पवित्रशास्त्राचा उद्देश
धीराच्या व शास्त्रापासून मिळणाऱ्या उत्तेजनाच्या योगे आपण आशा धरावी म्हणून जे काही शास्त्रांत पूर्वी लिहिले ते सर्व आपल्या शिक्षणाकरिता लिहिले. (रोम १५:४)
लिहिलेल्या पवित्रशास्त्राचा उद्देश
१. आपल्या शिकण्यासाठी
संपूर्ण जुना करार हा आपल्या शिकण्यासाठी व आपल्याला मार्गदर्शन मिळण्यासाठी लिहिले गेले आहे म्हणजे आपण त्याच चुका करू नये ज्या त्यांनी केल्या. कोणीतरी म्हटले आहे, "एक हुशार व्यक्तित्याच्या चुकांकडूनशिकतो,परंतु खरा बुद्धिमान व्यक्ति दुसऱ्याच्या चुकांकडून शिकतो." त्यांच्याकडून
शिकण्याद्वारे तुम्हाला व मला त्याच चुका करावयाच्या नाहीत.
२. पवित्रशास्त्र आपल्यात संयम निर्माण करते
संयमहे पवित्रशास्त्राची निर्मिती आहे. जर संकटे संयम निर्माण करतात, तर प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीने संयमी राहिले पाहिजे कारण ह्या पृथ्वीवर प्रत्येक जनांनी एका वेळी किंवा इतर वेळी संकटांचा सामना केला आहे. संयम हा देवाच्या वचनाद्वारे येतो. तथापि, समस्या आपल्याला प्रेरणा देतात की आपला संयम कार्यान्वित करावा किंवा वापरावा आणि त्याद्वारे आध्यात्मिकदृष्टया प्रबळ व्हावे.
३. पवित्र शास्त्र आपल्यालासांत्वन देते
ह्या सध्याच्या कोविड-१९ महामारी दरम्यान, लोकभावनांच्या अनेक पहलूंचा अनुभव करीत आहेत आणित्यामुळे त्यांना सांत्वनाची गरज आहे.
उपदेशक ७:७ म्हणते, (एनकेजेवी भाषांतर) "जुलूमबुद्धिमान मनुष्याच्याविचारांना नष्टकरते."
उपदेशक ७:७ म्हणते, (केजेवी भाषांतर) "जुलूमबुद्धिमान मनुष्याच्या शहाणपणाला वेडे करते."
व्यक्ति हा जसे आचरण करीत आहे त्यामध्ये सांत्वन हा खूप फरक करू शकतो. सांत्वन मिळविण्याच्या त्यांच्या शोधात अनेकजण हे मद्य, नशा आणि सांत्वन मिळविण्याच्या इतर गोष्टींकडे वळतात. सांत्वन मिळविण्यासाठी देवाने-निश्चित केलेला एक सर्वात सामर्थ्यशाली मार्ग हा देवाचे वचन वाचणे होय.
ह्या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या आणि जे आपण युगाच्या समाप्तीप्रत येऊन पोहचलो आहोत त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत. (१ करिंथ १०:११)
पवित्र शास्त्राचा उद्देश
१. आपल्यासाठी उदाहरण म्हणून
२.आपल्यासाठी बोध म्हणून, एक इशारा
एक बुद्धिमान मनुष्य अनुभवातून शिकत नाही, शिकण्याचातो एक वेदनामय मार्ग आहे. तो इतरांचे यश व अपयश याकडून शिकतो.
प्रत्येक परमेश्वरप्रेरित शास्त्रलेख सद्बोध, दोष दाखविणे, सुधारणूक, नीतिशिक्षण ह्यांकरीता उपयोगी आहे. ह्यासाठीकी, देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा. (२ तीमथ्यी ३:१६-१७)
संपूर्ण पवित्र शास्त्र हे देवाच्या प्रेरणेने दिले गेले आहे.
आणि ते लाभदायक आहे.
१. सिद्धांत साठी लाभदायक
२. दोष दाखविण्यासाठी
३.सुधारणूक साठी
४. नीतिशिक्षण करिता शिकवण
ह्यासाठीकी, देवाचा भक्त पूर्ण होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सज्ज व्हावा.
परमेश्वर पवित्र शास्त्राचा उपयोग करतो की त्याच्या लोकांना तयार व सज्ज करावे कीप्रत्येक चांगले कार्य करावे.
जोडप्या साठी प्रार्थना
आता.... धीर व उत्तेजन देणारा देव असे करो की, ख्रिस्त येशूप्रमाणे तुम्ही परस्पर एकचित्त व्हावे. (रोम १५:५)
दानार्पण
परराष्ट्रीय हेच अर्पण पवित्र आत्म्याने शुद्ध होऊन मान्य व्हावे. (रोम १५:१६)
दानार्पणा बद्दल दोन गोष्टी
१. दानार्पण हे मान्य असले पाहिजे
२. ते पवित्र आत्म्याने शुद्ध केलेले असावे.
