परमेश्वर हा नेहमीच बरोबर आहे. (रोम २:२)
माझ्या जीवनात कधी अशी वेळ होती जेव्हा जे काही घडत आहे त्याबद्दल मी देवाला प्रश्न केला होता. परंतु मग एक गोष्ट जी मला कळली ती ही की, "परमेश्वर हा नेहमीच बरोबर आहे."
देवाचा चांगुलपणा तुम्हाला पश्चातापाकडे नेतो. (रोम २:४)
पेत्र प्रभु समोर पालथा पडला आणि म्हणाला, "माझ्यापासून दूर जा, कारण मी पापी मनुष्य आहे. त्याने असे म्हटले जेव्हा त्याने चमत्कारिकरित्या मासे पकडले होते. परमेश्वराची दया ह्या हेतूने आहे की आपल्या पापाकडून आपल्याला वळवावे.
दु:ख सहनाचे भाषांतर अशा प्रकारे बोलते:
तुम्ही हे समजता काय की त्याच्या अमर्याद दयेचीसंपूर्णविपुलता याचा अर्थ तुमच्या अंत:करणाला खेदित करावे व पश्चातापाकडे न्यावे हा आहे. (रोम २: ४)
कारण देवाजवळ पक्षपात नाही. (रोम २:११)
परमेश्वर कोणाचाही पक्षपात करीत नाही. तो अपक्षपाती आहे. काही प्राचीन गुरूंनी शिकविले आहे की परमेश्वराने यहूदी लोकांप्रती पक्षपात दाखविला आहे. त्यांनी म्हटले: "परमेश्वर परराष्ट्रीयांचा न्याय एका नियमाने व यहूदी लोकांचा न्याय दुसऱ्या नियमाने करणार आहे."
म्हणजे ते नियमशास्त्रातील आचार आपल्या अंत:करणात लिहिलेला आहे असे दाखवितात; त्यांच्याबरोबर त्यांची सदसद्विवेकबुद्धीही त्यांना साक्ष देते आणि त्यांचे एकमेकांविषयीचे विचार दोष लावणारे किंवा दोषमुक्त करणारे असे असतात. (रोम २:१५)
प्रत्यक्षात, परराष्ट्रीयांना "त्यांचे नियमशास्त्र त्यांच्या अंत:करणात लिहिलेले आहे" (रोम २:१५). जेथे कोठे तुम्ही जाता, तुम्ही लोकांना त्यांच्या अंतर्मनात बरोबर किंवाचूक ची समज असते हे पाहता, बायबल यास "सदसद्विवेकबुद्धी" असे म्हणते.
तुम्हाला सर्व संस्कृती मध्ये पाप, न्यायाची भीति, आणि पापासाठी प्रायश्चित्त करण्याचा प्रयत्न, आणिजी काही दैवते ज्यांचे भय बाळगत त्यांची भक्ती करावी याबद्दल सदसद्विवेकबुद्धी मिळते.
विश्वासासाठी एक चांगली सदसद्विवेकबुद्धी आवश्यक आहे. चांगल्यासदसद्विवेकबुद्धी शिवाय, आपला विश्वास हा नष्ट होऊ शकतो (१ तीमथ्यी १:१९). एक चांगली सदसद्विवेकबुद्धी आत्मविश्वास निर्माण करते (१ योहान ३:२१; आणि इब्री १०:३५). वाईटसदसद्विवेकबुद्धी आपल्याला दोष देते (१ योहान ३:२०).
ज्या दिवशी देव माझ्या सुवार्तेप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या द्वारे माणसांच्या गुप्त गोष्टींचा न्याय करील त्या दिवशी हे दिसून येईल. (रोम २:१६)
परमेश्वर केवळ सत्यानुसार (रोम२:२), आणि माणसांच्या कृत्यांनुसार (रोम २:६)न्याय करीत नाही, परंतु तो सुवार्तेनुसार"माणसांच्या गुप्त गोष्टींचा" (रोम २:१६) न्याय करतो.
तर मग दुसऱ्याला शिकविणारा तूं स्वतःलाच शिकवीत नाहीस काय? (रोम २:२१)
येथे सिद्धांत हा: जेव्हा तुम्ही दुसऱ्यांस शिकवीत आहात तुम्ही तुमच्या स्वतःला सुद्धा शिकवीत आहात.
कारण जो बाह्यात्कारी यहूदी तो यहूदी नव्हे आणि देहाची बाह्यात्कारी सुंता ही सुंता नव्हे. (रोम २:२८)
प्रारंभीच्या यहूदी लोकांनी अंत:करणाच्या सुंतेकडे दुर्लक्ष केले होते आणि त्यांचे सर्व लक्ष केवळ शारीरिक गोष्टींवर ठेवले होते (१ शमुवेल १६:७). प्रेषित पौल हे स्पष्ट करीत आहे की ही अंत:करणाची अवस्था आहे-शारीरिक नव्हे-जे कोणाला देवाचे लेकरू करिते.
एकव्यक्ति ज्याचे अंत:करण बदलले आहे तो माणसांकडून नव्हे तर देवाकडून प्रशंसा मिळवू पाहतो. (रोम २:२९)
Chapters