तथापि पवित्र जनांची सेवा करण्याविषयी मी तुम्हांला लिहावे ह्याचे अगत्य नाही. (२ करिंथ ९:१)
१. परमेश्वराची सेवा करावी.
२. पवित्र जनांची सेवा करावी (देवाचे लोक) (२ करिंथ ९:१)
परमेश्वराची सेवा करावी
शमुवेल बाळ सणाचे एफोद धारण करू परमेश्वराची सेवा करीत असे. (२ शमुवेल २:१८)
जेव्हा ते देवाची सेवा व उपास करीत होते, पवित्र आत्म्याने म्हटले, "बर्णबा व शौल ह्यांना ज्या कार्यासाठी मी बोलाविले आहे त्यासाठी त्यांना माझ्याकरिता वेगळे करून ठेवा." (प्रेषित १३: २)
कोणतीही सेवा प्रथम देवाप्रती केल्या शिवाय ती इतर कोणाकरीता केली तर ते मूर्तीपूजा आहे.
पवित्र जनांची सेवा करावी
वास्तवात, तुमच्या आस्थेने त्यातील बहुतेक मासेदोनियातील लोकांना देण्याचे उत्तेजन मिळाले आहे. (२ करिंथ ९:२)
तुमची उत्सुकता कोणाला परमेश्वराची सेवा करण्यास उत्तेजन देईल. तुमचे जीवन कोणाला देवासाठी जगण्यास उत्तेजन देईल. उत्सुकता ही संसर्गजन्य आहे.
हे ध्यानात घ्या की, जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करील; आणि जो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करील. (२ करिंथ ९:६)
सामान्यपणे, येथे भीति असते की आपण गमावीत आहो जेव्हा आपण देत आहोत. तथापि, जसे शेतकरी भविष्यात मिळणाऱ्या पिकाची आशा ठेवून देतो, आपण सुद्धा तशाच अंत:करण व आशेने दयावे. तुमची कापणी ही तुमच्या पेरण्यावर अवलंबून आहे.
प्रत्येकाने आपआपल्या मनात ठरविल्याप्रमाणे दयावे; दु:खी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये; कारण 'संतोषाने देणारा देवाला' प्रिय असतो. (२ करिंथ ९:७)
दान कसे दयावे
१. आपआपल्या मनात ठरविल्याप्रमाणे दयावे
२. संतोषाने दयावे
कसे देऊ नये
१. दु:खी मनाने
२. शोकित होऊन
३. जबरदस्तीने
४. एक धार्मिक कर्तव्य आहे म्हणून नाही
सर्व प्रकारची कृपा तुम्हांवर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे; ह्यासाठी की, तुम्हांला सर्व गोष्टींत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्वकाही तुमच्याजवळ विपुल व्हावे. (२ करिंथ ९:८)
हे जसे काही आशीर्वादाचे शाश्वत चक्र आहे.
अ. परमेश्वर दान देण्यासाठी आपल्याला कृपा देतो.
ब. आपले दान देणे हे देवाची कृपा आपल्या जीवनात मोकळी (किंवा कार्यरत) करते.
क. ती कृपा अधिक देण्यास इच्छा निर्माण करते.
ड. परमेश्वर आपल्याला कृपा देतो की दयावे.
लक्षात घ्या की परमेश्वर तुमच्यावर अधिक कृपा करतो याचे कारण हे की प्रत्येक चांगल्या कामाकरिता तुमच्याजवळ विपुल असावे. संपन्नता ही केवळ तुमच्यासाठी नाही. ही त्यासाठी आहे की तुम्ही इतरांसाठी आशीर्वाद असे व्हावे.
त्याचे नीतिमत्व युगानुयुग राहते. (२ करिंथ ९:९)
स्तोत्र ११२:९ मधील ह्या संदर्भात, प्रेषित पौल हे सांगण्याचा प्रयत्न करीत नाही की उदारपणे देणे हे आपल्याला नीतिमान ठरविते परंतु देवासमोर योग्य स्थान असण्याचे प्रमाण देते.
जो [परमेश्वर] 'पेरणाऱ्याला बी' पुरवितो 'व खाण्याकरिता अन्न' पुरवितो तो तुम्हांला बी पुरवील व ते बहुगुणीत [स्त्रोत साठी] करील आणि तुमच्या नीतिमत्वाचे फळ' [कार्यरत चांगुलपणा, दया, परोपकार] वाढवील. (२ करिंथ ९:१०)
पेरणारा हा खाणाऱ्या पेक्षा मोठा आहे. परमेश्वर खाणाऱ्यास अन्न व पेरणाऱ्यास बी पुरवितो.
