म्हणून आपण विश्वासाने नीतिमान ठरविलेले आहो म्हणून आपणांला आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाबरोबर शांति आहे. (रोम ५:१)
आपण विश्वासाने नीतिमान ठरविलेले आहो
"नीतिमान ठरविलेले आहो"-हा शब्द अनेकजण पूर्णपणे समजत नाही. मुलभूतरित्या, त्याचा अर्थ "की कोणाला नीतिमान मानावे". त्याचा अर्थ, "मानने, हिशोबदेही करणे, न्याय करणे, किंवा नीतिमान असे पाहणे." याचा अर्थ नीतिमान करणे नाही! याचा अर्थ अवश्य हा आहे की आपल्याशी तसा व्यवहार केला जात आहे जसे काही आपण नीतिमान आहोत.
नीतिमान ठरविणे याचा अर्थ हा नाही की परमेश्वरास आपल्या पापा संबंधी ठाऊक नाही. याचा अर्थ अवश्य हा आहे की आपण पापी असताना सुद्धा, परमेश्वर आपल्याशी तसा व्यवहार करतो जसे काही आपण पापी नाहीत. जरी आपण अनीतिमान व दुष्ट असे आहोत, परमेश्वर आपल्याशी असा व्यवहार करतो जसे काही आपण नीतिमान व शुद्ध आहोत जसे तो स्वतः आहे.
हे कसे शक्य आहे?
हे घडते कारण जेव्हा प्रभु येशू वधस्तंभावर मरण पावला, त्याने आपल्या सर्व पापांची किंमत भरली आहे. मग जेव्हा आपण त्यास आपला तारणारा असे स्वीकारतो, परमेश्वर आपल्याला ख्रिस्ताची नीतिमत्ता देतो, २ करिंथ ५:२१. नीतिमान ठरविले जाणे याचा अर्थ हा नाही की आपण सिद्ध आहोत, याचा केवळ अर्थ हा आहे की परमेश्वर आपल्याला तसे पाहतो जसे काही आपण तसे आहोत!
आपल्याला आपल्या प्रभु येशू ख्रिस्ता द्वारे देवाबरोबर शांति आहे
येथे तीन प्रकारची शांति आहे
देवाची शांति – शांति सर्व समजापलीकडे आहे
देवा मध्ये शांति – शांति जी मला मिळते त्याच्या उपस्थितीमध्ये, त्यामुळेच मी उपासक आहे.
देवाबरोबर शांति – तो दैहिक स्वभाव जो देवाबरोबर शत्रुत्वात होता आता येशूच्या रक्ता द्वारे देवाबरोबर शांति झाला आहे.
आपण ज्या कृपेमध्ये आहो, त्यात आपला प्रवेशही त्याच्या द्वारे विश्वासाने झाला आहे; आणि आपण देवाच्या गौरवाच्या आशेचा अभिमान बाळगतो. (रोम ५:२)
कृपा ही प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला उपलब्ध आहे. तथापि, त्यासाठी विश्वासाची कृती लागते की ख्रिस्ता मध्ये जी कृपा आपल्याला दिली आहे त्यापर्यंत जावे. विश्वास हा कृपे पर्यंत प्रवेश मिळविण्याची तुमची किल्ली आहे, अद्भुततेकडे व ते सर्व काही जे प्रभु येशूने तुमच्यासाठी बाजूला ठेवले आहे.
इतकेच नाही, तर संकटाचाही अभिमान बाळगतो, कारण आपल्याला ठाऊक आहे की, संकटाने धीर (संयम, सहनशीलता), धीराने (संयम, सहनशीलता) शील व शीलाने आशा निर्माण होते. (रोम ५:३-४)
आपल्या संकटासाठी येथे उद्देश आहे, पवित्र शास्त्र आपल्याला सांगते की संकटे ही आपल्यामध्ये संयम, सहनशीलता विकसित करतील. आणि संयम सहनशीलता ही आपल्या चारीत्र्यास शुद्ध करेल आणि सिद्ध झालेले चारित्र्य आपल्याला पुन्हा एकदा आशे कडे नेते.
आपण संकटात आनंद करू शकतो, हे जाणून की दुष्टता जे काही करते, आपण विजय मिळवू व विजयाचे यश उपभोगू.
आणि आशा लाजवीत नाही; कारण आपणांला दिलेल्या पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्या अंत:करणात देवाच्या प्रीतीचा वर्षाव झाला आहे. (रोम ५:५)
आपल्यासाठी देवाच्या प्रीति विषयीच्या शंकेसाठी उपाय हा वादविवाद नाही परंतु त्याचा अनुभव आहे. परमेश्वर देवाच्या प्रीतीचा अनुभव देतो. देवाच्या प्रीतीचा हा अनुभव हा पवित्र आत्म्याद्वारे आपल्या अंत:करणात ओतला गेला आहे.
नीतिमान मनुष्यांसाठी कोणी मरणारा विरळा; चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करील; परंतु देव आपणांवरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की, आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणांसाठी मरण पावला. (रोम ५:७-८)
लोकांची एक कथा जी इतरांसाठी त्याचे जीवन बलिदान करतात ते आरएमएस टायटायनीक कडून येते. ३५ किंवा जास्त इंजिनिअर कर्मचारी हे आरएमएस टायटायनीक वर होते की इलेक्ट्रिक पॉवर सांभाळावी जेव्हा ती बुडत होती.
आतील दिवे जळते ठेवून, त्यांनी प्रवासी जनांची भीति कमी करण्याचा प्रयत्न केला त्याचवेळेस दूरसंचार अधिकाऱ्यास समर्थ केले की जवळपासच्या जहाजाला संकटाची सुचना दयावी. हे इतिहासात अनेक वेळा घडले आहे.
तथापि, इतिहासात एकही पुरुष किंवा स्त्रीचे उदाहरण नाही की त्यांच्या शत्रू साठी त्यांचे जीवन बलिदान करावे. आणि तरीही तेच प्रत्यक्षात परमेश्वराने केले. (रोम ५:१०)
एका माणसाच्या द्वारे पाप जगात शिरले आणि पापाच्या द्वारे मरण शिरले; आणि सर्वांनी पाप केल्यामुळे सर्व माणसांमध्ये अशा प्रकारे मरण पसरले. (रोम ५:१२)
जसे आपण आपल्या आई-वडिलांचे गुण आपल्या स्वतंत्र कृती वीणा वारशाने मिळवितो. तसेच आपण आपला पापमय स्वभाव सुद्धा आदामा कडून वारशाने प्राप्त करतो. दावीदाने लिहिले, "पाहा, मी जन्माचाच पापी आहे; माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे." (स्तोत्र ५१:५)
आता, याचा हा अर्थ नाही की त्याच्या आईने त्या अनैतिकपणे जन्माला घातले; त्याऐवजी, त्याच्या आईने तो पापमय स्वभाव तिच्या आईवडिलांकडून वारशाने मिळविला होता, आणि त्यांनी त्यांच्या आई-वडिलांकडून आणि असेच पुढे होते गेले.
Chapters