डेली मन्ना
२१ दिवस उपवासः दिवस १६
Monday, 27th of December 2021
58
12
2612
Categories :
उपास व प्रार्थना
वाईट पाया नष्ट करणे
देवाच्या कोणत्याही लेकरांसाठी पाया चे ज्ञान ठाऊक असणे हे महत्वाचे आहे. ह्या ज्ञानाशिवाय, अनेक युद्ध हे गमाविले जातील आणि तो किंवा ती जिवंतांच्या भूमी मध्ये परमेश्वराचा चांगुलपणा पाहण्यास जिवंत असणार नाही. (स्तोत्र २७:१३)
पाया हे आपल्या अदृश्य शत्रूचे लपण्याचे मुख्य ठिकाण आहे. असे आध्यात्मिक स्तर हे वाईट/दुष्ट राजा द्वारे नियंत्रित केले जाते. तेथून वेदीला कार्यरत केले जाते व त्यांच्या हळुवार बोलण्याने द्वार हे उघडले जातात.
शत्रू हे नेहमीच त्या पाया मध्ये लपण्यास पळतील जर त्यांना नष्ट केले गेलेले नाही तर ते पुन्हा डोके वर काढतील. प्रार्थना व उपास याची अधिक पुष्टी केली जाते जेव्हा अशा गोष्टींना नष्ट करावयाचे आहे.
परंतु प्रथम, पाया हे काय आहे?
पाया नष्ट करणे हे त्याप्रमाणे आहे जसे शत्रूच्या भागात एक सामर्थ्यशाली बॉम्ब टाकणे.
बायबल विस्तृतपणे पाया विषयी बोलते
पाया हे सुरुवात आहे; मुख्य गोष्ट:
(कृपा करून ज्या वचनांचा उल्लेख केला गेला आहे ते वाचा. हे तुम्हाला प्रकटीकरण ज्ञान देईल जे तुम्हाला आध्यात्मिक युद्धात साहाय्य करेल. आजचा दिवस हा अत्यंत महत्वाचा आहे, आणि तुम्हाला अतिरिक्त वेळ काढून प्रार्थना करण्याची गरज आहे.)
परमेश्वराच्या क्रोधातून बाहेर पडलेला अग्नि हा कोणत्याही पायाला जाळू शकतो. (अनुवाद ३२:२२; विलापगीत ४:११)
पाया जे स्थिर आहे ते मजबुतीने बांधलेले आहे. (एज्रा ६:३)
प्रत्येक पायाला कोपऱ्याचा दगड आहे. (ईयोब ३८:६)
धर्मिकांसाठी चांगला पाया/पाये हे नष्ट केले जाऊ शकतात. (स्तोत्र ११:३)
जर तसे घडते, तर नीतिमानाने काय केले पाहिजे? (पाया शिवाय काहीही अस्तित्वात राहू शकत नाही, जेव्हा एक चांगला पाया हा नष्ट केला जातो, एक वाईट किंवा कमकुवत पाया हा बांधला जातो.)
पृथ्वीचा पाया हा परमेश्वरा द्वारे स्थापित केला गेला आहे. (यशया ५१:१३, १६)
आपल्याला अनेक पिढ्यांचा पाया उभारण्यास बोलाविण्यात आले आहे. आपण पूल बांधणार आहोत व जुनी वैराण ठिकाणे पुन्हा बांधू. (यशया ५८:१२)
दुष्टांसाठी असलेला पाया हा पडू शकतो, देवाच्या क्रोधा द्वारे भिंती ह्या पाडल्या जातील. (यिर्मया ५०:१५)
ते मोडून नष्ट केले जाऊ शकते (एज्रा ३:१०-११)
पाया हा ऐकू शकतो. (मीखा ६:२)
पर्वतांना (जे स्वतःला अति श्रेष्ठ किंवा मोठा अडथळा असे सादर करतात) पाया आहे. (अनुवाद ३२:२२)
भूमिकंप हे पायाला नष्ट करू किंवा हादरवू शकतात. (प्रेषित १६:२६)
जेव्हा पाया हा हादरला जातो, द्वार हे उघडले जातात, व कैदी/बंदिवान हे मुक्त केले जातात. (प्रेषित १६:२६)
नवीन यरुशलेमेच्या नगरास बारा पाये असतील. (प्रकटीकरण २१:१४)
मंडळी ही प्रेषित व संदेष्ट्यांच्या पायांवर बांधलेली आहे, परंतु येशू हा मुख्य कोनशिला आहे. (इफिस २:२०)
तुमचे जीवन, कुटुंब, नोकरी, घर, मंडळी इत्यादी, चा पाया कसा आहे?
