तेव्हा परमेश्वराच्या दूताने एका झुडपातूनअग्निज्वालेत त्यांस दर्शन दिले; त्यानेदृष्टी लाविली तो झुडूप अग्नीने जळत असून ते भस्म झाले नाही असे त्यास दिसले. (निर्गम३: २)
झुडूप जळत होते परंतु ते भस्म झाले नाही. देवाचाअग्नी आपल्याला नष्ट करीत नाही- ते आपली बांधणी करते. जगाचाअग्नी हा आपल्याला भस्म करेल.
देवाचा दूत
जेव्हा आपण, "देवाचा दूत"हे वक्तव्य वाचतो, आपण आपले डोळे उघडे ठेवले पाहिजे. अधिकतर वेळा, ते ख्रिस्ताच्या देहाधारणे अगोदरचे दिसणे असते.
शब्द"दूत" म्हणजे"संदेशवाहक", आणि तेदूत संदेशवाहकांनाच केवळ लागू होत नाही परंतु मानवी मनुष्य, आणि स्वयं ख्रिस्ताला सुद्धा. काही वेळेला, 'देवाचा दूत' संज्ञाहे ख्रिस्ताला वापरले आहे ज्यात खालील गोष्टी आहेत
-उत्पत्ति१६, जेव्हा परमेश्वर हागार ला रानात एका झऱ्या द्वारे भेटला
-उत्पत्ति २२, जेव्हा परमेश्वर डोंगरावर अब्राहामाला भेटला
- शास्ते २, जेव्हा परमेश्वराने इस्राएल ची कान-उघाडणी केली
- शास्ते६, जेव्हा परमेश्वर गिदोन ला भेटला जेव्हा तो द्राक्षमळ्यात गव्हाची झोडणी करीत होता.
- शास्ते१३, जेव्हा परमेश्वर शमशोन च्या आई-वडिलांना भेटला.
ह्यावेळेत आणि इतर वेळेला, परमेश्वर हा त्याचा स्वतःचा संदेशवाहक होता. आणि येथे पुन्हा, निर्गम मध्ये, मोशे परमेश्वराला भेटेल.
तो आणखी म्हणाला, मी तुझ्या पित्याचा देव, अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव, याकोबाचा देव आहे. तेव्हा मोशे ने आपले मुख झाकिले; कारण देवाकडे पाहण्यास तो भ्याला. (निर्गम३: ६)
ही लोकांची स्वाभाविक प्रतिक्रिया असते जेव्हा ते स्वतःला देवासमोर पाहतात.
उत्पत्ति १७ मध्ये, जेव्हा परमेश्वराने अब्राहामाला दर्शन दिले, जेव्हा परमेश्वर त्याच्याबरोबर बोलत होता तेव्हा तो उपडा पडला होता.
१ राजे १९ मध्ये, आपण वाचतो की परमेश्वर एलीयास भेटतो जेव्हा तो गुहे मध्ये लपलेला असतो.
१ राजे १९: १३ मध्ये, एलीयाने ती ऐकताच आपल्या झग्याने तोंड झाकून घेतले व बाहेर जाऊन गुहेच्या तोंडाशी तो उभा राहिला.
यशया ६ मध्ये, आपण वाचतो की स्वर्गातील सराफदूत, ज्यांना प्रत्येकी सहा पंख होते, त्यापैकी दोन ने ते त्यांची मुखे झाकीत होते.
जेव्हा यहेज्केल लास्वर्गाचाआणि देवाच्या गौरवाचा दृष्टांत दिला गेला, तो त्याच्या तोंडावर अनेक वेळा उपडा पडला.
परमेश्वर म्हणाला, मिसर देशांत असलेल्या माझ्या लोकांची विपत्ति मी खरोखर पाहिली आहे; त्यांच्या मुकादमांच्या जाचांमुळे त्यांनी केलेला आक्रोश मी ऐकला आहे; त्यांचे क्लेश मी जाणून आहे. (निर्गम३: ७)
१. विपत्ति...पाहिली
२. आक्रोश –ऐकला
३. क्लेश-जाणूनआहे
देव म्हणाला, खचित मी तुझ्याबरोबर असेन; मी तुला पाठविले याची तुला खूण हीच. तूं लोकांस मिसरांतून काढून आणिल्यावर याच डोंगरावर तुम्ही देवाची सेवा कराल. (निर्गम३: १२)
परमेश्वराची उपस्थिती हे चिन्ह आहे की परमेश्वराने खरेच तुला पाठविले आहे.
तेव्हा मोशे देवाला म्हणाला, पाहा, मला तुमच्या पूर्वजांच्या देवाने तुम्हांकडे पाठविले आहे, असे मी इस्राएलवंशजांकडे जाऊन त्यांस सांगितले असता त्याचे नाव काय असे मला ते विचारतील, तेव्हा मी त्यांना काय सांगू? देव मोशेला म्हणाला, मी आहे, तो आहे; तूं इस्राएलवंशजांस सांग'मी आहे' याने मला तुम्हांकडे पाठविले आहे. (निर्गम३: १३-१४)
योहानाच्या शुभवर्तमान मध्ये, येशू ख्रिस्ताने ७"मी-आहे" ही वाक्ये केली आहेत, प्रत्येकवेळी स्वतःला परमेश्वर असे घोषित करीत आहे.
१. मीच जीवनाची भाकर आहे
२. मीच जगाचा प्रकाश आहे
३.मीचमेंढरांसाठी दार आहे
४. मी चांगला मेंढपाळ आहे
५. मीच पुनरुत्थान व जीवन आहे
६. मीच मार्ग, सत्य व जीवन आहे
७. मीच खरी द्राक्षवेल आहे
Chapters
- अध्याय १
- अध्याय २
- अध्याय ३
- अध्याय ४
- अध्याय ५
- अध्याय ६
- अध्याय ७
- अध्याय ८
- अध्याय ९
- अध्याय १०
- अध्याय ११
- अध्याय १२
- अध्याय १३
- अध्याय १४
- अध्याय १५
- अध्याय १६
- अध्याय १७
- अध्याय १८
- अध्याय १९
- अध्याय २०
- अध्याय २१
- अध्याय २२
- अध्याय २३
- अध्याय २४
- अध्याय २५
- अध्याय २६
- अध्याय २७
- अध्याय २८
- अध्याय २९
- अध्याय ३०
- अध्याय ३१
- अध्याय ३२
- अध्याय ३३
- अध्याय ३४
- अध्याय ३५
- अध्याय ३६
- अध्याय ३७
- अध्याय ३८
- अध्याय ३९
- अध्याय ४०