खास्द्यांच्या सैन्याने त्यांचा पाठलाग करून यरीहोच्या मैदानातसिद्कीयास गाठीले; त्यांनी त्याला पकडून हमाथ प्रांतातले रिब्ला येथे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याजपुढे आणिले; त्याने त्याची शिक्षा ठरविली. (यिर्मया ३९:५)
यरुशलेम ते यरीहो हे अंतर जवळजवळ २५ किमी आहे.
खास्द्यांच्या सेनेने सिद्कीयाचा जवळजवळ २५ किमीत्वेषाने पाठलाग केला-तो मोठा पाठलाग होता.
हे पाहून यहूदाचा राजा सिद्कीया व सर्व योद्धे यांनी पलायन केले; ते रात्री राजाच्या बागेच्या वाटेने, दोहो तटामधल्या वेशीने नगराबाहेर निघून गेले. (यिर्मया ३९:४)
राजाची बाग ही शेलह च्या तळ्याजवळ होती (नहेम्याह ३:१५). आपण जेव्हा इस्राएल ला जातो तेव्हा आपण नेहमी यास भेट देतो.
यहेज्केल १२:१२ ही ह्या घटने बद्दल विलक्षण भविष्यवाणी आहे. त्यांच्यातला सरदार अंधार पडला असता खांद्यावर सामान घेऊन निघून जाईल, ते तट फोडून त्यातून ते नेतील; तो आपले मुख झाकील म्हणजे त्याच्या डोळ्यांना भूमि दिसावयाची नाही.
रिब्ला येथेबाबेलच्या राजाने सिद्कीयाच्या डोळ्यांदेखत त्याचे पुत्र वधिले; त्याप्रमाणेच बाबेलच्या राजाने यहूदाचे सर्व मानकरी वधिले; आणखी त्याने सिद्कीयाचे डोळे फोडून त्याला बाबेलास रवाना करण्यासाठी बेड्यांनी जखडीले. (यिर्मया ३९:६-७)
शेवटचे दृश्य जे सिद्कीया ने पाहिले ते त्याच्या पुत्रांचा आणि सर्व प्रतिष्ठित यहूदी लोकांचा वध.
यिर्मया ३९:१५-१८ वर्णन करते, "एबद-मलेख ने तोच पुरस्कार प्राप्त केला जो यिर्मयाला मिळाला होता. जेव्हा यरुशलेम नष्ट झाले तेव्हा दोघांची सुटका झाली होती, कारण परमेश्वर त्यांना सोडवितो जे त्याजवर भरंवसा ठेवतात. राजाच्याइतर सर्व सेवकांप्रमाणे, एबद-मलेखविश्वासाद्वारे वाचविला गेला होता."
चांगले जे तुम्ही परमेश्वराच्या सेवकासाठी करता त्याची आठवण केली जाईल. एबद-मलेख ने यिर्मयाची सुटका खड्यातून व गाळातून केली होती. परमेश्वराने ते आठवले होते आणि त्याचे जीवन वाचविले.
यिर्मयाविषयी तर बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने गारद्यांचा नायक नबूजरदान यास ताकीद केली की, त्याला नेऊन त्याची चांगली व्यवस्था ठेव;त्याला काही इजा करू नको; तो तुला सांगेल तशी त्याची व्यवस्था लाव. (यिर्मया ३९:११-१२)
एक संदेष्ट्याला त्याच्या स्वतःच्या लोकांद्वारे कधीही सन्मान मिळत नाही. बाहेरचे लोक एक खऱ्या संदेष्ट्याला आदर आणि सन्मान देतात. प्रभु येशूने यावर शिक्षण दिले आहे. (योहान ४:४४; लूक ४:१६-३०)