डेली मन्ना
दिवस २६:४० दिवसांचा उपवास आणि प्रार्थना
Tuesday, 17th of December 2024
29
28
188
Categories :
उपास व प्रार्थना
मी सुवार्ता ऐकेन
“तेव्हा देवदूत त्यांना म्हणाला, ‘भिऊ नका; कारण पाहा, जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हांला सांगतो.” (लूक. २:१०)
येशूचा जन्म हा मानवजातीसाठी सुवार्ता आहे. तारण, देवाचे राज्य, देवाचे गौरव, आणि देवाच्या आशीर्वादाच्या आगमनाला ते सूचित करते.
प्रत्येक विश्वासणाऱ्याला सुवार्तेच्या संदेशाने देखील आज्ञा दिली आहे, जे देवाचे राज्य आणि ख्रिस्ताविषयी सुवार्तेची चांगली बातमी आहे. सुवार्ता ही तारण जे आपल्याला देते त्याचा पूर्णपणे भाग आहे, कारण तारण हीच सुवार्ता आहे.
आपल्या पायाभूत वचनात, लूक. अध्याय २ मध्ये, आपण पाहतो की देवदूतांनी मेंढपाळांना सुवार्ता आणली. देवदूताने अलीशिबाला देखील सुवार्ता आणली (लूक. १:२६-४७). संपूर्ण पवित्र शास्त्रात, देवदूत लोकांना देखील सुवार्ता आणताना आपण पाहतो. शमशोनच्या जन्मासंबंधी, देवदूताने शमशोनाच्या आईला सुवार्ता आणली. (शास्ते १३:३)
आपल्यासाठी ही देवाची इच्छा आहे की आपण सुवार्ता ऐकावी. यशया ४३, वचन १९ मध्ये, देव म्हणतो, “पाहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे.” देवाची प्रत्येक कृती सुवार्तेमध्ये बदलते. यावर्षी, आणि या हंगामात तुमच्या जीवनात एक नवीन गोष्ट करण्याची देवाची इच्छा आहे. तुम्हांला त्यामध्ये विश्वासाद्वारे प्रवेश करायचा आहे म्हणजे देवाजवळ तुमच्यासाठी असलेले आशीर्वाद तुम्ही प्राप्त करू शकाल.
नीतिसूत्रे १५:३० स्पष्ट करते, “नेत्रांचे तेज अंत:करणाला उल्लास देते; चांगले वर्तमान हाडे पुष्ट करते.”
सुवार्तेचे परिणाम काय आहेत?
१. ते तुमच्या विश्वासाला प्रबळ करू शकते.
सुवार्ता तुमच्या विश्वासाला प्रबळ करते. जेव्हाजेव्हा तुम्ही सुवार्ता ऐकता, देवावरील आपला विश्वास प्रबळ होतो, तो समर्थ होतो, तो देवासाठी प्रेरित देखील होतो. म्हणूनच चर्चमध्ये, साक्षी देण्यासाठी लोकांना संधी आहेत. साक्षी ह्या तुमच्या विश्वासाला बळकट करण्यासाठी आहेत.
२. ते आनंद आणि उत्सव आणते.
जेव्हा तुम्ही सुवार्ता ऐकता, तेव्हा ते आनंद आणते. वाईट बातमी दु:ख, वेदना, रडणे आणि खेद आणते, पण सुवार्ता आनंद आणि उत्सव आणते.
३. ते तुमच्या आत्म्याला पुनरुज्जीवित करते.
सुवार्तेकडे तुमच्या आत्म्याला पुनरुज्जीवित करण्याचा मार्ग आहे, जे तुम्हांला आनंदी आणि हर्ष करण्यास कारणीभूत होते. तुम्ही जागृत होता जेव्हा तुम्ही सुवार्ता ऐकता. भग्न आत्मा वाईट बातमीपासून होतो. वाईट बातमी मानवी प्रेरणेस तडा देते आणि आशेला नष्ट करते. पण सुवार्ता तुमच्या आत्म्याला बळकट करते आणि देवावरील तुमच्या आशेला नवीन करते.
४. ते तुम्हांला देवामध्ये धाडसी आणि आत्मविश्वासी बनवते.
जर तुम्ही प्रत्येक वेळी सुवार्ता ऐकत राहता, तर तुम्ही अधिक धाडसी आणि आत्मविश्वासी व्हाल. परंतु तुम्ही जेव्हा वारंवार वाईट बातमी ऐकता, तेव्हा काय घडत आहे हे तुम्ही जाणण्यापूर्वी, तुम्ही देवाच्या शक्तीविषयी शंका कराल. आत्मविश्वासी राहण्यासाठी, तुम्ही हेतुपुरस्सर चांगली बातमी ऐकली पाहिजे.
तुम्ही याची खात्री केली पाहिजे की वाईट बातमीला तुमच्या जीवनावर परिणाम नाही करू दिला पाहिजे. म्हणून सुवार्ता ऐकण्यासाठी आणि सुवार्तेची अपेक्षा करण्यासाठी आपल्या स्वतःला एका योग्य स्थानी नेण्याची आपल्याकडे जबाबदारी आहे.
५. ते तुमच्या अंत:करणाला आशीर्वादित करते.
जेव्हा आपण वाईट बातमी ऐकतो, आपले अंत:करण अशक्त आणि ओझ्याने दबून जाते. पण सुवार्ता तुम्हांला आशीर्वादित करते, तुमच्या अंत:करणाला आशीर्वादित करते.
