ह्यामुळे पर्जन्यवृष्टि आवरण्यात आली आहे आणि वळवाचा पाऊस पडला नाही; तरी तुझे कपाळ पडले कसबिणीचे; तुला लाज कशी ती ठाऊक नाही. (यिर्मया ३:३)
आध्यात्मिक कारण की पाऊस हा थांबला आहे कारण त्या देशात राहणाऱ्या लोकांच्या पापामुळे.
माझ्या बापा, माझ्या तारुण्यातील मार्गदर्शक तूच आहेस, असे तूं आतापासून मला म्हणणार नाहीस काय? तो नेहमी मनात अढी धरील काय? तो सर्वकाळ ती ठेवील काय? पाहा, तूं असे बोलतेस खरी, तरी कुकर्म करितेस व आपलाच क्रम चालवितेस. (यिर्मया ३; ४-५)
परंतु मध्यस्थी ही त्या विशेष भागाचा इतिहास बदलू शकते.
की तिने जारकर्माच्या स्वैरतेने देश भ्रष्ट केला, तिने काष्ठपाषाणाशी व्यभिचार केला आहे. (यिर्मया ३:९)
मूर्तीपूजाहा आध्यात्मिक व्यभिचार आहे.
आध्यात्मिकजारकर्म हा कोणी त्याच्या जोडीदाराबरोबर अविश्वासू राहण्यासारखे आहे: "इस्राएलाच्या घराण्या, बायकोबेईमान होऊन आपल्या पतीस सोडिते तसे तुम्ही मजशी बेईमान झाला आहा, असे परमेश्वर म्हणतो." (यिर्मया ३:२०)
बायबल आपल्याला सांगते की लोक जे जगाबरोबर मैत्री करण्याचे निवडतात ते"व्यभिचारी लोक" आहेत ज्यांचे देवाबरोबर शत्रुत्व आहे. (याकोब ४:४-५)
केवळ तू आपला दोष पदरी घे, की तू तुझा देव परमेश्वर याच्याविरुद्ध अपराध केला आहे. (यिर्मया ३:१३)
परमेश्वर पापकबुलीच्या विरोधात नाही. त्यास एवढेच पाहिजे की आपण त्याचा स्वीकार करावा. कारण आपल्या संपूर्ण ईश्वरविज्ञानात, आपण हे विसरतो की परमेश्वर हा पिता आहे आणि आपण त्याची लेकरे आहोत.
मी तुम्हांस माझ्या मनासारखे मेंढपाळ देईन; ते तुम्हांस ज्ञान व अक्कल ह्यांनी तृप्त करितील. परमेश्वर म्हणतो तुम्ही वाढून देशात बहुगुणीत व्हाल त्या काळी परमेश्वराच्या कराराचा कोश असे ते यापुढे म्हणणार नाहीत, तो त्यांच्या ध्यानीही येणार नाही, त्यांस तो आठवणारही नाही, ते त्याची खंत करणार नाहीत, आणि तो पुनः बनविणार नाहीत. (यिर्मया ३: १५-१६)
चांगले मेंढपाळ हे नेहमीच मेंढरांची वाढ व उन्नति करितील.