ख्रिस्ताच्या ठायी असलेला एक मनुष्य मला माहीत आहे, त्याला चौदावर्षामागे तिसऱ्या स्वर्गापर्यंत उचलून नेण्यात आले होते; त्याला सदेह नेण्यात आले किंवा विदेही असे नेण्यात आले हे मला ठाऊक नाही; देवाला ठाऊक आहे. (२ करिंथ १२:२)
बायबल विज्ञानी सहमत आहेत की येथे तीन स्वर्ग आहेत.
जुन्या कराराच्या लिखाणानुसार, पहिला स्वर्ग हा पृथ्वीचे वातावरण आहे.
आणि"दुसरा स्वर्ग" हा सामान्यपणे, अंतराळ असा विचार करतात आणि तो भाग जेथे सैतान व त्याची भुते जगली जेव्हा तिसऱ्या स्वर्गातून त्यांना काढून टाकण्यात आले होते (प्रकटीकरण १२:४).
वचनानुसार, तिसरा स्वर्ग हे ते स्थान आहे जेथे परमेश्वर राहतो.
प्रेषित पौलाने त्यास ठाऊक असलेल्या मनुष्याविषयी लिहिले-ज्याविषयी अनेक लोक विश्वास ठेवतात की तो प्रेषित स्वतःच होता, ज्यास शरीरातून वर घेण्यात आले, आणि तिसऱ्या स्वर्गात नेण्यात आले. देवाचे निवासस्थान.
जुन्या करारात, शब्द,"स्वर्गावरील स्वर्ग" (अनुवाद १०:१४; १ राजे ८:२७; स्तोत्र ६८:३३; १४८:४) हे पौलाचे जे "तिसऱ्या स्वर्गाबाबत" म्हणणे आहे त्यास समान असे समजले जाते.
इफिस ४:१० हे येशूचा मृत्यू व पुनरुत्थान विषयी बोलते. "जो खाली उतरला होता त्यानेच सर्व काही भरून टाकण्याच्या उद्देशाने सर्वोच्च स्वर्गावर आरोहण केले."
ह्या वाक्प्रचार कडे लक्ष दया, "सर्वोच्च स्वर्गावर".
शब्द"सर्वोच्च" हा कमीत कमी तीन असा योग्यपणे वापरता येऊ शकतो.
नेहमीच्या बोलण्यात, आपण कधीकधी हा वाक्प्रचार उपयोग करतो, "सातवा स्वर्ग" की मोठ्या आनंदाची अवस्था वर्णन करावी. मी असे सुचवितो की, हे पवित्र शास्त्रातून नाही.
प्रत्यक्षाततो वाक्प्रचार कुराण, मुस्लीम लोकांचा पवित्र ग्रंथ, मधून घेतला गेला आहे, आणि ते ख्रिस्ती लोकांसाठी कदाचित योग्य असे नाही.
त्याऐवजी, जरतुम्हांला विशेषअसे आनंदी वाटत असेल, तर चला मला तुम्हाला हे सुचवू दया की, तुम्ही असे म्हणू शकता, की तुम्ही आता "नवव्या ढगावर" आहात. येथे स्वर्गात पुष्कळ ढग आहेत, आणि तसे व्यक्त करणे हे अधिकतर पवित्र शास्त्रानुसार होईल. येशू ढगावरून येत आहे.
प्रकटीकरणाच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये म्हणून माझ्या शरीरातएक कांटा, म्हणजे मला ठोसे मारण्याकरिता सैतानाचा एक दूत, ठेवण्यात आला आहे; मी चढून जाऊ नये म्हणून ठेवण्यात आला आहे. हा माझ्यापासून दूर व्हावा अशी मी प्रभूजवळ तीनदा विनंती केली.(२ करिंथ १२:७-८)
जेव्हा प्रेषित पौलाला प्रभुयेशू द्वारे सांगितले गेले की, त्याच्या शरीरातील कांटा हा काढून टाकण्यात येणार नाही, त्याने पौलाला तसे का, हे म्हणत प्रोत्साहन व सामर्थ्य दिले.
परमेश्वराने म्हटले, "माझी कृपा तुला पुरे आहे; कारण अशक्तपणातच शक्ति पूर्णतेस येते" (२ करिंथ १२:९). परमेश्वर हे निश्चित करतो की पौल हा अशक्तच राहील म्हणजे पौलाच्या वतीने ख्रिस्त हा सामर्थी असा दिसला पाहिजे.
जर आपल्याला स्वयंपूर्ण असे वाटते, तर आपल्याला गौरव मिळेल, पण ख्रिस्त नाही. म्हणजे, ख्रिस्त जगाच्या कमकुवत गोष्टी निवडतो, "म्हणजे देवासमोर कोणाही मनुष्याने अभिमान बाळगू नये" (१ करिंथ १:२९). आणि कधीकधी तो जे सशक्त असे दिसतात त्यांना कमकुवत असे करतो म्हणजे त्याचे दैवी सामर्थ्य हे सर्वांना अधिक प्रगट होईल.
आपल्याला ठाऊक आहे की पौलाने ही अद्भुत कृपा अनुभविली कारण त्याने त्यामध्ये आनंद केला: त्याकडे पाहा त्याने कसे म्हटले:
परंतु त्याने मला म्हटले आहे, माझी कृपा तुला पुरे आहे; कारण अशक्तपणातच शक्ति पूर्णतेस येते. म्हणून ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया माझ्यावर राहावी म्हणून मी विशेषकरून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवीन.
ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे ह्यांत मला संतोष आहे; कारण जेव्हा मी अशक्त तेव्हाच मी सशक्त आहे. (२ करिंथ १२:९-१०)
तुमच्या एखादयाअशक्तपणात देवाने स्वतःला प्रबळ असे दाखविले आहे काय?