प्रार्थना ह्या यावर आधारित आहेत
जिवंत परमेश्वराच्या पवित्र आत्म्या ये, हे दानार्पण शुद्ध कर (रोम १५:१६)
जिवंत परमेश्वराच्या पवित्र आत्म्या ये, मला शुद्ध कर (रोम १५:१६)
जिवंत परमेश्वराच्या पवित्र आत्म्या ये, हेस्थान शुद्ध कर (रोम १५:१६)
ख्रिस्ताने माझ्या हातून न घडविलेले काही सांगण्याचे धाडस मी करणार नाही; तर परराष्ट्रीयांनी आज्ञापालन करावे म्हणून त्याने माझ्या शब्दांनी व कृतींनी, चिन्हे व अद्भुते ह्यांच्या सामर्थ्याने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने जें जें घडविले तेच मी सांगतो. (रोम १५: १८)
सरळ भाषेत म्हटल्यास, याचा अर्थ हा आहे की तुम्ही जर प्रार्थना करीत नाही तर प्रार्थने वर प्रचार करू नका.
जर तुम्ही उपास करीत नाही तर उपास वर प्रचार करू नका.
जरू तुम्ही दान देत नाही तर दानार्पणा वर प्रचार करू नका.
आता तुम्हाला माहीत आहे कीका अनेक लोक प्रार्थना, उपास व दानार्पणा विरुद्ध प्रचार करतात- हे ह्या कारणासाठी की ते सरळपणे ह्या गोष्टी करीत नाहीत आणि म्हणून ह्या विषयांवर प्रचार करू शकत नाहीत. म्हणून ते याच्या विरोधात प्रचार व शिकवण देतात.
[जरी माझा प्रचार हा ह्याबाबतीत असला] चिन्हे व अद्भुतेच्या सामर्थ्या सह [आणि त्या सर्व बाबतीत], आणि पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने. [तर परिणाम] यरुशलेमेपासून सुरु करून, इल्लूरिकमापर्यंत मी ख्रिस्ताची [मशीहा] सुवार्ता [विश्वासुपणे, कार्यान्वित, पूर्ण करून, पूर्ण शुभवर्तमान वाहूननेले आहे] पूर्णपणे सांगितली आहे. (रोम १५:१९ ऐम्पलीफाईड)
प्रेषित पौल हा देवाच्या कृपेचीसुवार्तेचा प्रचार करण्यासाठी मुख्यतः ओळखला जातो परंतु त्याचा प्रचार व शिकवण ही चिन्हे व अद्भुतेच्या सामर्थ्यासह जुडलेला दिसतो.
परिणाम काय होता?
यरुशलेमेपासून सुरु करून, इल्लूरिकमापर्यंत त्याने ख्रिस्ताचीसुवार्तापूर्णपणे सांगितली.
त्यामुळे, प्रेषितपौलकेवळ प्रचार करणे आणि पूर्ण सुवार्ता सांगणे यामध्ये फरक करीत आहे. एका सेवकाने सुवार्ता ही पूर्णपणे सांगितलेली नाही जोपर्यंत ते चिन्हे व अद्भुतेशी जुडलेले नाही. हे कदाचित येथून 'पूर्ण सुवार्ता' हा वाक्प्रचार आला असेन.
दानार्पणा वर सामर्थ्यशाली वचन
त्यांना बरे वाटले होते खरे आणि ते त्यांचे ऋणी आहेत; कारण जर परराष्ट्रीय त्यांच्या आध्यात्मिक गोष्टींचे अंशभागी झाले आहेत, तर ऐहिक गोष्टींत त्यांची सेवा करण्यास ते त्यांचे ऋणी आहेत. (रोम १५:२७)
पवित्र आत्म्या द्वारे देवाच्या प्रकारची प्रीति ही दिली जाते
बंधुजनहो, आपल्या प्रभु येशू ख्रिस्तामुळे व आत्म्याच्या द्वारे [दिल्याने]निष्पन्न झालेल्या प्रेमामुळे मी तुम्हांला विनंती [दीनपणे] करितो की माझ्यासाठी देवाजवळ माझ्याबरोबर आग्रहाने प्रार्थना करा.(रोम १५:३०)
म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या प्रीतीच्या चालण्यात थंड होता तेव्हा पवित्र आत्म्यासह संगती सुरु करा आणि त्यास विनंती करा की त्याच्या प्रीतीने तुम्हाला भरून टाकावे. (रोम ५:५)
आणि जेव्हा मी तुम्हांकडे येईन तेव्हा ख्रिस्ताच्या आशीर्वादाने भरलेला असा येईन हे मला ठाऊक आहे. (रोम १५:२९)
तुम्ही एखादया ठिकाणी जात नाही आणि तयारी करीत नाही.
तुम्ही तयारी करून त्या ठिकाणी जाता. अर्थातच, तुम्ही तेथे जावे आणि तेथे प्रार्थने मध्ये वेळ घालवावा परंतु मूळ बोध हा, तुम्ही तेथे तयारी करून जाता. जाऊ नका जर तुम्ही तयारी केलेली नाही.
रोम १५:२९ वर आधारित प्रार्थना
पित्या, आम्ही प्रार्थना करतो की जेव्हा पास्टर मायकल यूएई [किंवा इतर कोठेही]येथे जातील, त्यांनी ख्रिस्ताच्या सुवार्तेच्या आशीर्वादा मध्ये भरून यावे. (रोम १५:२९)
Chapters