जी मंडळी त्यांच्या घरी जमत असते तिलाही सलाम सांगा [माझी आठवण करा] (रोम १६:५)
प्रारंभीचे चर्च कॅथड्रल मध्ये जमत नसत परंतु घरात. अर्थातच, कॅथड्रल व प्रेक्षाग्रह मध्ये जमणे हे चुकीचे नाही परंतु चर्च हे घरा मध्ये सुद्धा सुरु करता येते.
पहिले चर्च पेंटेकॉस्टच्या दिवशी घरात सुरु झाले (प्रेषित २). प्रारंभीचे इतर चर्च सुद्धा घरामध्ये जमत असत. उदाहरणार्थ, अक्विल्ला व प्रिस्का यांच्या घरात चर्च होत होते (१ करिंथ १६:१९). फिलेमोन च्या घरात सुद्धा चर्च होत होते (फिलेमोन १:२). रोम १६ मध्ये अनेक ठिकाणी जे घरात चर्च होत होते त्याविषयी उल्लेख केलेला आहे.
माझा नातेवाईक हेरोदियोन ह्याला सलाम सांगा. नार्किसाच्या घरातील जी माणसे प्रभुमध्ये आहेत त्यांना सलाम सांगा. (रोम १६:११)
ग्रीक पुराणकथे मध्ये पाण्याचे देव सेफीसास व निम्फ लिरिओपे यांचा तो पुत्र होता. तो गर्विष्ठ होता, त्यामुळे ते जे त्याच्यावर प्रीति करीत होते त्यांचा त्याने अनादर केला. हे वचन आपल्याला स्पष्टपणे सांगते की प्रेषित पौलाने धर्मपरिवर्तीत लोकांची नावे बदलली नाहीत जरी ती पुराणकथे मधील होती.
असुंक्रीत, फ्लगोन, हर्मेस, पत्रबास, हर्मास ह्यांना व त्यांच्याबरोबर जे भाऊ आहेत त्यांना सलाम सांगा (रोम १६:१४). हर्मेस हा ग्रीक धर्म व पुराणकथे मध्ये खेळाचा देव होता, जो झियोस चा पुत्र होता. हर्मेस ला दूत व देवांना संदेश देणारा असे समजले जात होते. हर्मेस हे ग्रीक देवाचे नाव होते आणि येथे पौल ते नाव पवित्र शास्त्रात लिहित आहे.
आता बंधुजनहो, मी तुम्हांला विनंती करितो की, तुम्हांला जे शिक्षण मिळाले आहे त्याविरुद्ध जे फुटी व अडथळे घडवून आणीत आहेत त्यांच्यावर लक्ष ठेवा आणि त्यांच्यापासून दूर राहा. (रोम १६:१७)
पौलाने हे सांगितले नाही की लोकांबरोबर संपर्क टाळा केवळ त्यांचे सिद्धांत हे वेगळे आहेत. त्याने सांगितले त्यांना टाळा जे सिद्धांतावरून विभाजन व दु:ख देतात.
हे पत्र लिहून देणारा मी तर्तीय तुम्हांला प्रभूमध्ये सलाम सांगतो. (रोम १६:२२)
नाव तर्तीय हे लैटीन मुळापासून आहे आणि त्याचा अर्थ "तिसरा" (strong चा शब्दकोश). पवित्र शास्त्रामध्ये तर्तीय विषयी हाच एक उल्लेख आहे. प्रेषित पौलाने पत्र लिहावयास लावले जे त्यावेळेस तर्तीय ने लिहिले.
आत जे रहस्य गत युगांत गुप्त ठेवले होते, परंतु आता जे प्रगट झाले आहे आणि सर्व राष्ट्रांतील लोकांनी विश्वासाच्या अधीन व्हावे म्हणून सनातन देवाच्या आज्ञेने संदेष्ट्यांच्या लेखांच्याद्वारे त्यांना कळविण्यात आहेल आहे....(रोम १६:२६)
भविष्याच्या सेवेमध्ये तुम्ही कसे वाढू शकता? तुम्ही वचन वाचता व वचन अभ्यास करता व भविष्यात्मक गोष्टी ह्या तुम्हाला प्रगट केल्या जातात. पवित्र शास्त्र हे भविष्यात्मक आहे.
Chapters