६. सुवार्ता आशीर्वाद आणि लाभ आणते.
जर तुम्ही कार्यालयात आहात आणि जर तुम्ही सुवार्ता ऐकता की तुमची पदोन्नती झाली आहे, तेव्हा ती पदोन्नती हा आशीर्वाद आहे आणि तो लाभासह येतो. कारण आता तुम्हांला काही विशेषाधिकार प्राप्त होतो जो तुम्हांला तुमच्या पूर्वीच्या पदावर असताना नव्हता.
म्हणजे, सुवार्ता आपल्याला आशीर्वाद देते. जेव्हा आपण सुवार्ता ऐकतो ते आपल्यासाठी आशीर्वाद आहे. जेव्हा तुम्ही म्हणता, “मी सुवार्ता ऐकेन”, तेव्हा तुमच्या जीवनात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे आशीर्वाद येण्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात.
७. ते जगावर आपल्या विजयाला प्रकट करते.
म्हणून, या नवीन वर्षी, देव तुम्हांला सुवार्ता देईल. जेथेकोठे तुम्ही वळाल तेथे तुम्ही सुवार्ता ऐकाल.
जेव्हा तुम्ही बाहेर जाल, तेव्हा तुम्ही सुवार्ता ऐकाल. जेव्हा तुम्ही परत याल, तेव्हा तुम्ही सुवार्ता ऐकाल. जेथेकोठे तुम्ही वळाल तेथे येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्ही सुवार्ता ऐकाल.
नीतिसूत्रे २५:२५ म्हणते, “तान्हेल्या जीवाला जसे गार पाणी तसे दूर देशाहून आलेले शुभवर्तमान होय.” सुवार्ता तुमच्या आयुष्याला ताजेतवाने करते, तुमच्या जीवाला ताजेतवाने करते. आनंदी, उत्साही आणि उत्पादनक्षम राहण्यासाठी या कशाची तरी तुम्हांला आवश्यकता आहे.
Bible Reading Plan : 1 Corinthians 2-9
प्रार्थना
तुमच्या मनापासून येईपर्यंत प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणत राहा. केवळ तेव्हाच पुढील प्रार्थना अस्त्राकडे वळा. घाई करू नका.
१. मी जेव्हा बाहेर जातो आणि परत येतो तेव्हा येशू ख्रिस्ताच्या नावाने मी सुवार्ता ऐकेन. प्रत्येक ठिकाणी जेथे मी वळेन तेथे येशूच्या नावाने मी सुवार्ता ऐकेन.
२. देवाच्या दूतांनो, जा आणि माझ्यासाठी सुवार्ता आणा. येशूच्या नावाने माझ्यासाठी साक्षीला उत्तेजित करा.
३. कोणतीही शक्ती जी माझ्यासाठी वाईट बातमीला बनवत आहे, येशू ख्रिस्ताच्या नावाने मी तिला रद्द करतो. अंधाराचा कोणताही एजंट जो माझ्या आनंदाला नष्ट करू पाहतो आणि मला रडण्यास कारणीभूत होतो, मी तुझ्या योजनांना येशूच्या नावाने उलथून टाकतो.
४. या महिन्यात, मी पदोन्नतीची सुवार्ता ऐकेन. साक्षी आणि आशीर्वादांची सुवार्ता येशूच्या नावाने मी ऐकेन.
५. मी पृथ्वीच्या चारी कोपऱ्यांना आदेश देतो, देवाच्या वाऱ्याने त्यांना उडवून टाकावे, आणि येशूच्या नावाने सुवार्ता माझ्याकडे यावी.
६. हे परमेश्वरा, तुझ्या पवित्र स्थानातून मला साहाय्य पाठव. या वर्षी प्रत्येक मृत आशा आणि आकांशा येशूच्या नावाने पुनर्जीवित व्हाव्यात.
७. जेथे माझा नकार केला गेला, तेथे येशूच्या नावाने माझ्याशी संपर्क केला जाईल आणि स्वीकारले जाईल. माझ्या जीवनातून नकाराचा प्रत्येक आत्मा येशूच्या नावाने मी मोडून काढतो.
८. पित्या, सर्वकाही मिळून माझ्या कल्याणासाठी कारणीभूत होऊ दे. मग हवामान, हंगाम, लोक, पृथ्वीवरील घटक काहीही असो, ते सर्वकाही मिळून माझ्या कल्याणासाठी येशूच्या नावाने कार्य करू दे.
९. पित्या, माझ्यासाठी बोलणारे निर्माण कर-निर्णयाच्या ठिकाणी मदतीचा आवाज, शिफारसीचा आवाज, समर्थनाचा आवाज, आणि माझ्या जीवनासाठी संसाधने जोडणारा आवाज. पित्या, या वर्षी येशूच्या नावाने ते आवाज माझ्यासाठी निर्माण कर.
१०. या वर्षी माझ्या जीवनात नकार, निराशा, विलंब, त्रास, आणि संकटांना मी येशूच्या नावाने प्रतिबंधित करतो.
Join our WhatsApp Channel
Most Read
● तुमचा संघर्ष तुमची ओळख होऊ देऊ नका -२● दैवी व्यवस्था-१
● भविष्यवाणीचा आत्मा
● तुमचा हेतू काय आहे?
● विश्वसनीय साक्षी
● जीवनाच्या वादळांमध्ये विश्वास ठेवणे
● स्तुति वृद्धि करते
टिप्पण्या