english हिंदी తెలుగు മലയാളം தமிழ் ಕನ್ನಡ Contact us आमच्याशी संपर्क साधा स्पॉटिफाय वर ऐका स्पॉटिफाय वर ऐका Download on the App StoreIOS अँप डाउनलोड करा Get it on Google Play अँड्रॉइड अँप डाउनलोड करा
 
लॉग इन
ऑनलाइन देणगी
लॉग इन
  • होम
  • कार्यक्रम
  • थेट प्रसारण
  • टी.वी.
  • नोहाट्यूब
  • स्तुती
  • बातमी
  • डेली मन्ना
  • प्रार्थना
  • अंगीकार
  • स्वप्ने
  • ई पुस्तके
  • भाष्य
  • श्रद्धांजली
  • ओएसिस
  1. होम
  2. बायबल भाष्य
  3. अध्याय १०५
बायबल भाष्य

अध्याय १०५

Book / 18 / 2511 chapter - 105
289
राष्ट्रांना तो करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगा
तो ज्या अद्भुत गोष्टी करतो त्याबद्दल सांगा. (स्तोत्रसंहिता १०५:-२)

आजच्या जगात, माहिती पसरविण्यासाठी आणि इतरांबरोबर जुळण्यासाठी सामाजिक माध्यम हे एक सामर्थ्यशाली साधन झाले आहे. आपल्या सामाजिक माध्यम स्तरावर ज्या प्रत्येक वेळी आपण प्रभूच्या कार्याविषयी काही माहिती सांगतो, तेव्हा आपण या आदेशाचे पालन करीत असतो आणि आपल्या सभोवतालच्या जगावर प्रभाव टाकत असतो. अशी माहिती पसंत करून, त्यावर टिप्पणी करून, आणि पुढे पाठविण्याद्वारे, आपण केवळ आपले साहाय्य दाखवीत नाही, परंतु इतरांसाठी देखील सोपे करीत आहोत की सुवार्ता संदेश प्राप्त करावा.

त्या प्रभावाची कल्पना करा की जे आपण करू शकतो जर आपण प्रतिदिवशी या आदेशाला गंभीरपणे घेतले. प्रभूच्या कार्याविषयी संबंधित माहिती सातत्याने लोकांना सांगत राहण्याने, आपण असंख्य लोकांपर्यंत पोहचू शकतो नाहीतर त्यांना सुवार्ता ऐकण्याची संधी प्राप्त होऊ शकणार नाही. सामाजिक माध्यमावर आपल्या कृतीद्वारे आपल्याकडे सामर्थ्य आहे की या जगामध्ये खरा बदल आणावा. चला आपण ते करू या!!

वचन देखील तुमची साक्ष सांगण्याविषयीच्या महत्वावर जोर देते.

तुम्ही लोक परमेश्वराला शोधत आला, सुखी व्हा. (स्तोत्रसंहिता १०५:३)
बऱ्याचवेळा, भारावून टाकणाऱ्या आणि निराशाजनक वाटणाऱ्या जगात, निराशा किंवा चिंतेच्या अवस्थेत सापडणे हे फारच सोपे आहे. तथापि, हे वचन, आपल्याला आशा आणि आपल्या संघर्षावर उपाय पुरविते.
जेव्हा आपण देवाचा धावा करतो, तेव्हा आपण आपली अंत:करणे आणि मने त्याच्याकडे वळवीत असतो. आपण हे स्वीकारतो की तो नियंत्रण ठेवून आहे, आपण आपल्या चिंता आणि भय त्यास सोपवीत असतो. त्याचा धावा करण्याद्वारे, आपण आपल्या स्वतःला त्याच्या उपस्थितीसाठी उघडे करतो, आणि त्याची शांति आणि आनंद आपली अंत:करणे भरून टाकेल. हे मग हर्ष करण्याकडे नेईल.

तुम्ही लोक परमेश्वराला शोधत आला, सुखी व्हा. (स्तोत्रसंहिता १०५:४)

देवाचा धावा करणे ही कृती केवळ एक वेळेची घटना नसली पाहिजे परंतु त्याऐवजी ही सातत्याची निवड झाली पाहिजे. म्हणून, जर तुम्हाला फारच निराशाजनक किंवा हताश असे वाटत असेन, तर मी तुम्हाला प्रोत्साहन देतो की देवाचा धावा करा.

देवाबरोबर आपले संबंध हे केवळ त्याचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी नाही किंवा संकटाच्या वेळी त्याचे साहाय्य मागण्यासाठी नाही परंतु तो कोण आहे यासाठी त्याचा धावा करणे आहे.

