कारण आम्हालासुद्धा सुवार्ता सांगितली गेली आहे ज्याप्रमाणे ती इस्राएल लोकांना सांगण्यात आली होती (इब्री लोकांस ४: २)
आध्यात्मिक सत्य उघड झाल्याने आवश्यकपणे आध्यात्मिकताच निर्माण होईल अशी शास्वती नाही. लक्षात घ्या, पवित्र शास्त्र सांगते, "शुभवर्तमान हे 'आपल्याला' व 'त्यांना' प्रचार केले गेले, परंतु त्यातून जे बाहेर आले, त्याचा परिणाम हा पूर्णपणे वेगळा होता! हे शक्य आहे एका व्यक्तीला की ख्रिस्ती कुटुंबात जन्म घ्यावा, चर्च ला जावे, व वचन प्रचार केले गेले आहे ते ऐकावे आणि तरीही त्यावर विश्वास ठेवू नये.
परंतु जो संदेश त्यांनी ऐकला त्यापासून त्यांना फायदा झाला नाही कारण तो संदेश त्यांनी ऐकला पण त्यांनी विश्वासाने स्वीकारला नाही. (इब्री लोकांस ४: २)
वचन हे अपयशी झाले नाही कारण त्यामध्ये तेथे काहीतरी चुकीचे होते. वचन हे जिवंत व सामर्थ्यशाली आहे. वचनाने त्यांना काहीही लाभ दिला नाही कारण ते विश्वासासह जोडले गेले नव्हते. हे स्पष्ट करते की का दोन व्यक्ति तोच संदेश ऐकतात आणि एकाला लाभ मिळतो तर दुसऱ्यास काहीही लाभ मिळत नाही.
हे फार विचित्र असे वाटते कारण प्रत्यक्षात ऐकण्याने विश्वासाला वाढविले पाहिजे कारण विश्वास हा देवाचे वचन ऐकण्याने येतो (रोम १०:१७). याचे कारण केवळ ह्या वास्तविकतेमध्ये मिळते की, जर वचन अयोग्यप्रकारे ऐकले गेले किंवा चुकीचा दृष्टीकोन ठेवूनतर मग ते विश्वासाला निर्माण करणार नाही जे बाह्यरित्या आज्ञाधारकपणात प्रगट होते.
परुशी व सदुकी लोकांनी येशूला वचन प्रचार केलेले ऐकले होते परंतु त्याने त्यांच्या आत्मिक मनुष्यत्वात विश्वासाला जन्म कधीही दिला नव्हता कारण त्यांनी गर्व व पूर्वकल्पनेच्या दृष्टीकोनासह तो ऐकला होता.
वचनकेवळ बाळगणे हे याची शास्वती देत नाही की ते लाभदायक होईल. इस्राएली लोकांना त्याचा लाभ झाला नाही कारण दहा आज्ञांच्या दगडी पाट्या ते त्यांच्या बरोबर घेऊन चालले होते. त्याचप्रमाणे, आपल्याकडे सुद्धा आपल्या घरात बायबल हे पडून असते, परंतु त्याचा काही लाभ होत नाही की ते पुस्तक हे आपल्याजवळ असते किंवा पुस्तकाला केवळ स्पर्श करणे किंवा झोपताना त्यास आपल्या उशी खाली ठेवणे.
देवाच्या वचनास विश्वासासह एक करणे याचा अर्थ देवाच्या वचनानुसार चालणे, आणि तुम्ही तुमच्या मुखाने जे बोलता ते देवाच्या वचनानुसार चालण्याचा हिस्सा असावे.
कारण देवाचे वचन जिवंत आणि कार्य करणारे आहे आणि कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा अधिक धारदार आहे. ते आपला आत्मा, जीव, सांधे, आणि मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आहे. ते अंत:करणाचे विचार व कल्पना यांचे परीक्षक असे आहे. (इब्री लोकांस ४: १२)
१. देवाचे वचन हे जिवंत आहे
जिवंत साठी ग्रीक शब्द येथे झोआ आहे, याचा अर्थ 'जिवंत असणे'. बोललेले वचन जीवन आणते व शरीराला चालना देते (रोम ८:११). प्रभु येशूने म्हटले, शरीराद्दरे मनुष्याला जीवन मिळत नाही. परंतु आत्म्याकडून ते जीवन मिळते. (योहान ६:६३)
२. देवाचे वचन हे सामर्थ्यशाली आहे
ग्रीक शब्द हा येथे एनर्जीस असा आहे. तरी अंतरीकदृष्ट्या आम्ही दिवसेंदिवस नवीन होत आहोत. (२ करिंथकरांस ४: १६)
३. वचन हे धार करणारे आहे
धार करण्यास ग्रीक शब्द हा टोम्याटेरॉस आह आहे. ते एकाच फटक्यात कापण्यास सह जुडलेले आहे, थोडे-थोडे तुकडे करणे किंवा करवतीने कापत राहणे नाही.
