इब्री अध्याय ७ मध्ये येशु ख्रिस्ताचे याजकपद अहरोनाच्या याजकपदापेक्षा श्रेष्ठ आहे याची सत्यता दिलेली आहे , कारण “मलकीसदेकाची आज्ञा” “लेवीच्या आज्ञेपेक्षा” श्रेष्ठ आहे.
हा मलकीसदेक शालेमाचा राजा होता. आणि तो सर्वोच्च देवाचा याजक होता. (इब्री लोकांस ७:१)
मलकीसदेक हा राजा आणि याजकही होता. जुन्या करारात, नियमशास्त्र दिले गेल्यानंतर, दोन्ही अधिकारपद कधीही एकत्रित केले गेले नाहीत - ते दोन स्वतंत्र अधिकारपद होते.
यहुदाचा राजा उज्जीया एक अशा व्यक्तींचे उदाहरण आहे ज्याने दोन अधिकारपद एकत्र करण्याचा प्रयत्न केला, आणि त्यामुळे कुष्ठरोग होऊन त्याबद्दल दंड भरला. २ इतिहास २६:१६-२१ ही वचने आपल्याला संपुर्ण कथा सांगतात.
आणखी एक व्यक्ती ज्याने राजा आणि याजक या दोन्ही अधिकारपदाला एकत्रित करण्याचा प्रयत्न केला तो म्हणजे शौल- त्याला प्रभुने नाकारले आणि आपले राज्य त्याने गमावले. १ शमुवेल १३:८-१४ ही वचने आपल्याला त्याबद्दल सांगतात.
व अब्राहामाने आपल्या सर्वस्वाचा दहावा भाग त्याला (मलकीसदेकाला) दिला. मलकीसदेकाच्या नावाचा अर्थ “नीतिमत्त्वाचा राजा” त्याचप्रमाणे तो शालेमाचा राजा असल्याने त्याचा अर्थ “शांतीचा राजा” असा होतो. (इब्री लोकांस ७:२)
“मलकीसदेक” नावाचा अर्थ इब्री भाषेत “धार्मिकतेचा राजा” किंवा “न्यायाचा राजा” असा आहे. सालेम शब्दाचा अर्थ “शांती” असा आहे (इब्री शब्द शालोम), म्हणून मलकीसेदेक हा “शांतीचा राजा” तसेच “धार्मिकतेचा राजा” आहे.
“धार्मिकता” आणि “शांती” हे शब्द पवित्र शास्त्रात सहसा एकत्र आढळतात.
तो चांगलुपणा कायमची शांती आणि सुरक्षितता आणील. ( यशया ३२:१७)
देवाचे खरे प्रेम त्याच्या भक्तांना भेटेल. चांगुलपणा आणि शांती त्यांचे चुंबन घेऊन त्यांचे स्वागत करील. (स्तोत्रसंहिता ८५: १०)
खरी शांती केवळ धार्मिकतेच्या आधारावरच अनुभवली जाऊ शकते.
जर वधस्तंभावर प्रभु येशू ख्रिस्ताचे काम पूर्ण झाले नसते तर, धार्मिकता आणि शांती यासाठी ““ एकमेकांचे चुंबन” घेणे शक्य झाले नसते.
मलकीसदेकाने अब्राहामाकडून दशमांश घेतला.
व अब्राहामाने आपल्या सर्वस्वाचा दहावा भाग त्याला (मलकीसदेकाला) दिला. (इब्री लोकांस ७:२)
हे स्पष्टपणे सांगते की दशांश देणे मोशेपासून आले नाही. नियमशास्त्र देण्याच्या खुप अगोदपासून अब्राहाम दंशांस देत असे.
मलकीसदेकाचे आईवडील किंवा त्याचे पूर्वज, त्याचा जन्म किंवा मृत्यूची नोंद आढळत नाही. देवपुत्राच्या प्रतिमेशी तो हुबेहूब मिळताजुळता असल्यामुळे तो देखील अनंतकाळासाठी याजकच राहणार आहे. (इब्री लोकांस ७:३)
जुन्या करारामध्ये त्याच्या वंशावळीची (“कुळ”) कोणतीही नोंद नाही, आणि हे लक्षणीय आहे कारण जुन्या करारातील बहुतेक महान व्यक्तींच्या वंशजांची ओळख दिलेली आहे. याजकांनी आपले कुळ सिद्ध करण्यास सक्षम असणे महत्वाचे होते (पाहा एज्रा २:६१–६३; नहेम्या ७:६३–६५). अशा प्रकारे, तो प्रभु येशू ख्रिस्ताचे, देवाच्या सनातन पुत्राचे चित्र आहे.
मलकीसदेकाच्या मृत्यूचा कोणताही अहवाल नसल्यामुळे, जोपर्यंत नोंदनीचा प्रश्न आहे, असे दिसते की मलकीसदेक अजूनही याजक व राजा म्हणून सेवा करित आहे. ह्या आणखी एका मार्गामध्ये तो देवाच्या सनातन पुत्रासारखा आहे.
यावरून तुम्ही पाहता की, मलकीसदेक किती महान पुरुष होता! मूऴ पुरुष अब्राहाम यानेसुद्धा आपल्या लुटीतील दहावा भाग त्याला दिला. (इब्री लोकांस ७:४)
मलकीसदेकाला दशांश देताना आणि आशीर्वाद घेत असताना, अब्राहम या याजकीय राजाच्या महानतेची पुष्टी करतो.
आणि लेवीचे वंशज जे याजक झाले त्यांनी मोशेच्या नियमशास्त्रातील आज्ञेप्रमाणे लोकांकडून (आपल्या सहोदरांकडून), जरी ते अब्राहामाचे वंशज होते तरी, दशांश गोळा करावा. (इब्री लोकांस ७:५)
लेवी वंशातील याजकांना इस्राएल लोकांकडून आज्ञा म्हणून दशांश मिळाला. अब्राहामाने स्वेच्छेने मलकीसदेकाला दशांश दिला. या गोष्टीमुळे असे होते की मोशेने संस्थापित केलेल्या याजकांना इस्त्राएलाद्वारे पगार म्हणून दिल्या जाण्याऱ्या दानापेक्षा अब्राहामाने मलकीसदेकाला दिेलेले दान श्रेष्ठ दान होते.