जेव्हा आपण देवाचा धावा करतो, तेव्हा आपण देवाच्या प्रत्यक्ष व्यक्तित्वाचा धावा करीत असतो. आपण त्याचा धावा करीत आहोत की त्याजवर प्रीति करावी, त्यास ओळखावे आणि त्याच्या सान्निध्यात राहावे. आपण हे स्वीकारीत आहोत की तो सर्व जीवन व चांगुलपणाचा उगम आहे आणि त्याजवाचून आपण काहीही करू शकत नाही.

परंतु देवाचा धावा करणे हे केवळ त्याच्या व्यक्तित्वाचा धावा करणे नाही; तर त्याच्या शक्तीचा धावा करण्याविषयी देखील आहे. देवाची शक्ती ही सामर्थ्य आहे जे आपल्याला सक्षम करते की असे जीवन जगावे जसे जगण्यासाठी त्याने आपल्याला पाचारण केले आहे. हे ते सामर्थ्य आहे जे आपल्याला सक्षम करते की पाप व परीक्षेवर प्रभुत्व मिळवावे, आपल्या शत्रूंना प्रेम करावे, इतरांची त्यागपूर्ण सेवा करावी, आणि कठीण परिस्थिती सहन कराव्यात.

ख देऊ नका. माझ्या संदेष्ट्यांचे काही वाईट करु नका.” (स्तोत्रसंहिता १०५:१५)

जेव्हा दाविदाला इस्राएलाचा पुढील राजा म्हणून देवा द्वारे अभिषेक करण्यात आला, तेव्हा त्याने ताबडतोब जबरदस्तीने शौलाचे स्थान घेतले नाही. त्याऐवजी, देवाच्या वेळेसाठी त्याने वाट पाहिली आणि शौलाप्रती सन्मानजनक राहिला, ही वास्तविकता असताना देखील की शौल त्याचा पाठलाग करीत होता आणि त्यास मारण्याचा प्रयत्न करीत होता.

एक विशेष प्रसंगी, जेव्हा दावीद आणि आणखी दोन पुरुष रात्रीच्या वेळी शौलाच्या छावणीमध्ये गुपचूप शिरले होते, तेव्हा त्या दोनपैकी एकाने विचारले की शौलाला भाल्याने मारून टाकावे काय कारण त्यास वाटले की देवाने शौलाला दाविदाच्या हाती दिले आहे. परंतु दाविदाने अस्वीकार केला आणि म्हटले, "परमेश्वराच्या अभिषिक्तावर हात चालवून कोण निर्दोष राहणार? (१ शमुवेल २६:३-११). १५-१६ वचनांमध्ये, दावीद अबनेराची कानउघाडणी करीत आहे की शौलाचे संरक्षण केले नाही आणि तो मरणदंडास पात्र आहे कारण त्याने त्याच्या मालकाचे रक्षण केले नाही.

नंतर इस्राएल मिसरमध्ये आला. याकोब हामच्या देशातच राहिला. (स्तोत्रसंहिता १०५:२३)

स्तोत्र ७८:५१, १०५:२३, २७; १०६:२२, १ इतिहास ४:४० मध्ये बायबल मिसर देशाला "हामाचा देश" असे संबोधते.

नंतर देवाने त्यांच्या माणसांना मिसरबाहेर काढले. त्यांनी बरोबर सोने आणि चांदी आणली. देवाचा कुठलाही माणूस ठेच लागून पडला नाही. (स्तोत्रसंहिता १०५:३७)

या वचनात "अशक्त" साठी बायबलच्या स्ट्राँगचा एक्झॉस्टिव्ह कॉन्कॉर्डन्सनुसार इब्री शब्द हा "काशाल" आहे. हे शारीरिक अशक्तपणास दर्शविते, विशेषतः पाय किंवा घोट्यामधील अशक्तपणा, जे एखादयाला डळमळण्यास किंवा अडखळण्यास कारणीभूत ठरते. ते स्थिरता व शक्तीचा अभाव सुचविते आणि जोर देते की एखादा हा अशक्त असणे, मूर्च्छा येणे किंवा आजारी पडण्याची शक्यता आहे. ते मग सुदृढ व आरोग्यपूर्ण असे होतात, आणि प्रवास करण्यास सक्षम असतात.

हे गोंधळात टाकण्यासारखे आहे की इस्राएलांतील एकही व्यक्ति अशक्त किंवा कमकुवत नव्हता जेव्हा ते मिसर देशातून निघाले होते. नाहीतरी, ते पिढ्यांपासून गुलाम म्हणून जगले होते, कठोर परिश्रम आणि अत्याचार सहन केला होता. हे शक्य असेन की त्यापैकी काही लोकांना जखमा, आजार असतील, किंवा त्यांच्या परिश्रमामुळे सरळपणे बेजार झालेले असतील.

