कारण आम्ही देहात चालणारे असूनही आम्ही देहस्वभावाप्रमाणे युद्ध करीत नसतो. (२ करिंथ १०:३)
प्रेषित पौल म्हणत आहे आपण देहात जगत आहोत, आणि युद्धात व्यस्त आहोत. हे युद्ध हे शरीराच्या स्तरातील नाही परंतु युद्ध हे आध्यात्मिक स्तरात लढले जात आहे.
कारण हे युद्ध आध्यात्मिक स्तरात लढले जात आहे, त्यामुळे शस्त्रे जी आपण वापरीत आहोत ती नेहमीची अशी नाहीत जसे बंदूक, बॉम्ब वगैरे परंतु आध्यात्मिक शस्त्रे.
कारण आमच्या युद्धाची शस्त्रे दैहिक नाहीत, तर तटबंदी जमीनदोस्त करण्यास ती देवाच्या दृष्टीने समर्थ आहेत. तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले असे सर्व काही पाडून टाकून आम्ही प्रत्येक कल्पना अंकित करून तिला ख्रिस्तापुढे मान वाकविण्यास लावतो; आणि तुम्ही आज्ञापालनात पूर्ण व्हाल तेव्हा सर्व आज्ञाभंगाबद्दल शासन करावयास आम्ही सिद्ध आहो. (२ करिंथ १०:४-६)
बायबल आपल्याला स्पष्ट करते की आपल्या युद्धाची शस्त्रे ही दैहिक नाहीत परंतु देवा द्वारे सामर्थी आहेत की आपल्या विरोधात येणाऱ्या सर्व प्रकारच्या शत्रूला नष्ट करते व त्याची मानहानी करते.
कारण आपल्या युद्धाची शस्त्रे......(शस्त्रांचे वर्णन)
१. हे दैहिक नाही (ते आध्यात्मिक शस्त्रे आहेत)
२. परंतु देवा मध्ये समर्थ आहेत.
शस्त्रांचा उद्देश
१. बालेकिल्ले नष्ट करण्यासाठी
२. वादविवादांस काढून टाकण्यास
३. (काढून टाकणे) सर्व उच्च गोष्टी जे स्वतःला देवाच्या ज्ञाना विरुद्ध उच्च करतात,
४. प्रत्येक विचार ख्रिस्ताप्रती आज्ञाधारक होण्यास बंधनकारक करतात
आध्यात्मिक युद्धे आध्यात्मिक शस्त्रांद्वारे लढली जातात, दैहिक शस्त्रांद्वारे नाही.
लक्षात घ्या पवित्र शास्त्र शस्त्रे बोलत आहे, शस्त्र नाही......तुम्ही मला सांगू शकता काय की ती शस्त्रे काय आहेत?
आपली मुख्ये शस्त्रे ही...
१. येशूचे बोलले जाणारे नांव
२. येशूचे बोलले जाणारे रक्त
३. देवाचे बोलले जाणारे वचन
आम्ही सर्व गर्विष्ठ अडथळे नष्ट करतो जे देवाला जाणण्यापासून दूर ठेवते. (२ करिंथ १०:५ एनएलटी)
प्रत्येक गर्विष्ठ अडथळे जे आपल्याला देवाला जाणण्यापासून दूर ठेवतात, ते येशूच्या नांवात नष्ट केले जावोत. (२ करिंथ १०:५ एनएलटी)
परंतु आमचा अधिकार तुमची उन्नति करतो; ते तुम्हांला खाली पाडत नाही. (२ करिंथ १०:८)
येथे अधिकार आहे जो कोणाची उन्नति करतो आणि मग येथे अधिकार आहे जो तुम्हाला खाली पाडतो. तुमचा अधिकार लोकांची उन्नति करण्यास वापरा.