कुप्र बेटांत जन्मलेला योसेफ नांवाचा लेवी होता त्याला प्रेषित बर्णबा म्हणजे बोधपुत्र म्हणत. त्याची शेतजमीन होती; ती त्याने विकली व तिचे पैसे आणून ते प्रेषितांच्या चरणापाशी ठेविले. (प्रेषित ४: ३६-३७)
वरील वचनात आपण एकव्यक्ति बर्णबा ला पाहतो ज्याने त्याची संपत्ती विकली, पैसे प्रेषिताकडे आणले. हे विश्वासूपणा आणि उदारपणाचे कार्य होते.
परंतु हनन्या नावांचा कोणी एक इसम व त्याची बायको सप्पीरा ह्यांनी आपली मालमत्ता विकली. मग त्याने आलेल्या किंमतीतून काही भाग बायकोच्या संमतीने मागे ठेविला व काही भाग आणून प्रेषितांच्या चरणांपाशी ठेवला. (प्रेषित ५: १-२)
सहज पाहणाऱ्या व्यक्तींना, हनन्या व सप्पीरा हे तसेच काम करीत होते. तथापि, त्यांच्या हृदयात खोलवर, कदाचित पैशा साठी प्रेम निर्माण झाले असेन.
त्या दोघांना लोकांसमोर महान उदारवादी आहोत अशी प्रतिमा व्हावी असे पाहिजे होते, प्रत्यक्षात उदार न होता. स्पष्ट आहे, की ते देवा पेक्षा मनुष्यांकडून प्रशंसेची इच्छा ठेवत होते. (योहान १२: ४३)
येथे दोन प्रकारचे लोक आहेत:
पहिले हे केवळ देवाची इच्छा पूर्ण करणेआणि केवळ त्याच्याकडूनच प्रशंसा प्राप्त करावीयाइच्छेने कार्य करीत होते.हा प्रकार अल्प लोकांमध्ये येतो.
इतर वर्गातील लोक ते जे सर्व काही करू शकतात ते करतात कि केवळ त्यांच्याभोवतालच्या लोकांनी ते पाहावे आणि त्यांची प्रशंसा करावी. जर त्यांची प्रशंसा झाली नाही, ते दु:खी आणि कडवे होतात. म्हणून तुम्ही पाहा, हे शक्य आहे की काही गोष्टी करणे जे वरवरखरेच चांगले दिसते परंतु ते संपूर्णपणे चुकीच्या कारणाने केले जाते.
ह्या प्रश्नाच्या प्रकाशात तुमच्या स्वतःचे परीक्षण करा:
इतरांनी पाहावे आणि प्रशंसा करावी यासाठी मी परमेश्वराची सेवा करीत आहे काय?
जेव्हा मी देवाला देतो, मी मोठी तुतारी वाजवून घोषणा करतो काय की जे मी केले आहे?
अशा सारखे ज्वलंत प्रश्न विचारणे जेव्हा आपण देवासमोर एकटे आहोत ते आपल्याला पश्चाताप करण्यास आणि त्याच्या कृपे मध्ये वाढण्यास कारणीभूत होतील.
हनन्या आणि सप्पीरा काय विसरले की देवापासून काहीही लपलेले नाही. "मानवासारखे परमेश्वराचे पाहणे नसते; मानव बाहेरचे स्वरूप पाहतो पण परमेश्वर हृद्य पाहतो." (१ शमुवेल १६: ७)
जसे येशूने थुवतीरा येथील तडजोड करणाऱ्या चर्च ला म्हटले, "मी तिच्या मुलांबाळांस जिवे मारीन, म्हणजे सर्व मंडळ्यांना कळून येईल की, मी'मने व अंत:करण ह्यांची पारख करणारा' आहे आणि तुम्हां 'प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्यांप्रमाणे प्रतिफळ देईन." (प्रकटीकरण २: २३)
चला आपण हे कधीही विसरू नये कीतोच एकमेव आहे जो मनुष्यांचेअंत:करण आणिमने पारखणारा आहे. त्याच्या नेत्रांपासून काहीही लपलेले नाही. परमेश्वरा समोर कशाची किंमत होते ते बाह्य आचरण नाही परंतु चांगल्या कार्या द्वारे आंतरिक बदल जो व्यक्त केलेला आहे.
प्रार्थना
पित्या, माझी झडती घेऊन माझे हृदय जाण; देवा, माझ्या ठायी दुष्टपणाकडे काही प्रवृत्ति असेल तर पाहा आणि मला सनातन मार्गाने चालीव. (स्तोत्रसंहिता १३९: २३-२४)
Join our WhatsApp Channel
Most Read
● कर्जामधून बाहेर या: किल्ली# १● साधारण पात्रा द्वारे महान कार्य
● उपासना: शांतीसाठी किल्ली
● योग्य पाठपुरावा अनुसरण
● मार्गहीन प्रवास
● अभिषेक आल्या नंतर काय होते
● याची प्रत्यक्ष पर्वा आहे काय?
टिप्पण्या