"मी तुला गर्भाशयात घडिले त्यापूर्वी तूं मला ठाऊक होतास, तूं उदरातून निघाल्यापुर्वी मी तुला पवित्र केले, मी तुला राष्ट्रांचा संदेष्टा नेमिले आहे." ( यिर्मया १:५)
यिर्मयाचे पालनपोषण एका ईश्वरीय व याजकीय घरात झाले आणि तरीसुद्धा त्यास परमेश्वराबरोबर स्वतः वैयक्तिकरित्या भेट घ्यावी लागली.
प्रेषित पौलाने सुद्धा त्याच्या स्वतःच्या पाचारणा बाबत अशाच शब्दात विवेचन केले आहे.
तरी ज्या देवाने मला माझ्या मातेच्या उदरातून जन्मल्यापासून वेगळे केले व आपल्या कृपेने बोलाविले, त्याला आपल्या पुत्राला माझ्या ठायी प्रगट करणे बरे वाटले, अशासाठीकी, मी परराष्ट्रीयांमध्ये त्याच्या सुवार्तेची घोषणा करावी. (गलती १:१५-१६)
मग परमेश्वराने उत्तर दिले, "मी बाळ आहे असे म्हणू नको; ज्या कोणाकडे मी तुला पाठवीन त्याजकडे तूं जा व तुला आज्ञापीन ते बोल. त्यांस तूं भिऊ नको; तुझा बचाव करण्यास मी तुझ्याबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो." (यिर्मया १:७-८)
बायबल विज्ञानी म्हणतात की यावेळेस यिर्मया हा जवळ जवळ १७ ते २० वयाचा असेन.कदाचित, ह्या तरुण वयाने त्यास देवाच्या वचनाचे एक चांगले किंवा अधिकारवाचक संदेशवाहक होण्यापासून रोखले असेन.
तेव्हा परमेश्वराने आपला हात पुढे
करून माझ्या मुखास स्पर्श केला, व तो मला म्हणाला,
पाहा, मी आपली वचने तुझ्या मुखात घातली आहेत;
पाहा, उपटण्यास व विध्वंस करण्यास,
नासधूस करण्यास व पाडून टाकण्यास,
बांधण्यास व लागवड करण्यास मी तुला आजराष्ट्रांवर व राज्यांवर नेमिले आहे. (यिर्मया १: ९-१०)
जेव्हा परमेश्वराने यशया ला त्याच्या संदेष्टाच्या पाचारणा वेळी स्पर्श केला, तसा त्याने यिर्मयाला सुद्धा स्पर्श केला. (यशया ६ वाचा.)
ते तुजबरोबर सामना करितील पण तुजवर त्यांचा वरचष्मा होणारनाही; कारण तुझा बचाव करण्यास मी तुजबरोबर आहे, असे परमेश्वर म्हणतो. (यिर्मया १:१९)
परमेश्वराकडून एक सुंदर आश्वासन हे यिर्मयाच्या जीवनात पूर्ण झाले. यिर्मयाच्या शत्रूंचा त्याच्यावर वरचष्मा झाला नाही, आणि त्याने ४० वर्षेमोठया संकटातूनदेवाचीउत्कृष्ट सेवा केली.
आपल्याला सुद्धा ह्या आश्वासनावर दररोज दावा केला पाहिजे.