप
पाप हे देवाच्या नियमशास्त्राचे उल्लंघन आहे. जर सैतान तुम्हाला देवाची आज्ञा मोडायला लावू शकत असेल, तर तो बिनधास्तपणे कार्य करू शकतो. देवाची आज्ञा तुम्ही मोडणे हे सैतानासाठी दार उघडणारे आहे.
"जो कोणी पाप करितो तो स्वैराचार करितो; कारण पाप स्वैराचार आहे." (१ योहान ३:४)
अंधाराची कृत्ये आपण कशी नष्ट करावीत?
- विश्वासाच्या शक्तीस कार्यरत करा
जेव्हा तुम्ही विश्वासात कार्य करीत आहात तेव्हा तेथे अशक्यता नाही. दुष्टांच्या सर्व जळत्या बाणांना विझविण्यासाठी विश्वासाची गरज आहे. याची पर्वा नाही की सैतानाने काय केलेले आहे, जेव्हा तुम्हांला विश्वास आहे तेव्हा ते उलट केले जाऊ शकते. लाजराला आजाराने मारले (सैतानाचे कार्य), परंतु ख्रिस्त आला आणि वाईटाला उलटे केले. मनुष्यांसाठी हे अशक्य असे दिसते, परंतु विश्वासू मनुष्याला, सर्व काही शक्य आहे. (मार्क ९:२३)
- सत्याला कार्यरत करा
आजार, रोग, चालाकी, आंधळेपणा आणि अंधाराच्या इतर अनेक कार्यांच्या परिणामास नष्ट करण्यास विश्वासाची गरज लागते. सत्य हे शस्त्र आहे; आणि सत्याविरुद्ध काहीही करू शकत नाही. तुम्ही सत्यासाठी आग्रही असावे अशी माझी इच्छा आहे; ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला वैयक्तिकपणे शोधायची आहे. सत्य जे तुम्हाला ठाऊक आहे ते तुम्ही आनंद घेणाऱ्या विजयास निश्चित करील. (योहान ८:३२, ३६)
- प्रीतीच्या शक्तीला कार्यरत करा
देव प्रीति आहे; आणि आपण जेव्हा देवाच्या प्रीतीचा उपयोग करतो, तेव्हा हा एक सरळ मार्ग आहे की एखादया परिस्थितीवर देवाच्या सामर्थ्यास मोकळे करावे. जितके अधिक तुम्ही प्रितीमध्ये चालाल, तितकेच अधिक देवाचे सामर्थ्य संघर्षमय परिस्थितीवर उपाय करते. तुम्ही वाईटावर वाईटाने विजय मिळवू शकत नाही; तुम्ही त्यावर केवळ चांगल्या गोष्टीने विजय मिळवू शकता. येथे प्रीतीची शक्तिशाली बाजू आहे, प्रीति ही कमकुवत नाही, परंतु अनेक जण अजूनही प्रीतीच्या शक्तिशाली बाजूमध्ये जाऊ शकलेले नाही.
"वाईटाने जिंकला जाऊ नको, तर बऱ्याने वाईटाला जिंक." (रोम. १२:२१)
"जो प्रीति करीत नाही तो देवाला ओळखीत नाही; कारण देव प्रीति आहे." (१ योहान ४:८)
- अभिषेक होण्यासाठी प्रयत्न करा
अभिषेकाला नाश करण्यासाठी काहीही कठीण नाही (यशया १०:२७).
अभिषेक हा आत्मा व देवाचे वचन आहे. विश्वासणारे म्हणून, तुम्हाला अगोदरच तुमच्यात अभिषेक आहे; तुम्हांला केवळ आदेश द्यायचा आणि योग्य कबुली द्यावयाची आणि तसेच त्याबरोबर प्रार्थना करण्याची गरज आहे. यशया १०:२७
- ख्रिस्तामधील तुमच्या अधिकाराचा उपयोग करा
आपल्या अधिकाराचा उपयोग हा एक कायदेशीर मार्ग आहे ज्याद्वारे आपण शत्रूशी सामना करू शकतो. आपल्याकडे ख्रिस्ताचा अधिकार आहे की जे काही शत्रूने केले आहे त्यास उलटे करावे. बांधण्यामध्ये आपल्या अधिकाराचा उपयोग करण्यात आपण जर चुकलो, तर स्वर्गात काहीही केले जाणार नाही. (मत्तय १५:१३)
येशू ख्रिस्ताचा येण्याचा उद्देश हा अंधकाराच्या कृत्यांस पूर्ववत करण्याचा होता, आणि त्याने विश्वासणाऱ्यांना ते कार्य करण्यासाठी सामर्थ्य दिले. अंधाराची कृत्ये उलट आणि नष्ट करण्यास तुम्ही तयार आहात काय? (१ योहान ३:८). ओरडणे आणि संघर्ष करणे थांबवा. ही वेळ आहे की तुमच्या अधिकारास तुमच्या शत्रूवर वापरावे. मी येशूच्या नावाने पाहत आहे की तुमच्या जीवनात गोष्टी ह्या चांगल्यासाठी बदलत आहेत.