वल्हांडण सणा दरम्यान, जेव्हा मिसर मधील प्रथम जन्मलेल्या पुत्रांना मारण्यात येत होते, तेव्हा इस्राएली लोक ज्यांनी त्यांच्या घराच्या दरवाज्यांच्या चौकटीवर कोकऱ्याचे रक्ताने चिन्हित केले होते ते वाचविले गेले होते. त्याबरोबरच कोणताही इस्राएली व्यक्ति ज्यास पूर्वी कोणत्याही शारीरिक आजाराने पीडिले होते तो चमत्कारिकरित्या बरा झाला होता जेव्हा त्यांनी जो कोकरा वधला होता त्याचे मांस खाल्ले होते. रक्त लावण्याने आणि मांस खाण्याने, त्यांनी शारीरिक व आध्यात्मिक पुनर्स्थापना प्राप्त केली होती. देवाने मिसरी लोकांवर न्याय आणला होता त्याचवेळेस इस्राएली लोकांना आरोग्य आणि पुनर्स्थापना आणली होती.

संपूर्ण राष्ट्र, तरुण व वयस्कर, हे मिसर देशातून पूर्णपणे स्वस्थ असे बाहेर पडण्याचा विचार करणे हे अद्भुत असे आहे. देवा द्वारे ते बरे आणि बलशाली झाले होते की आश्वासन प्राप्त करावे- कनान देशाचे आश्वासन. जर हे जुन्या करारात शक्य आहे तर मग आज नवीन करारात ते किती अधिक शक्य असेल जो उत्तम असा करार आहे? (इब्री लोकांस पत्र ८:६ पाहा)

Join our WhatsApp Channel

Chapters
  • अध्याय १
  • अध्याय २
  • अध्याय ३
  • अध्याय ४
  • अध्याय ५
  • अध्याय ६
  • अध्याय ७
  • अध्याय ८
  • अध्याय ९
  • अध्याय १०
  • अध्याय ११
  • अध्याय १२
  • अध्याय १३
  • अध्याय १४
  • अध्याय १५
  • अध्याय १६
  • अध्याय १७
  • अध्याय १८
  • अध्याय १९
  • अध्याय २०
  • अध्याय २१
  • अध्याय २२
  • अध्याय २३
  • अध्याय २४
  • अध्याय २५
  • अध्याय २६
  • अध्याय २७
  • अध्याय २८
  • अध्याय २९
  • अध्याय ३०
  • अध्याय ३१
  • अध्याय ३२
  • अध्याय ३३
  • अध्याय ३४
  • अध्याय ३५
  • अध्याय ३६
  • अध्याय ३७
  • अध्याय ३८
  • अध्याय ३९
  • अध्याय ४०
  • अध्याय ४१
  • अध्याय ४२
  • अध्याय ४३
  • अध्याय ४४
  • अध्याय ४५
  • अध्याय ४६
  • अध्याय ४७
  • अध्याय ४८
  • अध्याय ४९
  • अध्याय ५०
  • अध्याय ५१
  • अध्याय ५३
  • अध्याय ५४
  • अध्याय ५५
  • अध्याय ५६
  • अध्याय ५७
  • अध्याय ५८
  • अध्याय ५९
  • अध्याय ६०
  • अध्याय ६१
  • अध्याय ६९
  • अध्याय ७०
  • अध्याय ७१
  • अध्याय ७२
  • अध्याय ७६
  • अध्याय ७७
  • अध्याय ७९
  • अध्याय ८०
  • अध्याय ८१
  • अध्याय ८२
  • अध्याय ८३
  • अध्याय ८५
  • अध्याय ८६
  • अध्याय ८७
  • अध्याय ८८
  • अध्याय ८९
  • अध्याय ९०
  • अध्याय १०५
  • अध्याय १२७
  • अध्याय १२८
  • अध्याय १३०
  • अध्याय १३१
  • अध्याय १३२
  • अध्याय १३३
  • अध्याय १३८
  • अध्याय १३९
  • अध्याय १४०
  • अध्याय १४२
  • अध्याय १४४
  • अध्याय १४५
  • अध्याय १४८
  • अध्याय १४९
  • अध्याय १५०
मागील
पुढे
संपर्क
फ़ोन: +91 8356956746
+91 9137395828
व्हाट्स एप: +91 8356956746
ईमेल: [email protected]
पता :
10/15, First Floor, Behind St. Roque Grotto, Kolivery Village, Kalina, Santacruz East, Mumbai, Maharashtra, 400098
आमच्या सामाजिक नेटवर्कवर सामील व्हा!
Download on the App Store
Get it on Google Play
मेलिंग यादीमध्ये सामील व्हा
अन्वेषण
कार्यक्रम
थेट प्रसारण
नोहाट्यूब
टी.वी.
देणगी
डेली मन्ना
स्तुती
अंगीकार
स्वप्ने
संपर्क
© 2025 Karuna Sadan, India.
➤
लॉग इन
कृपया या साईट वर टिपणी आणि कंमेंट करण्यासाठी आपल्या NOAH खात्यावर प्रवेश करा |
लॉग इन