प्रेषित होण्याकरिता बोलाविण्यात आलेला, देवाच्या सुवार्तेकरिता वेगळा केलेला, ख्रिस्त येशूचा दास पौल ह्याच्याकडून: ह्या सुवार्तेविषयी देवाने पवित्र शास्त्रात आपल्या संदेष्ट्यांच्या द्वारे पूर्वीच वचन दिले होते, ही सुवार्ता त्याचा पुत्र येशू आपला प्रभु ह्याच्याविषयी आहे. तो देहदृष्टया दावीद वंशात जन्मला. (रोम १:१-३)
प्रारंभीच्या दिवसात, पत्र लिहिणारे लेखक हे स्वतःची नावाने ओळख करून देत असे जेव्हा ते पत्र लिहित आहेत. त्या दिवसांत पौल नावाचे अनेक लोक हे असतील आणि म्हणून पत्राचे अधिकृतपण बळकट करण्यासाठी, पौल त्याची ओळख स्पष्ट करतो.
पौलाची ओळख ही पुढील प्रमाणे आहे
१. तो येशू ख्रिस्ताचा बंधनात असलेला दास आहे
शब्द"बंधनातील सेवक" याचा शब्दशः अर्थ 'दास' असा आहे. पौलाने अक्षरशः व स्वेच्छेने स्वतःला ख्रिस्त व त्याच्या कार्यासाठी दास असे करून ठेवले होते.
२. तो प्रेषित होता
शब्द'प्रेषित" म्हणजे'एक जो एका आदेश सह अधिकारा द्वारे पाठविलेला आहे.'
३.देवाच्या सुवार्तेकरिता वेगळा केलेला
पौल हा शुभवर्तमानाचा प्रचारक होता. शुभवर्तमान शब्दश: हे सुवार्ता आहे.
सुवार्ताकी ख्रिस्त आपल्या पापांसाठी मरण पावला, पुरला गेला आणि पुन्हा उठला, आणि आता तो सर्वांचे तारण करू शकतो जे त्याच्यावर विश्वास ठेवतात. (१ करिंथ १५:१-४)
४. तो परराष्ट्रीयांसाठी प्रेषित असा होता.
हे त्याच्या द्वारे आपल्याला कृपा [देवाची कृपा आपल्या कृत्यांनी नव्हे]व प्रेषितपद मिळे; अशासाठीकी, त्याच्या नांवाकरिता सर्व राष्ट्रांमध्ये विश्वासाने आज्ञापालन व्हावे आणि सर्व राष्ट्रांमध्ये त्याच्या खातर सर्वांना शिष्य करावे.
शब्द मिशनरी हा 'प्रेषित' साठीलैटिन शब्द आहे-एक जो पाठविलेला.
पवित्रतेचा आत्मा
पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टीने तो मृतांच्या पुनरुत्थानाच्या द्वारे पराक्रमाने देवाचा पुत्र अस निश्चित ठरला. (रोम १:४)
पवित्र आत्मा ज्याचा येथे संदर्भ दिला आहे तो "पवित्रतेच्या आत्म्याचा" आहे.
देवाला पाहिजे आणि तो आपल्याला उपदेश देतो की आपण पवित्र असावे (१ पेत्र १:१५-१६). तथापि, परमेश्वर आपल्याला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरल्या शिवाय ज्याची आपल्याला गरज आहे तसे करावे म्हणून कधीही सांगणार नाही. एक अपवित्र आत्मा आपल्याला कधीही पवित्र करू शकणार नाही. म्हणून देवाने त्याच्या पवित्रतेचा आत्मा आपल्या अंत:करणात पाठविला आहे की आपल्यामध्ये एक पूर्ण व सर्वांगीण कार्य करावे.
म्हणून पवित्रते वाढण्यासाठी, आपल्याला जे सर्व काही करावयाचे आहे ते हे की पवित्र आत्म्यासह संगती करावी आणि याची खात्री करावी की आपण प्रतिदिवशी त्याच्या आत्म्याने भरावे. पवित्रता ही काहीतरी नाही जी तुम्ही आणि मी करतो. हे त्याचे आपल्यामध्ये कार्य आहे.
Chapters