इब्री अध्याय ३ चे ध्येय हे दाखविणे आहे की येशू हा मोशे पेक्षा श्रेष्ठ आहे
म्हणून पवित्र बंधूनो, ज्यांना देवाने बोलाविलेले आहे, त्यांनी येशूविषयी विचार करावा. तो देवाचा प्रेषित (प्रतिनिधी) आणि आमच्या विश्वासाचा मुख्य याजक आहे. (इब्री ३:१)
आपल्याला असे म्हटले आहे
१. पवित्र बंधुजन
२. स्वर्गीय पाचारणाचे वाटेकरी
ख्रिस्ताला असे म्हटले आहे
१. आपल्या पापकबुलीचा प्रेषित व महायाजक
आपल्या पापकबुलीचा प्रेषित
शब्द "प्रेषित" याचा अर्थ एक जो पाठविलेला. येशूला पित्या द्वारे पाठविले गेले की त्याची ओळख दयावी.
आपल्या पापकबुलीचा महायाजक
"आपल्या पापकबुलीचा महायाजक" हे शेवटले शब्द लक्षात घ्या. त्याचा अर्थ हा की आपल्या पापकबुली मध्ये येशू हा आपला महायाजक असे नोंदलेला आहे. दुर्दैवाने, त्याच्या उलट सुद्धा खरे आहे. जर आपण पापकबुली करीत नाही, तर आपल्याला महायाजक नाही. असे नाही की येशू हा आपला महायाजक राहत नाही, परंतु आपण त्यास तशी सेवा करण्यास संधी दिली नाही.
येशू हा आपल्या पापकबुलीचा महायाजक आहे. जर आपण विश्वासात आपल्या मुखा द्वारे, पवित्र शास्त्रानुसार योग्य घोषणा करतो, तर मग येशूने स्वतःला कर्तव्यबद्द असे केले आहे हे पाहण्यास की आपल्याला पुढे कधीही लज्जित होऊ दिले जाणार नाही- आपण नेहमीच त्या अनुभवात येऊ जे आपण कबूल करतो. तथापि, जर आपण योग्य घोषणा करण्यात चुकतो, तर मग, ओह, आपण आपल्या महायाजकाच्या मुखास शांत करतो. आपल्या पापकबुली मध्ये अभाव राहणे, त्यास आपल्या वतीने स्वर्गात बोलण्यास काहीही नसते.
ह्या संबंधात, १ योहान २:१ मध्ये येशूला आपला कैवारी सुद्धा म्हटले आहे. शब्द कैवारी हा आधुनिक जगातील शब्द वकील शी बरेच समान आहे. येशू हा कायदेशीर कुशल आहे जो येथे आहे की स्वर्गात आपल्या प्रकरणाची विनंती करावी. त्याने प्रकरण कधीही गमाविलेले नाही. परंतु जर आपण पापकबुली करीत नाही, त्याच्याकडे प्रकरण नाही की त्याची विनंती करावी. म्हणून कोणीही न लढण्या द्वारे प्रकरण आपल्या विरोधात जाते.
जसा मोशे देवाच्या सबंध घरात विश्वसनीय होता तसा तोही त्याला ज्याने नेमिले त्याच्याशी विश्वसनीय होता. (इब्री ३:२)
मोशे च्या जीवनातील विरोधाभास हे आय. एम. हाल्डरमेन द्वारे सुंदररित्या सादर केले गेले आहे. ते लिहितात:
"तो एका गुलामाचा बाळ, व एका राणी चा पुत्र होता. त्याचा जन्म झोपडीत झाला, परंतु तो राजवाडयात राहिला. वारसाने त्यास दारिद्र्य मिळाले होते, पण अमर्यादित संपत्तीचा आनंद घेतला. तो सेनेचा पुढारी व कळपांचा राखणदार होता. तो विरांतील बलाढय होता, सर्व मनुष्यात नम्र होता. त्याचे शिक्षण राजदरबारी झाले आणि त्याचा निवास रानात होता. त्याच्याकडे मिसरचे ज्ञान व लेकराचा विश्वास होता. तो नगरासाठी योग्य होता, पण रानात भटकला. पापाच्या सुखाद्वारे त्याची परीक्षा झाली, व सद्गुणासाठी फार त्रास सहन केला. तो बोलण्यात तुटक होता पण देवाबरोबर बोलला. त्याच्याकडे मेंढपाळाची काठी व असीमिततेचे सामर्थ्य होते, तो फारो पासून व स्वर्गाच्या देवदूतापासून पळून गेला होता. तो नियमशास्त्र देणारा व कृपे चे अग्रदूत होता. मवाब पर्वतावर तो एकाकी मरण पावला, व यहूदा प्रदेशात ख्रिस्ता सह प्रगट झाला. त्याच्या अंत्योदयवेळी कोणीही मनुष्य नव्हते, तरीही परमेश्वराने त्यास पुरले." (आय. एम. हाल्डरमेन)
मोशे व येशू हे दोघेही परमेश्वरास विश्वासू होते पण येशू केवळ पूर्णपणे आज्ञाधारक होता व कधीही पाप केले नाही किंवा अवज्ञा केली नाही.