पाहा, पाऊस व बर्फ ही आकाशातून पडतात; आणि पृथ्वी भिजवून, तिला सफळ व हिरवीगार केल्यावाचून, पेरणाऱ्यास बीज, खाणाऱ्यास भाकरी दिल्यावाचून ती परत वर जात नाहीत. (यशया ५५:१०)
तुमच्याजवळ तेवढे पैसे आज कदाचित नसतील परंतु जर तुम्ही आज पेरणारे असे समर्पण कराल, तर परमेश्वर तुम्हाला वित्तीय पुरवठा करेल की पेरावे. परमेश्वर नेहमीच पेरणाऱ्यास बी पुरवितो.
ह्या संज्ञा रूपकात्मकरित्या वापरल्या जातात हे सांगण्यासाठी की परमेश्वर कसे लोकांना अधिक देतो जे देणारे आहेत आणि खाणाऱ्याची मुलभूत गरज पूर्ण करतो.
खाणारे हे ते आहेत जे त्यांचे वित्त मुख्यतः त्यांच्या गरजांसाठी वापरतात. पेरणारे हे ते आहेत जे त्यांचे वित्त मुख्यतः इतरांना देण्यासाठी वापरतात. हे देण्या प्रति अंत:करणाच्या वृत्ती विषयी आहे. ते जे अधिक पैशाची इच्छा करतात म्हणजे ते अधिक "वस्तू" मिळवितील ते खाणारे आहेत. ते जे अधिक पैशाची इच्छा करतात म्हणजे दान दयावे ते पेरणारे आहेत.
इफिस ४:२८ म्हणते,
चोरी करणाऱ्याने पुन्हा चोरी करू नये; तर त्यापेक्षा गरजवंताला दयावयास आपल्याजवळ काही असावे म्हणून जे चांगले ते आपल्या हातांनी करून उदयोग करीत राहावे.
हे वचन सांगते की आपण काम करावे यासाठी कारण हे की आपण त्यांना देऊ शकावे जे गरजे मध्ये आहेत. ते अद्भुत आहे! अनेक लोक हे म्हणतील की आपण काम करावे त्यासाठी कारण हे की आपण आपले बील भरू शकावे व आपल्या गरजांची पूर्तता करावी. परंतु पवित्र शास्त्र तसे सांगत नाही. आपल्या काम करण्याचा उद्देश हा की आपण इतरांना आशीर्वाद देऊ शकावे.
जेव्हा आपण खाण्याअगोदर पेरण्यास ठेवतो, परमेश्वर आपल्या वित्तीय बाबतीत सहभागी होतो आणि आपल्या प्रत्येक गरजा पूर्ण करतो. वास्तवात, तुम्ही तुमची काळजी घेण्यापेक्षा परमेश्वर तुमची उत्तम काळजी घेईल.
करिंथ येथे ख्रिस्ती लोकांकडून दान देण्याचे चार लाभ (२ करिंथ ९:१२-१४)
१. संतांच्या गरजांची पूर्तता करतो.
२. देवाला अनेक धन्यवाद.
हे स्वयं देवाला स्तुति व धन्यवाद उत्स्फुर्तपणे देणे आहे
३. तुमच्या ख्रिस्तसुवार्तेच्या पत्कराबाबत आज्ञाधारकपणा
त्यांची पापकबुली ही त्यांच्या वागणुकी पेक्षा अधिक होती. त्याने हे सिद्ध केले की हा त्यांच्या जीवनाचा मार्ग होता. आपल्या जीवनाचा मार्ग आपला ख्रिस्तसुवार्तेचा स्वीकार भक्कम करतो.
४. आणि तुमच्यासाठी त्यांच्या प्रार्थने द्वारे
यरुशलेम ख्रिस्ती लोकांना त्यांच्यासाठी प्रार्थना करण्यास उत्कंठा होते.
देवाच्या अवर्णनीय दानाबद्दल त्याची स्तुति होवो. (२ करिंथ ९:१५)
परमेश्वर हा सर्वात मोठा देणारा आहे. त्याने जे दान दिले आहे ते वर्णना पलीकडे आहे:
देवाने जगावर एवढी प्रीति केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. (योहान ३:१६)