डेली मन्ना
35
10
1215
क्षमा करण्यासाठी व्यवहारिक पाऊले
Tuesday, 1st of February 2022
Categories :
क्षमा
जेव्हा कोणी आपल्याला किंवा ज्यांवर आपली प्रीति आहे त्यास दु:ख देतो, आपला स्वाभाविक प्रतिसाद हा बदला घेणे असतो. दुखावले जाणे हे रागात आणते. गर्व आपल्याला सुचना देण्यास सुरुवात करतो की आपण पुन्हा सर्व कसे स्थिर स्थावर व्हावे. अशा नाजूक परिस्थितीत व्यक्तीला हे कसे शक्य होईल की क्षमा करावी?
जसे मी काल उल्लेखिले, ख्रिस्त आपल्या ठिकाणी मरण पावला की कर्ज भरावे जे कधीही भरले गेले नसते. देवाने त्याचे सिद्ध बलिदान आपल्या वतीने स्वीकारले आणि आपले कर्ज क्षमा केले. सर्व क्षमा ही ह्या सत्या मध्ये मुळावलेली आहे.
पवित्र आत्म्याच्या सामर्थ्या द्वारे क्षमा:
क्षमा ही काही स्वाभाविक अशी नाही परंतु अद्भुत अशी आहे. ती देवापासून येते आणि ती दैवी आहे. आपण आपल्या शक्ति मध्ये कोणाला कधी क्षमा करू शकत नाही. पवित्र आत्म्याच्या सामर्थ्या द्वारेच आपण हे करू शकतो.
प्रार्थने द्वारे क्षमा:-
"आपल्या शेजाऱ्यावर प्रीति कर व आपल्या वैऱ्याचा द्वेष कर, असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हांस सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीति करा आणि जे तुमचा छळ करितात त्यांच्यासाठी प्रार्थना करा." तशा प्रकारे तुम्ही तुमच्या स्वर्गातील पित्याच्या खऱ्या पुत्रांप्रमाणे कार्य करीत आहात. कारण तो वाईटांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवितो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडितो.
विश्वासा द्वारे क्षमा:
कारण आपण जे दृश्य दिसते तसे नाही, परंतु विश्वासाने चालतो. (२ करिंथ ५:७)
परमेश्वराला सर्व काही ठाऊक आहे परंतु आपल्याला सर्व काही माहीत नसते. ह्या क्षणी, आपण केवळ संपूर्ण गोंधळाचे लहानसे दृश पाहत असतो, तर तो हे सर्व काही पाहतो.
विश्वास हा देवाच्या वचनामध्ये भरवसा ठेवणे आहे. त्याचे वचन म्हणते क्षमा करा म्हणून क्षमा करा. अनेक वेळेला माझ्या स्वाभाविक मनाला त्याचा काही अर्थ लागत नाही. म्हणून तुम्ही पाहता क्षमा व विश्वास हे एकमेकांबरोबर मिसळलेले आहेत, जेव्हा आपण आपले दु:ख, आपली पीडा, आणि आपल्या इच्छा त्याकडे न्याय करणे व समर्थन साठी हे म्हणत "की देवा तुला उत्तम ते ठाऊक आहे" सोपवितो.
नम्रते द्वारे क्षमा:
तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहा, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण करा; एकमेकांचे सहन करा, आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसांत क्षमा करा; प्रभूने तुम्हांला क्षमा केली तशी तुम्हीही करा. (कलस्सै ३:१२-१३)
क्षमाहीनता नेहमीच मानवी गर्वा मधून येते. गर्व मानवी हृदयास कठीण करतो. नम्रता ही देवाने आपल्यासाठी काय केले हे ओळखणे (स्मरण करणे) आहे आणि आपण जेथे आहोत तेथे त्याच्या दयेच्या कारणामुळे आहोत. आपण कशालाही पात्र नाहीत.
फारच प्रामाणिकपणे मी म्हणत आहे, कधीकधी मी सुद्धा अजूनही क्षमेच्या बाबतीत फारच संघर्ष करतो परंतु वरील पाऊले मला इतकी साहाय्यकारक अशी आहेत आणि म्हणून मी तुम्हांला ते सांगण्याचा विचार केला आहे. कृपा करून माझ्यासाठी दररोज प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा.
प्रार्थना
कृपा करून प्रार्थनेचे प्रत्येक मुद्दे वारंवार म्हणत राहा जोपर्यंत तुम्हाला मोकळे वाटत नाही.
धन्यवादीत पवित्र आत्म्या हे, तुझे सामर्थ्य व कृपे द्वारे मला भर. क्षमा करण्यास (त्या व्यक्तीचे नांव घ्या) मला साहाय्य कर. तुझ्याशिवाय मी हे करू शकत नाही.
येशूच्या नांवात, मी (व्यक्तीचे नाव घ्या) मोकळे करीत आहे.
[वरील दोन पाऊले वारंवार करा, आणि तुम्हाला किंवा तुमच्या प्रियजनांना ज्यांनी अतिशय दु:खविले आहे त्यांच्यासाठी असे करा.]
पित्या, येशूच्या नांवात, माझे डोळे उघड की जसे तू त्याला/तिला पाहतो तसे मी त्याला/तिला (त्यांचे नाव घ्या)पाहावे, कारण मी तुझे खरे लेकरू आहे. मजवर दया कर.
मी (त्याचे नाव घ्या) क्षमा करतो कारण मी विश्वासाने चालतो, आणि भावनांनी नाही. ह्यासाठी खात्रीने परमेश्वर माझा आदर करेल.
Join our WhatsApp Channel

Most Read
● त्याच्या सामर्थ्याचा उद्देश● देवाच्या सान्निध्यासह ओळखीत होणे
● तुमच्या आत्म्याची पुनर्स्थापना
● जीवनाच्या वादळांमध्ये विश्वास ठेवणे
● विश्वासणाऱ्यांचे राजकीय याजकगण
● बोललेल्या शब्दाचे सामर्थ्य
● दिवस ०१: ४० दिवसांचा उपास आणि प्रार्थना
टिप्पण्या