Bible Reading Plan : John 6 - 9
प्रार्थना
१. मी येशूच्या नावाने माझ्या आणि माझ्या कुटुंबातील अपयश, आजारपण, आणि संकटांना प्रोत्साहन देणारी कोणतीही वाईट वेदी खाली खेचतो.
२. मी येशूच्या नावाने प्रकट होण्याची वाट पाहत माझ्या शरीरातील कोणताही गुप्त आजार आणि रोग उपटून टाकतो.
३. माझ्या घराभोवती आणि माझ्या आयुष्याभोवती फिरणारा कोणताही दुष्ट अनोळखी व्यक्ति येशूच्या नावाने त्यांच्या लपण्याच्या ठिकाणापासून निघून जावो.
४. शत्रूने माझ्याविरुद्ध केलेले कोणतेही वाईट येशूच्या नावाने मी त्यास उलट करतो.
५. प्रत्येक चांगली गोष्ट जी माझी आहे, ती आता येशूच्या नावाने मजकडे यावी.
६. सैतानाने माझ्याविरुद्ध जे काही केले आहे ते मी येशूच्या नावाने नष्ट करतो.
७. माझ्या व माझ्या कुटुंबाच्या विरोधात प्रत्येक दुष्ट बोलणे, न्याय करणे यास येशूच्या नावाने मी गप्प करीत आहे.
८. माझे जीवन व माझ्या कुटुंबाच्या विरोधातील अपराध व आरोपाच्या प्रत्येक वाणीला येशूच्या नावाने मी गप्प करीत आहे.
९. मी धोरणात्मक ठिकाणी देवाच्या दूतांना मोकळे करतो, आणि मी आदेश देत आहे, माझा आशीर्वाद, कुटुंब आणि प्रगतीच्या विरोधातील प्रत्येक सैतानी वाद घालविण्यास येशूच्या नावाने सुरु करावे.
१०. मी माझ्या जीवनाविरुद्ध कोणत्याही सैतानी योजना उलथून टाकतो; येशूच्या नावाने माझ्या भल्यासाठी सर्व काही एकत्र काम करण्यास सुरु करावे.
११. माझी नशीब वाया जावे यासाठी जे काही योजिले आहे त्यास येशूच्या नावाने मी रद्द करीत आहे.
१२. माझ्या व माझ्या कुटुंबाच्या सदस्यांच्या जीवनाविरुद्ध कोणतेही वाईट प्रगट होण्याची वाट पाहत आहे ते येशूच्या नावाने रद्द व्हावे.
१३. माझे जीवन व प्रतिष्ठेच्या विरोधातील कोणतेही वाईट लिखाण, कोणताही न्याय, आणि आरोप येशूच्या नावाने मी पुसून टाकतो.
१४. येशूच्या रक्ताने, माझ्या प्रगतीच्या विरोधातील प्रत्येक दुष्ट व्यक्ति आणि तत्वे जी नियुक्त केली आहेत त्यावर मी विजय मिळवितो.
१५. माझी प्रगती व गौरवावर परिणाम करणाऱ्या प्राचीन बालेकिल्ल्यांना आणि वाईट करारांना मी येशूच्या नावाने खेचून काढत आहे.
१६. येशूच्या रक्ताने, येशूच्या नावाने मी वाईट, संकट, छळ आणि विनाशापासून मुक्त आहे.
१७. येशूच्या नावाने मी माझे बंदिस्त केलेले लाभ आणि आशीर्वाद यांस मोकळे करतो.
१८. पित्या, येशूच्या नावाने समय आणि हंगाम माझ्या चांगल्यासाठी बदल.
१९. पित्या, येशूच्या नावाने माझ्या आध्यात्मिक मनुष्यास समर्थ कर.
२०. पित्या, मला व या उपास कार्यक्रमातील प्रत्येकांस ज्ञान व प्रकटीकरणाचा तुझा आत्मा दे म्हणजे आम्ही येशूच्या नावाने तुला अधिक ओळखावे.

Join our WhatsApp Channel
Most Read
● देवाच्या प्रकारची प्रीति● संदेष्टा अलीशा चे जीवन-आध्यात्मिक-III
● येशूने अंजीराच्या झाडाला शाप का दिला
● आत्म्याची नावे आणि शीर्षक: देवाचा आत्मा
● चुकीचे विचार
● स्वतःची-फसवणूक म्हणजे काय?-१
● शांति तुम्हाला कसे बदलते ते शिका
टिप्पण्या