ही तुलना कोणत्याही प्रकारे देवाचा मनुष्य मोशे ला कमी लेखण्यासाठी प्रयत्न नाही. हे असे नव्हते की मोशे हा वाईट व येशू हा चांगला होता. हे सरळपणे एका मनुष्यामधील फरक होता, एका बाजूने, एक जो विश्वासू होता पण तरीही पापी होता अशक्तपणा व अपयशकडे प्रवृत्ती असलेला होता. याउलट, आपल्याला येशू आहे, जो सिद्ध्पणे विश्वासू, आज्ञाधारक, जरी सर्व क्षेत्रामध्ये परीक्षा झाली होती, तरीही त्याने कधीही पाप केले नाही. (इब्री ४:१५ पाहा)
ज्याप्रमाणे घरापेक्षा घर बांधणाराला अधिक मान असतो, त्याप्रमाणे येशू हा मोशेपेक्षा अधिक सन्मानास पात्र गणला गेला. (इब्री ३:३)
शब्द "देवाचे घर" हा येथे मंदिराचा संदर्भ नाही परंतु सांघिकपणे देवाचे लोक.
येशू हा मोशे पेक्षा अत्यंत गौरवी होता याचे कारण हे की जरी मोशे हा विश्वासू होता आणि देवाच्या तारणाच्या उद्देशा मध्ये एक महत्वाची भूमिका पार पाडली होती, तरीही तो त्या घराचा केवळ हिस्सा होता, त्याचा एक सभासद होता. येशू, याउलट, हा त्या घराचा बनविणारा व घडविणारा होता. मोशे स्वतः देवाच्या लोकातील एक मनुष्य होता. येशू हा ह्या सर्व लोकांचा निर्माणकर्ता, तारणारा व प्रभु आहे. येथे जो अर्थ आहे त्यामध्ये असे कदाचित म्हटले जाऊ शकते की येशू हा मोशे पेक्षा महान आदर व गौरवास पात्र होता कारण येशूने मोशे ला घडविले होते!
कारण प्रत्येक घर बांधणारा कोणीतरी असतो, पण देवाने सर्व काही बांधलेले आहे. (इब्री ३:४)
जरी येशू हा पूर्ण मनुष्य होता, तरी तो पूर्ण देव सुद्धा होता. वचन ३ मध्ये असे म्हटले आहे की येशूने घर बांधले व त्यातील कुटुंबाला पुरवठा करतो व धोका व विनाश पासून त्यांचे संरक्षण करतो.
देवाच्या संपूर्ण घराण्यात मोशे हा सेवक म्हणून अधिक विश्वासू होता, देव च्या गोष्टी पुढील काळात सांगणार होता, त्याविषयी त्याने लोकांना साक्ष दिली. परंतु ख्रिस्त हा पुत्र म्हणून देवाच्या घराण्यात विश्वासू आहे आणि जर आम्ही आपला विश्वास व आशा यांचा अभिमान बाळगतो व धीर धरतो, तर आपणही त्याचे घर आहोत. (इब्री ३:५—६)
"जे पुढे विदित होणार होते त्याविषयीच्या साक्षीसाठी" (इब्री ३:६)
इब्री लोकांस पत्राचे लेखक मोशे व जुन्या करारास कमी लेखत नाही की येशूचे अलौकिकत्व स्थापित करावे.
इब्री ३ मध्ये, मोशेची देवाचा विश्वासू "सेवक" असे योग्यरीत्या प्रशंसा केली आहे. परंतु जुना करार ज्याअंतर्गत तो राहिला ते तात्पुरते होते. त्याचा प्रमुख उद्देश हा काहीतरी महान, अधिक टिकणारे, अधिक गौरवी जे पुढे येणार होते त्याकडे मार्गदर्शन करावे हा होता.
गोष्टी ज्या नंतर बोलल्या जाणार होत्या.
ह्या त्या गोष्टी आहेत ज्या येशूने आपल्यासाठी नवीन करारात आणल्या आहेत.