शत्रू विरुद्ध तुम्ही लढा कसा देता?
आध्यात्मिक युद्धात, तुम्हाला तुमच्या शत्रूच्या मागे लागावे लागते, त्यांना मार्गावरच नष्ट करावे लागते, जोपर्यंत ते त्यांच्या बालेकिल्ल्याच्या सुरक्षितते मध्ये प्रवेश करीत नाहीत. ते ज्या द्वारांवर वाढतात ते नष्ट करा. द्वार नष्ट करण्यासाठी तुम्हाला सामर्थ्यशाली शस्त्र वापरण्याची गरज आहे. तुम्हाला त्यांचा पाठलाग करावयाचा आहे व पुढे त्यांना नष्ट करावयाचे आहे.
काही हे कदाचित लपतील. एकदा की आत गेला, त्यांच्या वेद्या नष्ट करा. त्यांना जाळून टाका, उपटून काढा व त्यांचे राज्य उलथून टाका जे त्यांच्या वाईट पाया चा हिस्सा आहे. जे काही त्यांना लोक असे एकत्र ठेवतात, त्यांच्या उपजीविकेचे मुख्य ठिकाण, ते सुद्धा तुम्ही नष्ट केले पाहिजे.
आध्यात्मिक शस्त्र वापरण्याचे आणखी एक मार्ग हा की संपूर्ण नगर/बालेकिल्ला बॉम्ब टाकून नष्ट करावे. हे तुमच्या शत्रूला निष्प्रभ करेल.
प्रार्थना
प्रत्येक प्रार्थना अस्त्र वारंवार म्हणा जोपर्यंत ते तुमच्या अंत:करणातून येत नाही. केवळ तेव्हाच मग पुढच्या प्रार्थना अस्त्रा कडे वळा. (वारंवार म्हणा, व्यक्तिगत करा व प्रत्येक प्रार्थना मुद्दा कमीत कमी एक मिनीट असे करा.)
तूच, हे परमेश्वरा, पाये निर्माण केले आहे.
ऊठ, हे परमेश्वरा येशूच्या नांवात, आणि माझ्या पायांवर नियंत्रण घे.
मी देवाची संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करतो: तारणाचे शिरस्त्राण, नीतिमत्वाचे उरस्त्राण, सत्याचा कमरबंद, शांतीच्या शुभवर्तमानाच्या तयारीत जोडे, विश्वासाची ढाल, आणि आत्म्याची तरवार येशूच्या नांवात.
मी त्या पायांविरुद्ध देवाचा अग्नि येशूच्या नांवात मोकळा करतो जे माझ्या जीवनाच्या विरोधात बोलते.
हे परमेश्वरा, त्या पायांना धमकाव, जे माझ्या जीवनाच्या विरोधात उभे राहतात व त्यांना येशूच्या नांवात उघडे कर.
प्रत्येक पायांवर मी एक सामर्थ्य भूमिकंप येशूच्या नांवात मोकळा करीत आहे, जे माझे कुटुंब, माझा व्यवसाय, माझी वित्तीयता, माझे आरोग्य याविरुद्ध बोलते.
ऊठ, हे परमेश्वरा, आणि त्या प्रत्येक पायांना येशूच्या नांवात उघडे कर जे माझा विरोध करते.
वाईट पायांकडून माझ्या जीवनाच्या विरोधात येणाऱ्या प्रत्येक वाईट वाणीला येशूच्या नांवात मी निष्प्रभ करीत आहे.
माझ्या जीवनातील वाईट पायांच्या प्रत्येक जोड ला जिवंत परमेश्वराच्या अग्निद्वारे मी नष्ट करीत आहे.
प्रत्येक पर्वत जे माझ्यासमोर त्याचे पाय रोवून उभे राहत आहे त्यास येशूच्या नांवात मी उपटून टाकीत आहे.
Join our WhatsApp Channel
Most Read
● दोनदा मरू नका● भावनात्मकदृष्टया वाहवत जाऊन बळी पडणे
● येशू स्वर्गात काय करीत आहे
● त्याच्या धार्मिकतेस परिधान करा
● तणावाला नियंत्रणात ठेवण्याचे ३ सामर्थ्यशाली मार्ग
● अडखळण्याच्या जाळ्यात पडण्यापासून मुक्त राहणे
● दिवस ०४: ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
टिप्पण्या