कारण त्यांनी आपल्या शक्तीप्रमाणे व शक्तीपलीकडे आपण होऊन दान दिले अशी मी साक्ष देतो. (२ करिंथ ८:३).
१. त्यांनी आपल्या शक्तीप्रमाणे दिले
२. त्यांच्या शक्तीपलीकडे होऊन दिले
३. आपण होऊन दान दिले, तसेच ती कृपणतेने ने देता उदार अंत:करणाने दिले. (२ करिंथ ९:५)
१. उदारपणा हे संपन्नतेवर आधारित नाही.
अनेक विचार करतात की जर आपल्याकडे जास्त आहे तर आपण जास्त देऊ. परंतु प्रत्यक्षात, जर आपण सध्या आपल्याकडे जे आहे त्यातून देत नाहीत, तर मग आपण कधीही देणार नाही जेव्हा आपल्याकडे जास्त असेल.
मासेदोनियातील ख्रिस्ती लोकांकडे जास्त देण्यासाठी काहीही नव्हते. जरी ते दारिद्र्यात जगत होते व मोठया क्लेशातून जात होते, त्यांच्याकडे विपुल आनंद व उदारपणाची संपन्नता होती (२ करिंथ ८:२). त्यांनी स्वतःहून दिले केवळ जे ते देऊ शकत होते तेव्हढेच नाही परंतु त्यांच्या शक्तीपलीकडे जाऊन सुद्धा दिले. (२ करिंथ ८:३)
२. उदारपणा हा करुणामय अंत:करणातून येतो
कदाचित हेच कारण असेल की मासेदोनियातील लोक हे त्यांच्या दान देण्यामध्ये इतके उदार होते कारण त्यांना हे ठाऊक होते की गरजे मध्ये असणे हे कशासमान आहे आणि त्यांना देवाच्या विश्वसनीयपणाचा अनुभव होता.
एकदा की त्यांनी यरुशलेम मधील संता विषयी ऐकले, त्यांचे अंत:करण करुणेने भरून गेले आणि त्यांनी पौलाला विनंती केली की त्यांना साहाय्य करण्याच्या सहभागात त्यांना आदर मिळावा. (२ करिंथ ८:४)
आम्हांस आशा होती त्याप्रमाणेच केवळ नव्हे, तर त्यांनी प्रथम आपणां स्वतःस प्रभूला दिले आणि देवाच्या इच्छेने आपणांस आम्हांलाही दिले. (२ करिंथ ८:५)
त्यांनी प्रथम स्वतःला देवाला दिले, .......आणि मग आम्हांला
प्रथम, तुम्हांला तुमच्या स्वतःला देवाला दिले पाहिजे आणि मग दान दया, सेवा करा
तर विश्वास, भाषण, ज्ञान, प्रत्येक गोष्टीची आस्था, व आम्हावरील तुमची प्रीति ह्या सर्वांमध्ये जसे तुम्ही समृद्ध आहा, तसे कृपेच्या ह्या कार्यांतही असावे. (२ करिंथ ८:७)
प्रेषित पौल येथे अध्याय ८ तसेच अध्याय ९ मध्ये "कृपा" हा शब्द वापरत आहे, की दान दयावे हे वर्णन करावे. जे सर्व काही आपल्याजवळ आहे व आपण करतो ते देवाच्या कृपे नुसार आहे. आपण जगतो त्याचे कारण हे केवळ कृपे मुळे आहे, आणि म्हणून आपण दान देतो त्याचे कारण हे कृपे मुळे आहे. दान देणे हे कृपा आहे ज्यामध्ये आपल्याला राहिले पाहिजे.
तर हे कार्य आता पूर्ण करा; ह्यासाठी की, जशी इच्छा करण्याची उत्सुकता तुम्हांस होती तशी तुमच्या ऐपतीप्रमाणे कार्यसिद्धी व्हावी. (२ करिंथ ८:११)
दान देणे हे उपासनेचे कार्य आहे.