४. देवाचे वचन हे दुधारी आहे
दुधारी साठी ग्रीक शब्द हा डीस्टोमॉस हा आहे. याचा अर्थ, "दुतोंडी असणे" जसे नदी. ते दोन ठिकाणी उघडे असण्याचा संदर्भ देते. तरवार, यास असे म्हटले जाऊ शकते, ही दोन तोंडी तरवार आहे.
५. देवाचे वचन विभागते
ग्रीक शब्द हा मेरीस्मॉस आहे, याचा अर्थ वेगळे करण्यात कापणे. देवाचे वचन जिवाला आत्म्यापासून वेगळे करते. हे महत्वाचे आहे कारण आध्यात्मिक युद्ध हे जिवामध्ये सुरु होते.
जेव्हा देवाने त्याच्या मुखाद्वारे वचन बोलले, त्याने त्यावर एक पाते ठेवले होते. देवाने जे बोलले आहे, हे जेव्हा आपण बोलतो, आपण दुसरे पाते बनवितो. याचकारणासाठी हीदुधारी तरवार आहे.
बायबलवाचणे व स्मरण करणे हे अत्यंत महत्वाचे आहे, परंतुहे केवळ आपल्या जबाबदारीचा अर्धा भाग आहे. आपल्याला आपले मुख उघडणे व त्याचे वचन बोलण्याची सुद्धा गरज आहे.
तरवार हे दोन्हीही म्हणजे संरक्षण करण्याचे शस्र व उपद्रव करण्याचे सुद्धा शस्त्र आहे. आपणतरवारी चा उपयोग आपल्या स्वतःला अशा गोष्टी जसे शत्रूपासून खोटेपण, फसवणूक, मानसिक आक्रमण व लोभ पासून संरक्षण करण्यात वापरू शकतो.
संरक्षण करणारे शस्त्र म्हणून तरवार प्रतिकार करते, थांबविते, व धमकावते. आपण तरवारीस उपद्रव करणारी म्हणून सुद्धा वापरू शकतो जसे अशा गोष्टींवर आक्रमण करावे जसे आजार, भुताटकीने ग्रस्त होणे आणि देवाची इच्छा पूर्ण करण्यापासून आपल्याला रोखण्याचा शत्रूचा प्रयत्न.
एकउपद्रव करण्याचे शस्त्र म्हणूनवापरले तर, तरवार ही प्रगट करणे, तारण, समेट, नवीकरण व दुरुस्ती करू शकते.
वचनाच्या सामर्थ्यास कधीही कमी लेखू नये. देवाचे वचनाचे सामर्थ्य हे अभिषेकद्वारेयेते जे पवित्र आत्मा त्यावर ठेवते-आपल्याकडून कोणत्याही प्रयत्नाने नाही यापेक्षा जे रीमा वचन तो आपल्याला देतो ते बोलणे आहे.
सामर्थ्य व अभिषेक हा वचनाच्या गुणात आहे, प्रमाणात नाही.
केवळ १० शब्द बोलण्याने येशूने पक्षघाती व्यक्तीला बरे केले (मत्तय ९:६).
मृत्युपासून उठविण्यासाठी त्याने केवळ सहा शब्द बोलले (मार्क ५:४१).
पाच शब्द बोलण्याने, येशूने कोढी ला बरे केले (मत्तय ८:३).
केवळ दोनच शब्द बोलण्याने, बाहेर ये! येशूने असंख्य भूतांना बाहेर घालवून दिले (मत्तय ८:३२).
म्हणून, ज्याअर्थी आम्हाला येशू देवाचा पुत्र हा महान मुख्य याजक लाभला आहे व जो स्वर्गात गेला आहे, असा जो विश्वास आपण गाजवितो तो अखंडपणे भक्कम धरू या. ( इब्री लोकांस ४: १४)
शब्द कबुली देणे हे नवीन कराराच्या मूळ ग्रीक शब्द पासून घेतले आहे, त्याचा अर्थ, 'ते जसे आहे तसेच बोलावे.
कबुली देणे याचा मूळ अर्थ हा, त्यामुळे, हा"ते जसे आहे तसेच बोलावे"आहे. पवित्र शास्त्राच्या संदर्भात, पापकबुली चा अर्थ हा आहे की आपण तेच बोलावे जे परमेश्वर बोलत आहे. आपण आपल्या मुखातील वचनास देवाच्या मुखातील वचनाबरोबर एक करतो.
म्हणून आपण त्याच्या कृपेच्या सिंहासनाजवळ ठाम निर्धाराने जाऊ या. (आपण पाप्यांसाठी देवाच्या अपार कृपेचे सिंहासन, यासाठी की, आमच्या गरजेच्या वेळी साहाय्य मिळावे म्हणून [आपल्या चुकांसाठी] आम्हाला दया व कृपा प्राप्त व्हावी. [योग्य साहाय्य, योग्यवेळी साहाय्य, हे केवळ तेव्हा येते जेव्हा त्याची आपल्याला गरज असते] (इब्री ४:१६)
ही ती दया आहे ज्याची आपल्याला गरज असते जेव्हा आपण चुकतो; जेव्हा आपण पाप करतो. जोपर्यंत आपण योग्य करीत आहोत, आपण न्यायाद्वारे तारले जाऊ शकतो.